ह्या घरात तुझा
अशरीरी वावर आहे
चुलिवरुन ग तुझा
हात फिरत आहे.
हा भास आहे
की आभास आहे
कसे वळत नाहि
प्रवास एकट्याचाच आहे
अंघोळिस जाताना मी
टॉवेल विसरलो आहे
तु आणुन देशील
म्हणुन ओला उभा आहे.
मी मुलखाचा भोळा
अन विसर भोळा आहे.
पण तु नाहिस हे
कसे लक्षांत आहे.
कोणत्या जगात तु
कुणास ठाउक आहे
तुला भेटण्यासाठी सखे
देहाचा अडसर आहे
Sunday, October 14, 2007
Monday, October 8, 2007
तोल माझा गेला होता.
रात्र चांदणी होति, अंधार माजला होता,
त्या रात्रीचे काय सांगु, पाय घसरला होता.
त्या काळ्या कुंतलात, शशि चमकत होता
नेत्र शांभवि पिताना,तोल माझा गेला होता.
सभ्य संयमीत मी, वक्षावर नजर घसरली
ढळला पदर तुझा, अन, नियतित खोट आली
हातात हात घेता,हात तु सोडवुन घेतला
भिति तुला वाटत होति, पण स्पर्श हवहवासा वाटला
मंद वारे वहात होते, शांत होते आसमंत,
रात्र होति वादळी, बदलले आपले विश्व
संपली रात्र केंव्हा, ना कळले तुला न मला
कळिचे फुल उमलले,ना कळले तुला न मला
ति रात्र वादळी होति , कि दोष माझा होता.
वाट निसरडी होति, पाय घसरला होता
त्या रात्रीचे काय सांगु, पाय घसरला होता.
त्या काळ्या कुंतलात, शशि चमकत होता
नेत्र शांभवि पिताना,तोल माझा गेला होता.
सभ्य संयमीत मी, वक्षावर नजर घसरली
ढळला पदर तुझा, अन, नियतित खोट आली
हातात हात घेता,हात तु सोडवुन घेतला
भिति तुला वाटत होति, पण स्पर्श हवहवासा वाटला
मंद वारे वहात होते, शांत होते आसमंत,
रात्र होति वादळी, बदलले आपले विश्व
संपली रात्र केंव्हा, ना कळले तुला न मला
कळिचे फुल उमलले,ना कळले तुला न मला
ति रात्र वादळी होति , कि दोष माझा होता.
वाट निसरडी होति, पाय घसरला होता
मन वेडे तळमळते
मन वेडे तळमळते
त्या प्रेम पावसाने, अशी पुरती भिजलेआत अजुनहि जळते, नाहि मी विझले,
तुझी लाघवी लगट, आगळी वेगळी
आतुर तनु तुन रातराणी रे दरवळली
तु असा बरसला, मी चिंब ओलि चिंब
ते तुझे मदन चाळें, मी प्रेम सुखात दंग
चुकले सारे, सारे चुकीचे, मनांला कळते,
कोडगे हे शरीर,कशी आवरु,तिकडेच धावते
चुकले सारे, सारे चुकीचे, मनांला कळते,
पुन्हा तेच करण्यास, मन वेडे तळमळते
उधळुन जा
उधळुन जा
ये बाहु पाशात माझ्या
प्रेम प्रपातात भिजुन जा
ठेवलेस जे तु संभाळुन
आज ते तु उधळुन जा
हे योग्य आहे कि अयोग्य
शब्द छःल सारा, विसरुन जा
हा क्षण मोहाचा, मधाचा
अधराने तु टिपुन जा
तंग काचोळित साठ्वलिस तु
लाख मोलची ति दौलत
रात्र रसीलि मोहाची आहे,
तु दौलत जादा करुन जा
तु श्रुंगार वेडी, बेधुन्द बाला
तव रुपाने काळोख तेजाळला
तनुत रुतुराज वसंत लपला
रोमरोमात मदन वारा उसळला
हे रुप गर्विते, हे लडिवाळ चारुते,
हे मनमोहिनी,हे प्रेम रागिणी
मनि जे प्रेम वसते,
ते तु व्यक्त करुन जा
जे फक्त माझेच आहे,
ते मला अर्पुन जा
प्रेम प्रपातात भिजुन जा
ठेवलेस जे तु संभाळुन
आज ते तु उधळुन जा
हे योग्य आहे कि अयोग्य
शब्द छःल सारा, विसरुन जा
हा क्षण मोहाचा, मधाचा
अधराने तु टिपुन जा
तंग काचोळित साठ्वलिस तु
लाख मोलची ति दौलत
रात्र रसीलि मोहाची आहे,
तु दौलत जादा करुन जा
तु श्रुंगार वेडी, बेधुन्द बाला
तव रुपाने काळोख तेजाळला
तनुत रुतुराज वसंत लपला
रोमरोमात मदन वारा उसळला
हे रुप गर्विते, हे लडिवाळ चारुते,
हे मनमोहिनी,हे प्रेम रागिणी
मनि जे प्रेम वसते,
ते तु व्यक्त करुन जा
जे फक्त माझेच आहे,
ते मला अर्पुन जा
नाते जन्मो जन्मीचे
तुझे नि माझे अतुट नाते जन्मो जन्मीचे
बहरले ते सहजीवनि होते जे मैत्रीचे
तुझे नि माझे सुंदर नाते कमळ भ्रमराचे
रोम रोम मोहरुनि आले,जसे उमलले फुल कमळाचें
तुझे नि माझे सुंदर नाते चंद्र चकोरीचे.
पहाटे, गवतावरी चमकणा~या दवबिंदुचे
तुझे नि माझे सुंदर नाते मेघ-नभाचें
बरसले जे अवनिवरी टपोरे थेंब पावसाचें.
तुझे नि माझे सुंदर नाते उपवन-फुल पाखराचें
डोंगर दरीतुन वहाणा~या,जलाचे,जसे निर्झराचें
तुझे नि माझे सुंदर नाते उत्कट मुग्ध भावनाचे.
तरुवर पडल्या संधीप्रकाशी किरणांचे,जसे क्षितिजाचें.
बहरले ते सहजीवनि होते जे मैत्रीचे
तुझे नि माझे सुंदर नाते कमळ भ्रमराचे
रोम रोम मोहरुनि आले,जसे उमलले फुल कमळाचें
तुझे नि माझे सुंदर नाते चंद्र चकोरीचे.
पहाटे, गवतावरी चमकणा~या दवबिंदुचे
तुझे नि माझे सुंदर नाते मेघ-नभाचें
बरसले जे अवनिवरी टपोरे थेंब पावसाचें.
तुझे नि माझे सुंदर नाते उपवन-फुल पाखराचें
डोंगर दरीतुन वहाणा~या,जलाचे,जसे निर्झराचें
तुझे नि माझे सुंदर नाते उत्कट मुग्ध भावनाचे.
तरुवर पडल्या संधीप्रकाशी किरणांचे,जसे क्षितिजाचें.
Thursday, October 4, 2007
तु कोण आहेस माझा
तु कोण आहेस माझा
आल अधरातिल तु, मकरंद आहेस माझा
ह्या गात्रांत पेटलेला,वणवा तु आहेस माझा
चंद्र तु आहेस माझा,नयनातिल तारा तु माझा
मदन चाळे खेळणारा,सखा सौंगडि आहेस माझा
रेशमी कुंतलात दरवळणारा,कामगंध तु आहेस माझा
कर्ण पाकळीस छेडणारा,खट्याळ तु मीत माझा
त्या दिर्घ चुंबनातिल, थांबलेला श्वास तु
ओसरली प्रणय लाट,तरी तनुत उरलेली ओल तु
रेशमी काचोळीत बांधलेले, ते कोवळे यौवन तु
दिनरात मनांत गुंजणारे, लाजरे प्रेमगीत तु
टपो~या या नयनातिल, काजळाची रेघ तु
बिलगणारी वक्षास,मोत्याची नाजुक माळ तु
तु प्रेमसखा माझा, तु काम सखा माझा
नाहि जगु शकणार ज्याशिवाय,
असा श्वास तु आहेस माझा
आल अधरातिल तु, मकरंद आहेस माझा
ह्या गात्रांत पेटलेला,वणवा तु आहेस माझा
चंद्र तु आहेस माझा,नयनातिल तारा तु माझा
मदन चाळे खेळणारा,सखा सौंगडि आहेस माझा
रेशमी कुंतलात दरवळणारा,कामगंध तु आहेस माझा
कर्ण पाकळीस छेडणारा,खट्याळ तु मीत माझा
त्या दिर्घ चुंबनातिल, थांबलेला श्वास तु
ओसरली प्रणय लाट,तरी तनुत उरलेली ओल तु
रेशमी काचोळीत बांधलेले, ते कोवळे यौवन तु
दिनरात मनांत गुंजणारे, लाजरे प्रेमगीत तु
टपो~या या नयनातिल, काजळाची रेघ तु
बिलगणारी वक्षास,मोत्याची नाजुक माळ तु
तु प्रेमसखा माझा, तु काम सखा माझा
नाहि जगु शकणार ज्याशिवाय,
असा श्वास तु आहेस माझा
तिने नुसते हसुन बघितले
तिने नुसते हसुन बघितले
आम्हि त्यालाच प्रेम समजलो
त्या नयन बाणांनि घायाळ होऊन
शर पंजरी आडवे झालो
त्या मन मोहक अदांनी
घायाळ मन मोहरुन गेले
बर कडक उन हि अम्हाला
शितल चांदणे भासु लागले.
त्या तुझ्या देखण्या यौवनावर
लावण्याची आरास होति
आमच्या प्रत्येक श्वासा संगे
नावांची तुझ्या जपमाळ होति
ति हसुन जरा बोलली,
आम्हि त्यालाच प्रेम समजलो
हृदय घायाळ, जिवाची तळमळ,
उमेदिचें दिवस वाया घालवुन बसलो....
आम्हि त्यालाच प्रेम समजलो
त्या नयन बाणांनि घायाळ होऊन
शर पंजरी आडवे झालो
त्या मन मोहक अदांनी
घायाळ मन मोहरुन गेले
बर कडक उन हि अम्हाला
शितल चांदणे भासु लागले.
त्या तुझ्या देखण्या यौवनावर
लावण्याची आरास होति
आमच्या प्रत्येक श्वासा संगे
नावांची तुझ्या जपमाळ होति
ति हसुन जरा बोलली,
आम्हि त्यालाच प्रेम समजलो
हृदय घायाळ, जिवाची तळमळ,
उमेदिचें दिवस वाया घालवुन बसलो....
असा तुझ्यात गुंतत गेलो
असा तुझ्यात गुंतत गेलो
मला कधि कळलेच नाहि
रेशमी केंसात अडकुन बसलो
सुटवेसे कधि वाटलेच नाहि
उष्टाविताना ति अधर पाकळि
जिव्हा युध्धात पराभुत झालो
तो किति गोड पराभव
हरण्यास पुन्हा तयार झालो.
त्या गंध भारल्या मिठित
मी असा पुरता उन्माळलो
त्या नशिल्या डोळ्यांत हरवलो
नाहि भानावर अजुन आलो
त्या किति अनंग गोष्टी
ते वेडे मदन चाळें
त्या लाघवि काम दाहात
होरपळुन मी संपुन गेलो
मला कधि कळलेच नाहि
रेशमी केंसात अडकुन बसलो
सुटवेसे कधि वाटलेच नाहि
उष्टाविताना ति अधर पाकळि
जिव्हा युध्धात पराभुत झालो
तो किति गोड पराभव
हरण्यास पुन्हा तयार झालो.
त्या गंध भारल्या मिठित
मी असा पुरता उन्माळलो
त्या नशिल्या डोळ्यांत हरवलो
नाहि भानावर अजुन आलो
त्या किति अनंग गोष्टी
ते वेडे मदन चाळें
त्या लाघवि काम दाहात
होरपळुन मी संपुन गेलो
Saturday, September 29, 2007
नांदी अद्वैताची
अधरावर गोड हसु अवखळ
गात्रांत मदनाची, मादक सळसळ
सुवर्ण कांति अशी झळाळली
अन देहांत रातराणी दरवळली
लांब रेशमी कुंतळ काळे
ओल्या अधराचे चंचल चाळें
मोहक नयनांच्या त्या कोंदणी
उमलली जणु शुक्राची चांदणी
तनुवर आरस्पानि रेशमी वस्त्रे
ते मोहक नेत्र.सळसळणारी गात्रे
मी घायाळ, कसा टिकेल तुझपुढे
अनंग, मदनाची,शस्त्रे तुझकडे
विरघळलीस,आलिस जेंव्हा मिठित
गोडी अशी काम लाघवि स्पर्शाची
संपला तो आपला पृथक भाव
प्रिये हि तर नांदी अद्वैताची
गात्रांत मदनाची, मादक सळसळ
सुवर्ण कांति अशी झळाळली
अन देहांत रातराणी दरवळली
लांब रेशमी कुंतळ काळे
ओल्या अधराचे चंचल चाळें
मोहक नयनांच्या त्या कोंदणी
उमलली जणु शुक्राची चांदणी
तनुवर आरस्पानि रेशमी वस्त्रे
ते मोहक नेत्र.सळसळणारी गात्रे
मी घायाळ, कसा टिकेल तुझपुढे
अनंग, मदनाची,शस्त्रे तुझकडे
विरघळलीस,आलिस जेंव्हा मिठित
गोडी अशी काम लाघवि स्पर्शाची
संपला तो आपला पृथक भाव
प्रिये हि तर नांदी अद्वैताची
Thursday, September 20, 2007
Subscribe to:
Posts (Atom)
