Wednesday, January 5, 2011

एक मुक्तक

एक मुक्तक

विचारांच्या युध्दात जर कोणाचा बळी जात असेल तर तो आहे माणसाचा!” ” लोक पैसा व सत्तेसाठी खून करतात. पण सर्वात निष्ठुर खुनी आपल्या विचारधारेसाठी खून करतात.’

विचारात कोट्यावधी अणुबॉंब इतकी ताकद असते हे खरे...एखाद्या विचार धारेने प्रभावित झालेले माणसे वा समुह आपल्या विचारधारेसाठी कुठल्याहि थराला जावु शकतात..

आर्यांचे वंश श्रेष्टत्व या विचाराने हिटलर भारावुन गेला होता..वर्ण संकर त्याला मान्य नव्हता..लाखो ज्युज मृत्यूमुखि पडले...गंमत म्हणजे चर्चिल जो हिटलर चा विरोधक होता त्याला माईन काम्फ मधले हे हिटलरचे वंश श्रेष्ठता संबंधिचे विचार मान्य होते....

रशियन देषात क्रांति झाली कार्ल मार्क्स ची विचारधारा म्हणजे देवाचि आज्ञा झाली...ज्यांना ति विचार धारा मान्य नव्हति अश्या लाखो लोकांना स्टॅलिन लेनिन ने यमसदनाला पाठवले...साम्य वादाचा विचार रुजवण्या साठी मोठ्या प्रमाणात दडपशाहि झाली...अन शेवटी मुळात ति विचार सरणीच फुसकी ठरली...लोकांनी साम्यवाद नकारला...स्टॅलिन .लेनिन.मार्क्सचे पुतळे लोकांनी समुद्रात बुडवले....

स्वातंत्रा नंतर समाजवादाच्या विचाराने भारतातले शिर्श नेते फार प्रभावि झाले होते..समाजवाद म्हणजे परवलीचा शब्द झाला होता...सगळीच कामे सरकार करु लागली...हॉटेल चालविणे,अवजड उद्योग,बॅंकिंग..अश्या अनेक उपक्रमाचा जन्म झाला..शेवटी यासा~या व्यवसायात व्यवसायाचे मुख्य तत्व "नफा" हेच विसरले गेले अन सारे उद्योग म्हणजे नोकरदारांचे अड्डे झाले...त्याच संप, खोटी नोकरभरती असे अनेक गैरप्रकार शिरले....या समाज वादी विचारांना जेंव्हा विरोध होवु लागला तो मोडण्या साठी..श्रीमति गांधि यानी समाजवाद हे घटनेचे कलम केले व त्या साठी घटना दुरुस्ति झाली...शेवटी उत्पादन कमी व खर्च भरपुर त्या मुळे सारा देष आर्थिक द्रूष्ट्या डबघाईला आला...सोने गहाण पडले व शेवटी भारताने समाज वादाचा त्याग करुन मुक्त अर्थ व्यवस्थेची कास धरली.....

वैशण्व व शैव..प्रोटेस्टंट व कॅथलिक या विचार धारांचा वाद पण प्रसिध्द आहे..त्या साठी अनेक धर्मयुध्दे झाली...

रामजन्म भुमीच्या विचाराने पेट घेतला..व लोकांनी आपल्यी विवेक बुध्दीशी फारकत घेतली..हिदुत्वचे हिंसक रुप पुढे आले..अन बघता बघता लाखो लोकांनी मशिदिचे चुर्णात रुपांतर केले..आणि हजारो लोक मृत्युमुखि पडले...नंतर केवल सत्तेसाठी हा खेळ होता हे लक्षात आले अन हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भा.ज.प. सरकार सपशेल हरले...

अल्ला सर्वश्रेश्ठ व मुर्तिपुजा मंजुर नसलेल्या माथेफिरुंनी एका हातात कुराण व एका हातात तलवार घेवुन सारे जग इस्लाम करण्या साठी जगाशी वैर घेतले..व लाखो निरपराध लोक मृत्युमुखि पडले...

असे अनेक विचार जगात आले व येत रहातिल ..एखाद्या विचासरणीची नशा चढली कि मानवसमुह विवेक बुध्दी हरवुन बसतो...एका थोर विचावंताने नमुद केलेच आहे कि

"मनुष्य जातिचा सारा इतिहास क्रौय व हिंसाचाराने रंगलेला आहे....

Wednesday, August 25, 2010

अल्हाद वसंति

अल्हाद वसंति, संधी प्रकाशी कसे सांगु कुणा
दिसलास मला तु, उमदा अन देखणा

झालि भेट नजरांची,त्यात होता उत्स्फुर्तपणा
खटयाळ हास्य मीशीतले तुझे, होता मीश्किलपणा

अशाच भेटि घडत गेल्या,त्यातही होता सह्जपणा
घेतलास ठाव मम ह्रदयाचा, भावला तूझा स्वच्छंदीपणा

मी माझी राहीलेच नव्ह्ते, सरला होता रीतेपणा
नयनी तुझ्या हरवुन बसले, माझ्यातील मी पणा

प्रेम भावनांनी घेतला ताबा, होता तो बेधुंदपणा
भाळले तुझ्या हास्यावर, आवडला तुज, माझा वेडेपणा

दिलेस मुर्तरुप आपल्या नात्याला, अनुभवला अद्वैतपणा
नभीच्या चांदण्या सामावल्या ऒंजळीत माझ्या,
गवसला स्वर्गीचा ठेंगणेपणा......

@ Avinash

Monday, July 19, 2010

प्रणय रात्र

अधरावरल्या दंतव्रणावर जिभ ह्ळुवार फिरली
प्रणय रात्र ति आठविता, गात्रे पुन्हा मोहरली

धुंद सारे शब्द होते..कामधुंद त्या भावना
बहर प्रीतिचा मनि, अन मदन दाह सोसवेना
प्रणयाची लाट ओसरे,पण ओल अजुन राहीलि
ति प्रणय रात्र आठविता,गात्रे पुन्हा मोहोरेली

घेतले मिठीत तु अन कामगंध उधळले
मिसळता श्वासांत श्वास, गंध उन्माद्क परीमळे.
प्राशिता मकरंद अधराचा, खुण मागे ठेवली
ति प्रणय रात्र आठविता,गात्रे पुन्हा मोहोरेली

पुनवेच्या चांदण्यात सारी ,ति मधुरात्र डुंबली
प्रणय खेळ खेळता ,रात्र सारी जागवली
उन्मादक तृप्त तनु, काम रसानें माखली
ति प्रणय रात्र आठविता,गात्रे पुन्हा मोहोरेली
Aavinash

Sunday, July 18, 2010

प्रेम कविता

प्रेम कविता

नाहि कळत मला तुझ्या प्रेम कविता
त्या श्रुंगारीक उपमा....ते शब्द लालित्य
त्या अनुप्रासात,गण,मात्रात गूंफलेल्या शब्द रचना..
माझी प्रेम कविता चार अक्षरात सुरु होते व संपते..
"तु माझा
मी तुझी"
मला वाटते जगातली हि सर्वात सुंदर प्रेम कविता आहे

Aavinash

देहदाह शमवुन जा

देहदाह शमवुन जा.

सुगंधी श्वासांत श्वास तु मिसळवून जा
मखमली गालावर, प्रेमखुणा ठेवुन जा.
रसाळ अधरावर तुझे ,नाव तु कोरुन जा
ह्रुदयात जी लावली, ति आग तु विझवुन जा.

त्या कटाक्षानें तुझ्या,गात्रें सारी उमलली,
कवेत घेतलेली तनु,लाजेन चुर झाली,
मधाळ चुंबनाने जो देह सारा पेटला,
चंदनी स्पर्शाने तो दाह शांत करुन जा

शराबी डोळे,स्पर्श गहिरा,धुंद प्रितीचा,
उठले काहुर,लागली हुरहुर, ति मिटवुन जा,
दाटले तारुण्य माझे,त्या रेशमी काचोळीत,
वक्षावर त्या,अनंगाचा ठसा उठवुन जा.

फुलले, बहरले यौवन,देह सारा जाळते,
देहात मिसळुनी देह, देहदाह शमवुन जा.
ह्रुदयात जी लावली, ति आग तु विझवुन जा.
AAvinash.................

नाते जन्मोजन्मीचे

नाते जन्मोजन्मीचे
माझ्या घरावरुन तुझे ,रोज येणे जाणे असते
म्हणुन तर मी सजुन, रोज गॅलरीत उभि असते

एकदाहि नाहिस टाकिला तु, वर कधि कटाक्ष
समजेनासे झाले मजला, कसे वेधावे तव लक्ष

मुद्दामुन अनेकदा मी ,तुझ्या नजरे समोरुन गेले
पण नजरेचे तुझ्या अन माझ्या, मिलन नाहि झाले

तु असा कसा रे कलंदर, तुझ्याच विश्वात रमतो
हि वेडी तुजसाठी झुरते,तडफडते, हे कसे विसरतो

आवडतात तुला कविता ,असे मज बाहेरुन समजले
म्हणुन तर उद्देशुन तुला मी, प्रेम कविता रचत बसले

अनेकानि केली स्तुति,अनेकानी कौतुकाने थोपटली पाठ
नाहि आला तुझा अभिप्राय, ज्याचि होते पहात मी वाट

असशिल विश्वामित्र,स्वतःच्या विश्व निर्मितित दंग
मी पण बनुन मेनका ,नक्किच करेन तव तपोभंग

जरी वरवर दाखवित असशी मी तुझ्या खिजगणतित नाहि
ठावुक आहे तव ह्रुदयी ,मज वाचुन दुसरी कोणी नाहि

विश्वास आहे मज, तव हृदयी, मजसाठी फक्त प्रेम वसे
पति म्हणुन मी ,प्रियकरा तुजला जन्मोजमी ,वरले असे

Aavinash

अप्सरा

अप्सरा

तलम साडीतुनी डोकावे तुझा खांदा गोरापान
पडता नजर त्यावरी होइ मन खट्याळ व बेभान

कापलेले रेशमी केस रुळति तुझ्या गो~या पाठिवर
अवखळ रेशमी बटा येती तव डोळ्यावर वारंवार

हिरेजडीत कर्ण भुषणे डुलती.वा~यासंगे आनंदुन
ओशाळला गुलाव.. तव गौर गुलाबी तनु पाहुन

मोहक गुलाब लाली गालावरची लाजविते लज्जेला
रति रुप असे देखणे ,का तु लाजवितेस अप्सरेला

लवता नेत्र पापणी,तेजस्वि नेत्र प्रभा अशी फाके
विलगता अधरपाकळ्या. शुभ्र दंतपंक्तिची रांग झळके

नाजुक मंगळसुत्र रुळते ,तव वक्षस्थळांच्या घळी
भाग्यवान धनी,नावाने ज्याच्या कुंकु लावितेस भाळी

Aavinash

नव्हते मनांत तरीहि


नव्हते मनांत तरीहि,कसे अघटीत घडले
त्या चित्त चोरट्याला,आपले म्हणुन बसले

होते पुढे शिकायचे,आइचे ऎकुन बसले
वधु परिक्षेस मी,का सजुन बसले?

त्या हस~या छबित,मीच हरवुन बसले.
त्या एका कटाक्षाने,घायाळ होवुन गेले..

बोलणे असे आर्जवि,का मनास गुंतवावे.?.
ठेवले जे सांभाळुन,का वाटे उधळावे?

असेल मी आवडली?,कितिदा मना पुसावे
येइल का होकार,म्हणुनी किति झुरावे

येता होकार त्यांचा,मन पाखरु व्हावे.
वाटे हे जिवन,त्या चरणी अर्पावे..

नव्हते मनात माझ्या,मग का असे घडावे?
या गारुडास सांगा,काय नाव द्यावे?

त्या रात्रीचे काय सांगु, तोल् माझा गेला होता.


रात्र चांदणी होति, अंधार मातला होता,
त्या रात्रीचे काय सांगु, तोल् माझा गेला होता.

दोघांच्या देहां मधे श्वासाचेच अंतर होते
तिच्या उष्ण श्वासांनी देह तापला होता

त्या काळ्या कुंतलात, शशि चमकत होता
नेत्र शांभवि पिताना,माझा पाय घसरला होता.

सभ्य संयमीत मी, वक्षावर नजर घसरली
ढळला पदर तुझा, अन, तनु सारी कल्लोळली

हातात हात घेता,हात तु सोडवुन घेतला
भिति तुला वाटत होति, पण स्पर्श हवहवासा वाटला

शांत होते आसमंत , मंद वारे वहात होते, ,
रात्र होति वादळी, आपले विश्व बदलले होते

संपली रात्र केंव्हा, ना कळले तुला न मला
कळिचे फुल उमलले,ना कळले तुला न मला

ति रात्र वादळी होति , कि दोष माझा होता.
वाटच निसरडी होति, पाय घसरला होता

बेभान श्रावण

बेभान श्रावण


हळवे ग मन
गाते गाणे मन

गोरे गोरे पान
रुप हे बेभान

गालावर खळी
पडते ग छान

बेभान श्रावण
मदनाचा बाण

अधिर यौवन
सजलीस छान

अधरात ठेवलय
गुपित दाबुन

लवते नयन
येणार कोण?

नाचते ग मन
येणार साजन

avinash