Wednesday, March 12, 2008

प्रेमगीत


का लावीशि सखे तु, जिव्हा लाल अधरास,
पुसशील प्रेमगीत ,जे अधरावर लिहिलेले..

नको सारखि चाचपु तु केश कुंतलास,
खाली पडुन जाइल, मी फुल माळलेले..

किति तंग घातली, ति काचोळी रेशमाचि
गुदमरुन जाइल ना सखे, ते यौवन बांधलेले

तु मोहगंधा, विरघळे रातराणी गंध तव तनुत,
कसे येतिल गंध मजला, श्वास माझे थांबलेले

नको करुस प्रेम इतके, नको लावुस जिव
मी एक मुक्त बेधुंद जीव पण, मन तुझ्यात गुंतलेले
-------------------
अविनाश बेधुंद.स्वच्छंदी..मुक्त जीवन

ते सुंदर दिसणे,रोज भेटणे, हसुन बोलणे,

ते सुंदर दिसणे,रोज भेटणे, हसुन बोलणे,
त्यात माझा जिव, साजणे, अडकुन गेला

भेट नुकतिच झाली,वाटे ऒळख युगायुगाची
तुझा मोहमयी सहवास,बेधुंद असर, करुन गेला

का टाकला कटाक्ष सौदर्यवति, तु दर्पणात
नाहि एकसंध राहीला तो, भंगुन गेला

का उधळलेस तु रंग शतरंग,सखे प्रेमाचे,
हा जीव माझा वेडा त्यात, रंगुन गेला

"शक्य नाहि"जरी किति तु, गोडव्यात म्हणाली
तो शब्द सखे, मला पुरता घायाळ, करुन गेला

छ्द्मीपणाने हसलो,जरी बेपर्वा‌इने जा म्हणालो,
ताटातुटीचा तो क्षण जिव्हारी माझ्या,लागुन गेला

अविनाशा, बेधुंद, मुक्त, स्वच्छंदि जरी तुझे जिवन
तरी"ति नाहि" हा विचार सारी धुंदी, उतरवुन गेला

-----------------------------------------------------------
अविनाश बेधुंद.स्वच्छंदी..मुक्त जीवन

तुझी ति नजर शोधते मी

घोळक्यातुन तु मला ज्या नजरेने टिपले
तुझी ति नजर शोधते मी

नुसत्या नजर कटाक्षाने घायाळ केलेस,
तुझी ति नजर शोधते मी

ज्या नजरेने आयुष्य नजर कैद झाले
तुझी ति नजर शोधते मी

"तु मला खुप आवडतेस" म्हणताना खुललेली
तुझी ति नजर शोधते मी

पहाताक्षणी जन्म जन्माची ओळख पटली
तुझी ति नजर शोधते मी

क्षण बर दृष्टी आड होत कावरी बावरी होणारी
तुझी ति नजर शोधते मी

सुख दु:खात ,साथ देणारी
तुझी ति नजर शोधते मी

झालास फितुर,बे‌ईमान तु अन चुकवतोस जी
ति तुझी नजर शोधते मी

प्रेम केले तुझ्यावर,लागली प्रेमास् नजर जी
ति नजर शोधते मी
_______________________

अविनाश बेधुंद.स्वच्छंदी..मुक्त जीवन

शाक्त पंथीय साधक साधिकांची शक्ति उपासना

नरमुंड धारी, कालिके,स्यय:म उर्जा स्त्रोत,तु शक्ति असे.
आम्हि वामाचारी,शाक्त पंथीय, माते, तुज आमुचे वंदन असे.

हे नाग नंदिनि,कालिके,चंद्र सुर्य ,तुझे अलंकार असे
जरी वाटे भयभित तुजे रुप,त्यातच आम्हा ममता दिसे

योनितत्व प्राशुनि,साधक साधिका अराधनेस माते सज्ज असे
हे मातंगी,भुवनेश्वरी,महालक्ष्मी,आम्हि स्वेछ्याचारी तुझे दास असे

"म"कार साधक आम्हि,मद्य,मास,मुद्रा,मत्स्य,मैथुन,चे उपासक आहे,
तव प्राप्तिसाठी बगलामुखी देवि,घट्कंचुकी विधी अनुष्टीत आहे

उघडले उघडले द्वार,ईडा,पिंगलेचे,तव उर्जा आत शिरली आहे
माते धन्य धन्य हा साधक, मा कुंडलीनि जागृक झाली आहे.

लागली बघ ब्रह्मांनंदी टाळी,सारा देह उर्जेत नहात असे.
वितळले ब्रह्मांड लक्ष लक्ष रंगात,प्रत्येक रंग कणांत तव रुप दिसे

धन्य झाले जिवन,काहि न उरले ,तव दैदिप्य मान दर्शन घडले आहे
कृत कृत्य मी,शीरच्छेद करुनी, मी ,शीर कमल तव चरणी वहात आहे.
__________________________________________

अविनाश बेधुंद.स्वच्छंदी..मुक्त जीवन

तुझ्या बरमुडा त्रिकोणा चे आकर्षण

तु आहेसच सागरा सारखी.
अथांग,....गुढ
निळेशार.. कधी खवळलेली..
उंच लाटा..कधी शांत वरवर..
आत खवळलेली...
खुप खोल..खारट....
आवडत..तुझ्या लाटावर स्वार व्हायला..
खवळलेल्या विशाल पात्रांत झोकुन द्यायला....
अन तिथेच कुठेतरी आहे तो
Bermuda triangle..... बरमुडा त्रिकॊण...
अदृश्य..अनाकलनिय, गुढ...
जबरदस्त आकर्षण शक्ति असलेला...
खेचतो मला गलबता सह..आत..आत
विरुन जातो मी, बनतो समुद्राचाच एक भाग...
त्या त्रिकोणाचा...विसरतो देहभान...,
मग डोळे उघडतो, अन स्वत:लाच पहातो..
तुझ्या किना~यावर पडलेला...विवस्त्र..शान्त..निपचीत

-------------------------------------------
अविनाश बेधुंद.स्वच्छंदी..मुक्त जीवन

Saturday, February 9, 2008

रुसवा...

माळण्यास आणली आहेत मी
ही शुभ्र फुले मोगऱ्याची
का रुसलीस प्रिय सखे
काय झाली चुक पामराची.......

पौर्णेमेची ही रात्र आहे सखे
धवल चंद्र बघ नभी उगवला
काय खता झाली प्रिये माझी
माझा चंद्र का बरे रुसला???.....

नजर इकडे तिकडे भिरभिरलेली
गौर वर्ण,नाजुक नासीका फुललेली
अधर पाकळी दाता खाली दाबलेली
गोड दिसतेस, जरी असली रुसलेली........

स्पर्शीता तनुस ,का हात झिडकारतेस?
भामीनि मी प्रिय सखा,का दुर लोटतेस??
मनवण्यात जरी प्रिये, मध्य रात्र उलटली
पण प्रणयाची धुंदि नाहि अजुन उतरली........

सुहास्य वदने, सुंदरी, रुसवा सोड हा
मान्य चुका, जरी नसतिल मी केल्या
संपव अबोला, अन छळवाद, तु हास,
ये मिठीत, विनवितो तुला तुझा दास......

अविनाश बेधुंद.स्वच्छंदी..मुक्त जीवन

तुलाही,मलाही

नहालीस तु, केस मोकळे पाठीवरी ऒले,
स्पर्शातुन सखे ओल जाणवे,तुलाही,मलाही

घेतले मीठीत मी सखे तुजला,चुंबिले,
मिटला दुरावा चार दिवसांचा ,तुझाही,माझाही

स्पर्शीता हळुवार उरोज,घसरला टॉवेल तनुवरुन
नसे भान त्याचे प्रिये,तुलाही,मलाही

रस गंधाची माद्क बरसात,उधळण असे,
धुंद करी ते, तुलाही,मलाही

शयन गृहाचे कवाड सखे असे उघडे,
नसे भान त्याचें, तुलाही,मलाही

कामधूंद सखे असे तु, असे मीहि कामातुर
नसे लज्जा, नसे भय, तुलाही,मलाही

अविनाश बेधुंद.स्वैर..मुक्त जीवन

Friday, February 8, 2008

नयन नक्षत्रांचे चाळे

नयन नक्षत्रांचे चाळे बघता बघता
तुला निट निरखता आलेच नाहि.

ऒठांत उष्ण अधर फोडी घेता घेता
हनुवटी वरचा तिळ दिसलाच नाहि.

न्याहळता नजरेने काचोळी तले यौवन
तोल संभाळता आलाच नाहि

मेंदिची केशरी नक्षी बघता बघता
बिल्वरी चुडा बघितलाच नाहि

मोकळे दाट केस छेडता छेडता
गंध ग्लानी आलि समजले नाहि

गात्रांतुन ओसंडणारे लावण्य बघता
तुझे सोळा श्रुंगार बघितलेच नाहि

झेलता कटाक्ष,लावण्य सुंदरी तुझा
भंगलो, मी, एकसंध रहाता आले नाहि.

मंत्रमुग्ध झालो ,लाघवि बोलणे ऎकता ऎकता
सांगावयाचे तुला, ते सांगता आलेच नाहि..
Avinash/...................

Wednesday, February 6, 2008

हे प्रेम नाहि तर काय आहे?

मला बघुन तुझ मधाळ हसण
बघुन न बघितल्या सारख करण
मी बघीतल्यावर गोड लाजण
सखे..हे प्रेम नाहि तर काय आहे?

ड्रेस खरेदी करताना,
माझी आवड लक्षात घेण
मग तो घालुन माझ्या समोर मिरवण
"छान दिसतोय" म्हणाल्यावर
तुला आवडला विचारण..
हो म्हटल्यावर खुष होण..
सखे..हे प्रेम नाहि तर काय आहे?

ऑरकुट वर माझ Scrap बुक चेक करण
कुणाचे Scrap आले बघण
मुलिंचे Scrap दिसले की चिड्चिडण
सखे..हे प्रेम नाहि तर काय आहे?

माझ्या बद्दल मैत्रीणींनी विचारल्यावर हसण
"तोच सारखा विचारतोय" अस सांगण
"अग तस काही नाहि" म्हणत..
We are just friends
म्हणत सफाई देण
सखे..हे प्रेम नाहि तर काय आहे?

सारखी भेटायची वाट पहाणे
भेटल्यावर कृतक कोप लटक रागावणे
कान धरून माफ़ी मगितल्यावर
गालावर खळी उमटणे
सखे .. हे प्रेम नाही तर काय आहे

तु माझ्यावर प्रेम करण,
हे माझे सौभाग्य आहे
तुज कडे मन धाव घेण
हे माझे प्राक्तन आहे
तुझी अन माजी ओळख
हि युगा युगाची आहे.
मी तुझा अन तु माझी
हे तर विधिलिखीत आहे....!

अविनाश बेधुंद.स्वैर..मुक्त जीवन

प्रेम रोग

त्याच्या एका कटाक्षाने घायाळ झाले
त्याच्या मधु हास्यावर मोहित झाले
रात्री नाहि निद्रा,दिवसा चांदणे दिसु लागले
मी माझीच होते पण आता मी माझी न राहिले ...
कोणी सांगेल का .... काय मला हे झाले ???

अग सखे ऎक बोल अनुभवाचे....

त्या चित्त चोरांने, तुला पुरते लुट्ले ग
तुलाच तुझ्यापासुन, पळवुन नेले ग

आता तु कशी राहशिल सखे तुझी तु
त्याच्या मोहमयी प्रेम पाशात अडकलीस तु

हा आजार गोड फार, पण जिवघेणा असे
लक्षणे तर दिसतात, प्रेम रोगाची सखे

हा रोग मुरे शरिरी, वेदना थेट काळजास
हकिम, वैद्य, थकले, नाहि दवा या रोगास.

अनुभवाचे बोल ऎक तु,एकच यावर उपाय असे.
प्रियकराचे दर्शन,हा खात्रीचा उपचार असे

भेट त्याला उपवनी,नभात शरद चांदणे असे
चुंबनालिंगने,सहवास,हिच त्या रोगावर दवा असे

अविनाश.............