Sunday, January 22, 2012

प्रेम

प्रेम
प्रेम करण..किति सोप आहे..काय लागत प्रेम करायला?
अं..अं..काय बर..??अं..अं....हा,,

तो...... ति..
चंद्र..चांदण्या..
हिरवळ..एकांत,,
बहरलेला निशिगंघ
बेधुंद संध्याकाळ...

अं..अं..आणखि काय बर..??
हा...
चॉकलेट्स..मल्टि प्लेक्स..
मॉल..प्रेसेन्ट्स..टेडी..
गिफ्ट्स..आईस क्रीम..
परफ्युम्स.....मो बाईक.....

बस ..झाल???...आणखि काय बर ?....
अं अरे हो , आठवल..
एक सुंदर, निर्मळ, संवेदनाक्षम मन..

आविनाश

Tuesday, January 17, 2012

तुझ्या नकळत


तुझ्या नकळत

तुझ्या नकळत तुला रतिने बघावे
अन पाहुन तव रुप लज्जित व्हावे

असा ,सखे लयब्ध्ध पदन्यास तुझा
पैजणास वाटे तुज बिलगुनि रहावे

अशी लाजरी अबोध रमणी असे तु
आला वसंत देही,तुज ठावुक नसावे.

नाभित जशी त्याच्या कस्तुरी दरवळे
तसे मम हृदयी तु दरवळत रहावे

हे काय झाले,तुला हि कळेना
ते पाहुन ,मदनाने गाली हसावे

तारकांच्या साक्षिने विवाहबध्ध व्हावे
मी तुला अन तु सौभाग्यास मिरवावे

अविनाश

घनदाट गर्द रेशमी केशकुंतल


घनदाट गर्द रेशमी केशकुंतल

घनदाट गर्द रेशमी केशकुंतल
नेत्रास कोरले काजळ कि सोमल
तनुत रातराणीची मादक दरवळ
गात्रात मदनाची बेफाम सळसळ

नजर, कधि लाजरी, कधि नाचरी
रतिरुप,नखशीकांत तु लावण्य परी
वाकलेली लज्जेने तु अबोध रमणी
रुप चमके,जशी नभी शुक्रचांदणी

वसने ,गर्भ रेशमी अंगी ल्याली
तव उरास काचे ,भर्जरी काचोळी
देहात रानवारा,उसळे उधाण लाटा
गालास खळी,अशी तु लावण्यकळी

अबोल पौर्णीमा, अन धुंद चांदणी
जवळ श्रुंगार वेडी,बेधुंद रागीणी
नाचति वक्षावर, चकोर मंडले बेभान
मुग्ध ति कुजबुज अन चोरटे अलिंगन ,

रोम रोम नशेने फुलले,श्वासात श्वास भिनले..
एक मेकाच्या सहवासात,बहरुन यौवन आले
तारुण्य अन यौवनाचा प्राशितो मी कण नी कण
ओंजळीत दिले मी तुजला,तृप्तिचे लक्ष लक्ष क्षण

Avinash

शर्ट

शर्ट

तो दोन दिवसासाठी टुर वर गेला होता..
रात्रीचे १२ वाजून गेले होते..
तीचां अनावृत देह बेड वर तळमळत होता..
त्याच्या विरहात......तनु दाह होत होता .
तिचे लक्ष गेले त्याच्या भिंतीवर लटकलेल्या शर्ट कडे..
उठून तिने शर्ट काढला भिंतीवरून ...
त्याचा घर्म गंध तिच्या तनुत दरवळला.
शर्ट घालून दिवा मालवला ...अन झोपली..
तिला वाटत होते त्याच्या मिठीतच ती पहुडली आहे..नेहमीप्रमाणे...
Avinash....

कृष्ण विवर....

कृष्ण विवर....
आहेसच तु..आकाशा सारखि...
गुढ..अनाकलनीय..रहस्यमय..अनंत..
भुरळ पडते..अनेक रंग..अनेक छटा..
कधि मेघाछ्छादित..तर कधि निरभ्र...
कधी मळभ.. तर कधि शुक्र चांदणी तेजस्विनी...
कधी शांत..तर कधी खवळलेली...
बघत रहावस वाटत....सारख..
धवल शुभ्र.आकाश गंगेच्या पट्ट्याकडे..
अन मग खेचला जातो
त्या तिथेच असलेल्या कृष्ण विवरात...
कुठल्या तरी अनामिक आकर्षणाने..
ओढला जातो..खोल..खोल..आत..आत..
हरवुन बसतो स्वतःचे अस्तित्व...
विरुन जातो..अन बनतो त्याचाच एक अविभाज्य भाग...
Avinash...

गातेस जे गीत

गातेस जे गीत

गातेस जे गीत ते माझे नव्हे
भाव अन शब्द हि माझे नव्हे

बहरली जरी तनु वेल नाजूक
गंधाळलेली तनु आता माझी नव्हे

बिलागालीस त्या चांद रात्री मला
तो चन्द्रमा हि आता माझा नव्हे

लोटलीस तू नौका ज्या सागरात
तो किनाराही आता माझा नव्हे

फिरतो असाच दिशांहीन मी
ती दुनिया हि आता माझी नव्हे
avi

तुझ्या प्रेमात साजणे

तुझ्या प्रेमात साजणे

चुंबिता ओले अधर,दरवळे श्वास गंध
चुरता म्रुदु ऊरोज,दरवळे तनुत गंध.

ते काम सोहाळे, त्या काम धुंद रात्री
येई उधाण प्रेयसी ,तुझ्या कोमल गात्री

तुझ्या प्रेमात साजणे मी रात्रं दिन दंग
आली मिठित,उमलला रात राणीचा गंध
avinaash
..........................

कवि

अरे माझे ह्रुदय काढुन घ्या
मला सरणावर ठेवण्या आधी
नाहितर ति जळुन जाईल
जि ह्रुदयात वसली आहे.

न बघता मागे वळुन
निर्दय पणे सोडुन गेली
जाता जाता मला ति
कवि मात्र बनवुन गेली

अविनाश

थोडे मला कळाया लागले.

थोडे मला कळाया लागले.
तव रुप छळाया लागले.

काजलनेत्र वा पिन पयोधर
दोघेहि मला खुणवु लागले.

गंधित मादक केश संभार
मन त्यात अडकु लागले..

पहाताच तव यौवन रुप
सारे आईने तडकु लागले.

पहाता रसाळ अधर फोडी
मन कविता प्रसवु लागले.

निरखता मादकआक्रुति बंध
द्वैताद्वैत रहस्य उकलु लागले.

अविनाश

दररोज मीच पाही


हे रुप सुंदरीचे, दररोज मीच पाही.
वाटे रोज निराळे, मन अचंबीत होई.

रुळे कुंतल वक्षावर.तर कधी बांधलेले.
त्या नागीणीत माझे ,का मन बेभान होई..

साधे असे बोलणे, पण गोडवा किति.
बोलण्यात जिव वेडा, का गुंतुन जाई?

नाजुक लाल अधर ,चाळे किति विभ्रमी.
चुंबण्यास अधर, मन ते आधिर होई..

नित्य नवे रुप ,दररोज मीच पाही
गारुड काय हे ,मज उमजत नाहि

अविनाश

दररोज मीच पाही

हे रुप सुंदरीचे, दररोज मीच पाही.
वाटे रोज निराळे, मन अचंबीत होई.

रुळे कुंतल वक्षावर.तर कधी बांधलेले.
त्या नागीणीत माझे ,का मन बेभान होई..

साधे असे बोलणे, पण गोडवा किति.
बोलण्यात जिव वेडा, का गुंतुन जाई?

नाजुक लाल अधर ,चाळे किति विभ्रमी.
चुंबण्यास अधर, मन ते आधिर होई..

नित्य नवे रुप ,दररोज मीच पाही
गारुड काय हे ,मज उमजत नाहि

अविनाश