Monday, July 1, 2019

प्रेम एक अनुभुति..सायुज्जते कडे जाण्याचा प्रवास...
*
प्रेम भावना हि सा~यांनाच हवि हविशी वाटणारी आहे.."पहिलिच भेट झाली,पण ओढ हि युगाची"अशी हि भावना असते..क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणाचा" हे गडक~यांचे म्हणणे किति सार्थ आहे.
आपण कुणावर तरी प्रेम करावे..अन कूणी तरी आपणावर जिव तोडुन प्रेम करावे हि मानवाचि उपजत अन निसर्ग दत्त अशी भावना आहे..असते..
*
प्रेमाचि सुरवात आपल्या विचारां पासुन होते..प्रेमाच्या विचाराचे तरंग मनात आले कि प्रेमाचा विचार सुरु होतो...मनात घोळणा~या प्रेमाच्या विचाराने प्रेमाची अनुभुति, व प्रेमानुभव निर्माण होतात.
*
तुम्हि कुठल्याच व्यक्तिवर तो पर्यंत प्रेम करु शकत नाहि जो पर्यंत तुमच्या मनात त्याचा बद्दल सन्मानाचि, आदराचि भावना नाहि...सर्वात प्रथम तुमच्या मनांत स्वत:बद्दल आत्म सन्मानाचि भावना तुम्हि निर्माण करायला हवि...व ति निर्माण करताना स्वत:स विचारा " माझ्यात असे काय आहे ज्या बद्दल मला स्वत:चा आदर आहे?
*
.प्रेमाचे गणीत विचित्र असते...प्रेम मिळवायचे असेल तर आधि ते मुक्त पणे वाटावे लागते..प्यार बाटते चलो...जितके प्रेम तुम्हि वाटत चालाल तितके बदल्यात तुम्हाला ते परत मिळत राहिल...सदह्रुदयी व्हा, प्रेमळ व्हा व त्या प्रमाणे वागा, वागायचा प्रयत्न करा...प्रेमसंबंधाला होकार देवुन त्यात झोकुन देण्या पुर्वी असा विचार करु नका कि हि व्यक्ति माझ्या साठी काय करेल??उलट पक्षि असा विचार मनांत येवु द्या कि मी माझ्या साथिदारासाठी काय करु शकेल????साथिदारा बाबतचि हि समर्पणाचि भावना हेच सुखि प्रेम संबंधांचे रहस्य आहे...
*
प्रेम म्हणजे एकमेकाच्या डोळ्यात पहाणे नसुन,दोघांनि एखाद्या गोष्टीकडे, एकाच विचाराने,एकाच वेळी बरोबरीने बघणे असेच नव्हे काय??...प्रेम म्हणजे त्या व्यक्तिस आहे तशी गुण दोषा सकट स्विकारणे..ति कशी दिसते? तिच्यात काय गुण आहेत याचे मुल्यमापन करुन नव्हे...मैत्रीच्या मातितच प्रेमाचि बिजे रुजतात व अंकुरतात.........
*
स्पर्ष प्रेम व्यक्त करण्याचे प्रभावि साधन आहे..जि भावना अनेक शब्दात तुम्हि व्यक्त करु शकणार नाहि ते काम एक हळुवार स्पर्ष करुन जातो...स्पर्षाने मानसिक व शारीरीक बंधने संपतात...व एक निराळा प्रेम संवाद सुरु होतो........
*
ज्या कुणावर प्रेम करीत असाल त्यास मुक्त सोडा, मोकळीक द्या...बंधनात अडकवु नका...त्यास जायचे तिकडे जावु द्या..जर ते प्रेम तुमचेच असेल तर तुमच्या कडे नक्किच परत येईल,आणी जर आले नाहि तर ते तुमचे नव्हतेच..कधिच नव्हते..तो एक तुमचा भ्रम होता..बंधनात प्रेम फुलत नाहि....प्रेम म्हणजे एक भयमुक्त,अहंकार विरहित अवस्था..अनुभव........
*
जर तर,किंतु परंतु, च्या पलीकडली एक सुखद अवस्था,...प्रेम म्हणजे..आज पासुन मी भयमुक्त आहे,माझ्या भुतकाळातल्या घटना चुका,आता मला घाबरवु शकत नाहि अशी एक नविन भयमुक्त,आत्मविश्वास पुर्ण अश्या नव्या जिवनाची सुरवात.......
*
तुम्हि जर आपल्या साथिदारा कडुन अमर्याद प्रेमाचि अपेक्षा करीत असाल तर,त्याच्या प्रेमाशि,त्याच्याशी तुमचि बांधिलकी,प्रतिबध्ध्ता हवि,...व ति तुमच्या बोलण्यातुन वागण्यातुन,कृतितुन पदोपदि दिसावयास हवि...तुमच्या ह्या कमिट्मेंट मुळे, प्रेमास एक ताकद मिळत असते..व त्याचि गोडिहि वाढत असते...जेंव्हा कुणाच्या प्रेमाशि तुम्ही वचन बध्ध असता त्या वेळी त्यातुन सुटुन जाणे हा पर्याय कधिच नसतो...वचन बध्धते मुळे प्रेमाचे नाजुक बंधने अजुन मजबुत होतात........
*
एक मेका बद्दल वाटणारे आकर्षण हा प्रेमातला खुप महत्वाचा भाग आहे...ह्या आकर्षणा मुळे प्रेम फुलत रहाते..मनातुन शरीरा कडे असा हा अल्हादकारी,रोमांचक असा प्रवास असतो...ते शरीरा पुरते मर्यादित नसते तर तुम्हाला वाटणारा विश्वास,प्रेम,उत्साह,यातुन ये जागृत होत असते...प्रेम व सुखाचा तो एक असा सागर आहे ज्यात रोज बुडुन जायचे असते व जिवन जगायचे असते...जिवन समृध्ध पणे जगण्यासाठी ति एक प्रेरणा व मानसीक स्तरावर,आत्मीक प्रेमानुभव देणारी एक शक्ति आहे................
*
प्रेमात परस्परावरील विश्वासास खुप महत्व आहे...शंकेचा एक विचारहि तुमच्या साथीदाराच्या मनांत भिति, तणाव व खळबळ निर्माण करु शकतो..जर तुमच्या मनांत विश्वासाचि भावना नसेल तर प्रेमाची संपुर्ण अनुभुति तुम्हास कधिच मिळणार नाहि...आपल्या साथिदारावर प्रेम करताना त्याच्या मनांत "ह्याचे प्रेम अक्षय आहे" अशी भावना निर्माण होवु द्या.... प्रेमात वचन बध्ध होण्या पुर्वी स्वत:स विचारा कि "माझा त्याच्यावर/तिच्यावर पुर्ण १००% विश्वास आहे?" जर उत्तर हो असेल तरच पुढ्चे पाऊल टाका...नसेल तर पदरी निराशाच येणार नाहि का?...............
व्यक्त व्हा..व सहजिवनाची सुरवात करा व अक्षय आनंद अनुभवा....

हाय -कुणीतरी त्याला म्हणाले

हाय -कुणीतरी त्याला म्हणाले
त्याने मागे वळून पाहिले
पौराणिक सिरियल्स मध्ये घालतात तसे कपडे घालून तो उभा होता
आपण कोण आयमीन ओळखलं नाही आपल्याला
मी यमदूत आपल्याला घ्यायला आलो आहे
हे ऐकताच त्याला घाम फुटला
मला वेळ दे बायका मुलांना शेवटचं भेटू देत
ते शक्य नाही -मला अनुमती देण्याचा अधिकार नाही
पण लक्षात घे तु नेहमी ज्या खुर्चीवर बसतोस तिथे बसला कि तू तात्काळ गतप्राण होशील
समजा मी बसलोच नाही खुर्चीवर तर ?
तर तुला एक जीवदान मिळेल
समजा मी पळून गेलो तर ?
तसा विचार पण करू नकोस -ते अशक्य आहे
तो अंतर्धान पावला
जनरल स्टोर मध्ये माल देणे पैसे मोजणे त्याने चालू ठेवली
तेव्हढ्यात दुकानात ३ टपोरीं टाईप माणसे आली
गल्ले मे कितना रोकड है ?सूरी च पाट त्याच्या गेल्यावर टेकवत तो म्हणाला
मालूम नाही गिनना पाडेगा
गिनो और रोकडा इधर दो -गडबड कि तो गला काट दूंगा
पैसा गिनानेको टाइम लागेगा -तब तक ट भाई आप खुर्चीपे बैठो
ठीक है मेरे डॉ साथीदार दिल्या पक्या बाहर है उनको बुलाओ
त्याने तसे केले
बाही खुर्चीवर बसला अन तात्काळ गतप्राण झाला
अरे भाईको क्या हुवा ? दिल्या पक्या ओरडले
कूच नाही भाई को चक्कर आ गायिली है -उन्हे दवाखानने ले जाओ तो म्हणाला
ते रिक्षात बसून गेले
त्याने हुश्श्य करत श्वास सोडला
संकट टळले होते
आपल्या अक्कल हुशारीे वर तो खुश होता
*
नातवा सुना मुलांनी त्याचा एकसष्ठी चा कार्यक्रम दणक्यात साजरा करावयाचे ठरवले होते
सायंकाळी कार्यक्रम होता --सारे नातेवाईक मित्र मंडळी अभिष्ट चिंतना साठी येणार होता
दुपारी जेवण झाले अन त्या अंमळ डुलकी लागली
स्वप्नात तो आला होता
ओळखले का ?
तू ??
हो मी -आज तुझी आठवण झाली म्हटले भेटावे --
नको रे आज माझ्या घरी कार्यक्रम आहे -तुझी अमंगल छाया त्यावर नको -कुठला शहाणा माणूस तुला वेल कम करेल ?? तुझे अभद्र रूप भयावह वाटते -तू निघून जा -कर तोंड काळे
अरे तुझे अभिष्ट चिंतन करावयास आलो होतो पण माझ्या बद्दल ज्या भावना तुझ्या मनात आहे ते पाहून काढता पाय घेत आहे -आता तू बोलावलेस तरी येणार नाही
अभिष्ट चिंतना बद्दल धन्यवाद -पण आता तू निघ व परत येऊ
तथास्तु म्हणत तो गेला
तो खाडकन जागा झाला -अंग घामानं डबडबलेलं होत
आपण ठीक आहे हे पाहिल्यावर त्याला हायसे वाटले
स्वप्न होते तर ते ..म्हणत स्वताशे हसला
-
कार्यक्रम सम्पला
रात्रीचे दहा वाजायला आले होते
आजोबा कार्यक्रम मस्त झाला तुम्ही दमला असाल ना
हो ना दगदग सहन नाही होत -तुन्ही पण दमला असाल ना
आजोबा तुम्ही आता विश्रांती घ्या
हो मी जातो तुम्ही बसा गप्पा मारत बरेच दिवसांनी एकत्र जमला आहात
दाराकडे जात असताना तो धाडकन पडला
काय झाले बघण्या साठी सारे उठले
तो जमिनीवर निपचित पडला होता
त्वरेने त्याला हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले
दुस-या दिवशी डॉकटर म्हणाले
यांना अर्धांग वायू चा स्ट्रोक आला आहे
त्याच्या दोनही बाजू निकामी झाल्या आहेत
आता बेड रिडन अवस्था
-
तो आपल्या खोलीत भकास पणे पडला होता विचार करत
हलता येत नव्हते -मुश्किलीने कूस बदलदात येत असे मल मूत्र विसर्जन सारे अंथरुणात
एक मावशी ठेवली होती सेवेला
*
आता तो ८२ वर्षांचा झाला होता
खोलीचा नर्क झाला होता
मुले सुना सारे कंटाळले होते
घरात फिनेल चा उग्र दर्प कायम दरवळत असे
आजारा पडल्या पासून तो कायम देवाची करुणा भाकीत असे
२० वर्षे झाली पण देवास दया आली नाही
*
त्या रात्री तो आला -अरे काय तुझी अवस्था -बघवत नाही हाडाचा सापळा झाला आहेस नुसता --घाबरू नकोस मी आलो आहे तुला न्यायला-कायमचा ह्या त्रासातून सोडवायला
अरे मित्रा मी रोज तुला बोलावत होतो -पण तु आाला नाहीस २० वर्ष मी यातना सहन करत आहे
तो हसला
मला खूप यावेसे वाटत होते -पण तूच म्हणाला होतास मला वेल कम करणार नाही
म्हणून नाही आलो अपमान करून घ्यायला
तो काहीच बोलला नाही डोळ्यातून अश्रू ओघळत होते
दूताने फास आवळला -प्राण पाखरू कुंडीतून उडून गेले
*
सकाळी सोसायटीत बातमी पसरली
सुटला एकदाचा हे सारे जण म्हणत होते
*
मृत्यू किती मजेदार गोष्ट आहे
काहींना ती हवी असते
काहींना नको असते
पण मृत्यू हवे नको च्या पलीकडे असतो
वेळ झाली कि तो येतो व आपले काम चोख बजावतो

Tuesday, June 28, 2016

अग अग म्हशी
...............
एका गावत एक ब्राह्मण रहात असतो..
पत्नि व २ मुले असतात..बंड्या अन काशी
थोडी शेति असते .. जुने घर..परसदारी २ म्हशी पाळल्या असतात..
शेति व भिक्षुकी करत उदर निर्वाह करत आसे..
पुरोहित तसा प्रेमळ असतो पण स्वभावाने अति कोपिष्ट व रागीट असतो..
एव्हढ्या तेव्हढ्या कारणावरुन चिडत असे ..व रागवत असे..
बायको बिचारी गरीव व मुख दुर्बळ असते..
ति उलट बोलत नसे..मात्र हा ब्राह्मण तिला " संन्यास घ्यायला जात आहे" अश्या धमक्या देत असे.
संन्यासाचे नाव काढले कि ति भार्या व मुले घाबरत असे..पतिने जर संन्यास घेतला तर आपले व मुलांचे कसे होणार ह्या काळजिने घाबरत असे..
मग मुले व पत्नि त्याची विनवणी करत.."बाबा नका ना घेऊ संन्यास" असे मुले व पत्नि म्हणाली व राग शांत झाला कि मग तो ताळ्यावर येत असे...
पुन्हा ७-८ दिवस झाले कि हाच तमाशा..बायको ह्या प्रकरणाला विटली होति..ति सारे त्याच्या मनासारखे करत असे पण हा काहितरी खुसपट काढुन भांडत असे..
नव~याने संन्यास घेतला तर आपले कसे होणार या काळजिने ति खंगत चालली होति.
एकदा दुपारी ति शेजारणी कडे कामा साठी गेली..तिचा उतरलेला चेहरा बघता शेजारणीने "काय झाले" असे म्हणत विचारपुस केली..
त्या वर ति म्हणाली..आहो काय सांगु आमचे हे खुप रागीट आहेत..जास्त बोलले कि "मी संन्यास घेतो" असे म्हणतात..त्यानी संन्यास घेतला तर आमचे काय होणार या भितिने मी कायम काळजित असते..काय करावे तेच समजत नाहि....
शेजारिण हुशार असते ति म्हणते..अग एव्हढेच ना?? मग नको काळजी करु..संन्यास घेणे एवढे सोपे नाहि ..१ दिवसात पळुन येईल तुझा नवरा तिथुन..परत म्हणाली कि त्याला सांग खुशाल जा संन्यास घायला"
हे ऐकताच त्या ब्राह्मणाच्या बायकोस धिर आला.....
.
पुढे ३-४ दिवसात परत नवरोबाच्या अंगात आले..छोटेसे कारण होते पण तो भयंकर रागवला..पत्नि काहिच बोलली नाहि..त्या मुळे हा आणखिनच चिडला व म्हणाला.. " मी जातोच सन्यास घ्याला सन्यास घेतल्यावर तुमचे डोळे उघडतिल...या वर ति भार्या म्हणाली कि "काय बोलणार आपणास जे योग्य वाटते ते करावे"...
पतिच्या या उत्तराने ब्राह्मण आणखिनच चिडला व म्हणाला बस्स ठरल..आता जातो मी सन्यास घ्यायला...
.
त्या क्रोधित पतिने अंगावर सदरा चढवला..पायात पादत्राणे सरकवली अन तो ताडताड घराबाहेर निघाला.
गावाबाहेर एक मठ होता त्या ठिकाणी हे महाशय पोहोचले..
मठात गेल्यावर त्याने मठाधिपतिला नमस्कार केला व म्हणाला" स्वामी मि संसारास कंटाळलेला एक जिव आहे मला सर्वातुन मुक्ति हवि आहे व मला सन्यासी बनुन सन्यस्थ जिवन जगायचे आहे.."
आपले मठात स्वागत आहे..आपल्या सारख्या जिवासाठीच हा मठ उघडला आहे..पण त्या साठी आपणास एक महिना मठात रहावे लागेल व मठाचे नियम काटेकोर पणे पाळावे लागति.व मग दिक्षा मिळाली कि आपण सन्यस्थ जिवन जगु शकाल..व त्याची आज पासुन सुरवार करु यात... मठाधिपति म्हणाले
मात्र तुला मठाचे नियम पाळवे लागतिल त्यात हयगय खपवुन घेतली जाणार नाहि..
त्याला त्या ब्राह्मणाने होकार दिला
.
आज तु आश्रमाचे सारे आंगण झाडुन काढायचे त्या नंतर नदिवर जाऊन आश्रमासाठी पाणी भरु ठेवायचे ..हे ऐकताच त्या ब्राह्मणाच्या पोटात गोळा आला.कधी इकडची काडि तिकडे करायची वेळ त्या वर आलेली नव्ह्ति..पण हे आदेश ऐकताच तो घाबरला..
आणी हो..स्वामी पुढे सांगु लागले.कि हे कामे झाल्यावर भोजनाची वेळ होईल...
जेवण ..जिव्हा..जेवणातले विविध रस हे मानवाच्या -हासाचे प्रमुख कारण आहे त्या मुळे त्या मुळे त्याव वासनावर विजय मिळवण्या साठी आम्हि एक खास कार्यक्रम केला आहे.जेवणात विविध रस असतात.. त्या बद्दल तिटकारा घृणा निर्माण होणे गरजेचे असते..त्या साठी तुला रोज नवरसाची जेवणे दिलि जातिल..जसे आज तिखट हा रस आहे.. कवठा एव्हढा तिखटाचा गोळा चतकोर भाकरिबरोबर तुला संपवायचा आहे..उद्या कडु रस ..त्या साठी कडुलिंबाचा गोळा व भाकरी असा कार्यक्रम चालत राहिल..ज्या योगे तु सर्व या मोहापासुन मुक्त होशिल...
.
हे ऐकताच त्या ब्राह्मणाला घाम फुटला..सारे आयुष्य त्याचे आरामात गेले होते..रोज सुग्रास जेवण सेवा करणारी पत्नी हे सारे आठवताच त्याचे मन गलबलुन जाते.स्वामिच्या कचाट्यातुन तो कशिबशी सुटका करुन घेतो बाहेर येतो व काय करावे त्याला कळेनास होते..विचार करत तो तडक तसाच बाहेर पडतो व गायरान असते तिथे जाऊज एका झाडाखाली बसतो..प्रसंग तर बाका असतो..मारे फुशार्क्या मारत घर सोडलेल असते..घरी गेलो तर बायकोचे टोमणे खावे लागणार..ह्या विचारात असतानाच त्याला आपल्या म्हशिचे हंबरणे ऐकु येते..तो म्हशिकडे जातो व प्रेमाने तिच्या पाठिवर थाप मारतो..मालकाची थाप पडताच ति आनंदते व मालकास चाटु लागते..
.
चरणे झाल्यावर म्हैस निघते..ब्राह्मणाच्या डोक्यात कल्पना येते व तो तिचे शेपुट धरतो व घरी जाण्यास निघतो..मात्र रस्त्यात"अग अग म्हशी मला कुठे नेशी" म्हणत असतो..
म्हैस घरी येते तिचे हंबरणे ऐकताच पत्नी बाहेर येते समोर पतिस पहाते..पण त्या कडे लक्ष न देता म्हशिस गोठ्यात बांधण्यास नेते...
इकडे भटजी बुवा घरात येतात..मुले पण "बाबा आले बाबा आले " म्हणत त्याल्या लडुन पडतात..
पत्नी पण ते द्रुष्य पाहुन मनातुन आनंदित झालेली असते..
"बाबा बाबा तुम्हि सन्यास घायला गेला होतात ना पण मधेच कसे परत आलात?" मुलगा विचारतो..
पत्निकडे पहात बाबा म्हणतात" अरे तुला काय सांगु? मधेच आपली म्हैस भेटली..तिला कसे कोण जाणे कळाले कि मी सन्यास घ्यायला चाललो आहे..तिने शेपटिचा विळखा माझ्या हाताला घातला व मला ओढत ओढत घरी आणले.तरी मी तिला म्हणत होतो"अग अग म्हशी मला कुठे नेशी " पण ति ऐकेनाच माझे...मग माझा पण नाईलाज झाला..व घरी आलो..
.
हे ऐकताच पत्नी खुदकन हसली व म्हणाली..असु देत पाणी गरम आहे स्नान करुन घ्या तुमची आवडति भरली वांगी केली आहेत.. स्नान करा मी गरम भाकरी करते व जेवायला बसा..
हे ऐकताच पति मनातुन खुष झाला..स्नान करुन आला तर मुलांनी पाट पाणी केलेलेच होते..वांग्याची भाजी गरमागरम भाकरी लोणी ताक..फक्कड बेत होता..मुला समवेत भोजन करतो.
.
संन्यासाचा अनुभव घेतल्याने ब्राह्मण निवळला होता त्याचा राग हि कमी झाला व तो सुखाने संसार करु लागला ..
मात्र बायको वेळ आली कि त्याल संन्यास या वरुन टोमणे मारित असे
समन्वय व ताळमेळ


एका गावात एक तरुण मुलगा रहात होता त्याला २ बहिणी होत्या
एकुलता एक भाऊ असल्याने २ न हि बहीणी ची भावा वर माया असते..
तिघेहि गरीबीत दिवस काढत असतात
भावाचे लग्न ठरते ..मुलगी गरीब घरची असते ...
लग्ना निमित्त भावास एक नवा शर्ट व प्यांट शिवण्याचे ठरते..व त्या प्रमाणे शिवायला टाकतो
नेहमी प्रमाणे शिंपी महाराज आज देतो उद्या देतो असे करत शेवटी कसेतरी ्लग्नाच्या आधल्या दिवशी रात्री ८ वाजता कपड्याचे पार्सल त्या तरुणाला देतो..
घरी आल्यावर बहिणी वाट पहात असतातच..व त्या म्हणतात आधी जेवुन घे...
जेवण गप्पा करत चालले असते ते झाल्यावर बहिण म्हणते बघ तरी कपडे कसे झाले आहेत..
मुलगा शर्ट घालतो तो व्यवस्थित शिवलेला असतो..पण पॅंट घातल्यावर लक्षात येते कि शिंप्याने पॅंट एक फुटभर लांब शिवली आहे..
बहिण नाराज होते ..पण ईलाज नसतो रात्र झाल्याने दुकान हि बंद झाले असते..पण भाऊ म्हणतो मी पॅट फोल्ड करुन घालीन व लग्न झाले की आपण पॅंट दुरुस्त करुन आणु..
दुसरे दिवशे सकाळचा मुहुर्त असल्याने सारे निद्रेच्या आहारी जातात..
्रात्री एक वाजता बहिणीस जाग येते व तिला भाऊ अशी फोल्ड केलेली पॅंट घालणार हे पटेना म्हणुन ति कपाटातु पॅंट काढते व १ फुट कापुन कमी करते व कपाटात ठेवते..व शांतपणे झोपते.
दुस~या बहिणीस २ वाजता जाग येते व तिला हि पॅंंट ची कथा माहित असल्याने ति उठते व कपाटातु पॅंट काढते व १ फुट कापुन कमी करते व कपाटात ठेवते..व शांतपणे झोपते....
सकाळी उठल्यावर अंघोळ झाल्यावर भाऊ शर्ट घालतो व पॅंट घातल्यावर पहातो तो काय त्याची बर्मुडा झालेली असते..
काय करणार? बर्मुडा घालुन तसाच लग्नाला उभा रहातो...
समन्वय व ताळमेळ नसले कि असे होते .......
प्रेम

बस स्टॉप दृष्टी क्षेपात आला कि तो मोटर सायकलचा वेग कमी करत असे..
तिथे ति नेहमीच्या वेळी बस ची वाट पहात उभी असायची....
आपल्याच विचारात...जणु तिचा या जगाशी फारसा संबंधच नाहि या अविर्भावात
तशी छानच होति दिसायला....
कपडे पण कधी जिन टॉप...कधी ड्रेस तर कधी फुलाफुलाची साडी
शोभायचा तिला कोणताहि ड्रेस वा साडी.......
काहि व्यक्तिमत्व अशी असतात कि ति दिसली तरी जिवनात आनंद लहरी वाहु लागतात..
त्या पैकि ति एक होति.....
त्या साठी त्याने लांब असला तरी हा रुट निवडला होता......
मात्र गेले २ आठवडे ति स्टॉप वर दिसली नाहि. बेचैन झाला
ति बरी तर असेल ना? का काहि अडचणीत असावी या विचाराने त्याचा जिव कासाविस झाला...
त्याने तिच्या नेहमी बाजुला एक काका उभे असत त्यांना विचारले
हल्ली ति दिसत नाहि.... काहि प्रोब्लेम असेल का तिला??
"कोण नेहा प्रधान? अरे तिच लग्न झाल...अमेरिकेला जाईल वा गेली पण असेल....
तो काहिच बोलला नाहि... गीअर टाकला अन निघुन गेला...
त्याने तो रस्ताच वर्ज केला......
खर आहे....जिस गलीमे तेरा घर ना हो साजना उस गलीसे हमे यु गुजरना नहि.....
प्रेम असच वेड असत...त्याला लोजिक नसत।
दोन लघुतमकथा ..
..........................
१)एका लहानशा खेड्यात तो एकान्तवासांत राहतं होता...
साथीला त्याचा लाडका इमानी कुत्रा...
पुढे तो महानगरात शिफ्ट झाला..
महानगर म्हणजे वेगवान जीवन..माणसांची गर्दी..
तो हळूहळू माणसात मिसळू लागला...
जस जसा तो माणसात मिसळू लागला संवादु लागला....
तसतसे त्याला आपला लाडका कुत्रा जास्त आवडू लागला
.........
२)तरुणपणीच त्याला असाध्य अश्या हृदय विकाराचा रोग मागे लागला..
सकाळ दुपार संध्याकाळ गोळ्या घेत आयुष्य कंठत होता....
आईस खूप काळजी वाटायची. तो कंटाळा करायचा म्हणून आई त्याला आठवणी ने गोळ्या देत असे..गोळ्या घेण्याची आठवण करून देत असे...
.
कामानिमित्त त्याला प्रथमच परदेशी जावे लागले....
विमानाने उड्डाण घेतले व एअर होस्टेस त्याच्या जवळ आली व म्हणाली..." थेट मागच्या सिटवर तुमची आई बसली आहे तिने मला तुम्हाला निरोप द्यायला सांगितले की परदेशी निघाला आहेस औषधाच्या गोळ्या न चुकता घे म्हणून.." व ति निघून गेली...
त्याने पाऊच मधून गोळी काढली व घेतली..व त्याच्या डोळ्यांना अश्रूंची धार लागली..
.
आईचा मृत्यू होऊन आता वर्ष लोटले होते..
असो जिवंत वा मृत ......आई तुमची कायम काळजी घेत असते

३ सूत्रे
हरयाणात हिस्सार रोड वर "लक्ष्मी प्रिसिजन" नावाचा एक कारखाना आहे..तिथे कामानिमित्त गेलो होतो कारखाना चालु असताना...
तिथे गुप्ता नावाच्या एका बनिया समाजातल्या माणसाशी ओळख झाली व गप्पा सुरु झाल्या...
हा समाज व्यावसायिक असल्याने त्याने ३ सुत्रे सांगीतली...
१...साथी साथका..पैसा पास का..
२..वो सोना कीस कामका जो कान को काटे.
३..देन सच लेन झुटी...
त्याचे निरूपणं असे...
१...साथी साथका..पैसा पास का....आपणास अनेक दादा राम राम करणारे मित्र असतात..पण खरा मित्र तोच जो अडचणीच्या वेळी साथ देतो..नाहि तर म्हण आहेच.."फेसबुकावर हजार मित्र..बाहेर विचारत नाहि कुत्रं"
पैसा पास का....म्हणजे व्यवसायात उधारी असते..अनेकांचे येणे यायचे असते..
पण चेक हातात पडून वटे पर्यंत ते येणे कागदावर असते..पैसे तेच खरे जे घरच्या कपाटात असतात..अन्यथा ह्याच्य कडूनं ४ लाख.त्याच्या कडूनं १.५० लाख..इत्यादी कागदावर....
२...वो सोना किस कामका जो कान को काटे.....
व्यवसाय सुरू करताना माणूस अनेक आशा आकांक्षा बाळगून सुरू करत असतो..मी यव करेन त्यव करेन अशी जिद्द असते.पण अनेक अडचणी येतात,,
व्यवसाय जमत नाहि..कर्ज होते व धंदा डबघाईला येतो..अश्या वेळी माणसाचा जीव /भावना व्यवसायात अडकलेल्या असतात..आशा सुटत नाही..
पण अश्या वेळी असला बुडीत धंदा भावना बाजूला ठेवून विकून टाकून मोकळे होणे शहाणपणाचे..
कानातले सोन्याचे कर्ण भूषणं छान दिसते पण त्याच्या वजनाने कानची पाळी ओघळत असेल व त्रास होत असेल ते बाजूला काढणे शहाण पणाचे
३..देन सच लेन झुटी.....
व्यवसायात लेन देन असती..(डेटर/क्रेडिटर)...
व्यवसाय करताना आपली नियत साफ असते..देणेक-याचे पैसे आपण प्रसंगी पोट मारुन चुकवतो..पण ज्याच्या कडूनं येणे असते त्याची नियत काय आहे हे आपल्याला माहीत नसते..प्रसंगी अडचण आल्यास तो हात पण वर करू शकतो..
त्या मुळे "देन सच लेन झुटी..."
व्यवसायात अनेक प्रकारचे लोक्स भेटतात अनेक अनुभव येतात..त्या पैकी हा एक
मित्र
तो रिटायर्ड झाला अन त्याला सोशल नेटवर्क आवडु लागले
कथा कविता..काहि अनुभव तो लिहित असे..
फेसबुका वरच्या पोस्टा वाचत होता..अन तेव्हढ्यात "तो" आला
हॅलो..तो म्हणाला.
तु??
हो मी च ....ओळखले का मला?
तुला कोण विसरणार्? ऍट्याक आला होता.. आय सी यु त ऍडमीट असताना कायम माझ्या भोवति तु उभा असायचास...
आता काय विषेश?..तो म्हणाला...
काहि नाहि..चला आमच्या बरोबर..वेळ भरली आपली...
थांब ना...एक कथा अर्धवट राहिली ती पुरी करतो...मग निघुच..
छे रे...तस नाहि जमणार....
एक सुंदर कविता एकाने लिहिली आहे तीला लाईकतो...
नको ..मी वेळ चुकवु शकत नाहि...ठरलेली..असे म्हणत त्याने त्याला हाताला धरुन ओढले...
...
त्याच्या हातातला माऊस निसटला..डोके दाणकन कॉंप्युटर च्या टेबलावर आदळले..
............
४ च्या सुमारास तीने चहा केला अन तिथुनच सांगीतले.."चहा तयार आहे..येताय ना हॉल मधे?
त्याचा काहिच प्रतिसाद न आल्याने ती त्याच्या खोलित गेली...
टेबलावर डोके टेकवुन तो बसला होता..
तिने त्याला हलवत म्हटले...उठा अन हे काय ?ही काय झोपायची जागा का आहे?
चहा तयार झालाय..
तो काहिच बोलेना पहाताच तिने त्याला खुर्ची वर बसत केल अन त्याची पाठ खुर्चीला लागली अन डोके निर्जीव पणे डावी कडे झुकले..
काहितरी अघटीत असल्याची शंका मनाला आली अन तिने आकांताने टाहो फोडला...
सोसायटीतले शेजारी पाजारी जमले ..
त्यात एक वयस्कर डॉ्क्टर होते त्यानी तपासले अन मान हलवत सांगीतले.."खेळ संपला"
पुरुष मंडळीनी बॉडी जमीनीवर ठेवली..
जाणते अनुभवी लोक पुढच्या तयारीला लागले...
सुन्न पणे ती सारे बघत होती..
....................
फेसबुका वरचे एक अकाऊंट पोरके झाले
माधव न्याशनलाईझ ब्यांकेत कामाला होता...
वडलोपार्जित ब्लॉक..वडील देवाघरी गेलेले होते..
घरात फक्त आई अन तोच राहायचा..
माधव चे लग्नाचे वय झालेच होते..१-२ मुली पण पाहिल्या होत्या पण त्याला पसंत नाही पडल्या...
*
दुपारच्या वेळी शेजारच्या जोशी काकू गप्पा मारायला आलेल्या होत्या..
गप्पा गप्पात जोशी काकूने सुचवले..म्हणाल्या की.."माझी दूरची साठे नावाची आते बहीण आहे तिची माधवी नावाची मुलगी लग्नाची आहे...चांगले लोक आहेत...मुलगी बी कॉम झाली असून आता कॉम्प्युटरचा कोर्स करत आहे..नाकी डोळी नीटस आहे.. आपल्या माधव साठी स्थळ बघायचे का?"
हरकत नाही..मुलगी व परीवर तुमच्या नात्यातला व पाहण्यातला आहे .." आई म्हणाल्या...
*
रात्री आई ने माधवाजवळ विषय काढला माधवाने पण मुलगी बघण्यास संमती दर्शवली...
*
साठ्यांच्या घरी "कांदे पोहे" प्रोग्राम झाला..माधवी दिसायला सुंदर होती..शिवाय संस्कारी परिवार होता...
माधवाला माधवी आवडली..व त्याने आपला होकार कळवला
*
माधवी ला पण माधव पसंत होता..माधवचा होकार येताच साठे परिवाराचे मन "गार्डन गार्डन" झाले.
योग्य मुहूर्त पाहून माधव व माधवी विवाह बंधनात अडकले व संसार रथ मार्गक्रमण करू लागला..
*
वटपौर्णिमेचा दिवस होता..माधवी ची पहिली वटपौर्णिमा...माधवी फार आधुनिक पण नव्हती वा फार पारंपरिक..तिने लहान पणा पासून आईस वड पुजताना पाहिले होते कथा पण ऐकल्या होत्या..पण आज तिला पुजा करायची होती..
माधवी नटली होती..नाकात नथ व अंगावरील अलंकाराने तिचे उपजत सौंदर्य खुलले होते..
माधव ने तिला पाहिले व या रूपांत पहाताच माधव चकित झाला..
"खूप छान दिसते आहेस"..माधव म्हणाला..ति गोड हसली..
चला म्हणजे आता सात जन्म अशी बायको मिळणार यावर शिक्का मोर्तब झाले म्हणायचे...माधव हसत म्हणाला...
अरे सात जन्म का? मला तू खुपा आवडतोस ..आपले नाते जन्म जन्मांतराचे आहे..तू कुठेही असलास तरी तुला माझ्या कडे खेचून आपणण्याचे सामर्थ्य माझ्या प्रेमात आहे..."माधवी म्हणाली...
अग तू नुसती साद घाल आहे तिथून तुझ्या कडे येईन " माधव हसत म्हणाल...
बोलायला तू अस्सा आहेस ना? चल सोसायटीतल्या बायका माझी खाली वाट बघत असतील...पूजेसाठी" असे म्हणत माधवी गेली.
*
सायंकाळी ऑफिस मधून माधव आला..गरमागरम चहाचा कप माधवी न माधवला दिला..ती जवळ येताच त्याला "अमृतांजन"चा उग्र वास दरवळल्याचे जाणवले...."का गं?? बर नाही का? डोके दुखते का?
नाही रे थोडं दुखत आहे सकाळापासून..गोळी घेतलीय.....माधवी म्हणाली..
*
सकाळी उठल्यावर माधवने विचारले कसे आहे डोके???
नाही रे अजून दुखतेच आहे...माधवी..
काळजी घे आराम कर...
*
१-२ दिवस गेले पण डोके थांबण्याचे नाव घेईना..
आता मी तुझं ऐकणार नाही अजिबात गेली ३-४ दिवस बघतोय..चल आधी दवाखान्यात जाऊ...माधव म्हणाला
अहो किरकोळ आहे थांबेल...माधवी...अजिबात नाही तयार हो आपण दवाखान्यात जातोय...माधव निर्वाणीचा आदेश दिला अन माधवी तयार झाली....
*
माधव तिला घेऊन नेहमीच्या डॉक्टर कडे गेला.त्यांनी तपासले व चिठ्ठी लिहितं म्हणाले मला वाटते तुम्हाला काही टेस्ट कराव्या लागतील ..अस करा तुम्ही "दीनानाथ" मध्ये जा..व या डॉ. ना भेटा...."
डॉक्टर काही काळजीचे कारण तर नाही ना? माधवाने विचारले..
तुम्ही रिपोर्ट आणले मी सांगू शकेन...वा तिकडचे डॉक्टर सांगतील.
*
माधव माधवी ला घेऊन दीनानाथ मध्ये गेला...
डॉक्टरने सा-या टेस्ट्स केल्या...रिपोर्ट आले..त्यांनी माधवला एकट्याला आत बोलवून घेतले.
माधव..माधवी चे सारे रिपोर्ट्स मी पाहिले..तिच्या मेंदूवर एक मोठा फोड वा पुळी आली आहे..ऑपरेशन हाच एकमेव मार्ग आहे...डॉक्टर म्हणाले..
माधव मात्र हे ऐकून घाबरला....तसं घाबरायचं कारण नाही...पण ति पुळी काढणे आवश्यक आहे..
केव्हा करावे लागेल हे ऑपरेशन?/
लवकरात लवकर अगदी उद्या सुद्धा..वेळ दवडण्यात अर्थ नाही....
डॉक्टर मी बोलतो अन १०-१५ मिनिटात तुम्हाला सांगतो..तिच्या आई बाबांना कल्पना देतो..
शुअर.. डॉ. म्हणाले
*
माधवने आईबाबा ना फोन केला व जवळचा एक मित्र होता त्याला पण फोन करून बोलविले..
सारे आले..
आईबाबांना धक्काच बसला..माधवी ला पण काय करावे कळत नव्हते..शेवटी सर्वांनी चर्चा करून ऑपरेशन उद्याच करावे असा निर्णय घेतला व डॉक्टरांना कळवला....
आम्ही आमच्या कडूनं प्रयत्न करूच..शिवाय ऑपरेशन झाल्यावर त्यांना आराम पण वाटेल डॉक्टर म्हणाले...
*
माधवी ला ऍडमिट करून घेतले...
माधव तिच्या बेडजवळ बसून होता..बघ ना अचानक काय झाले ते...माधवी म्हणाली..
काळजी नको करूस तू ठीक होशील...माधव ने तिला धीर दिला...मला जगायचं आहे रे..तुझ्या सोबत...माधवी म्हणाली
माधवी तुला काही होणार नाही....
*
११ च्या सुमाराला माधवीला ऑपरेशन थिएटर मध्ये हालवले..
बाहेर माधवी चे आई बाबा माधव ची आई मित्र माधव सारे प्राण कंठाशी आणून माधवीची वाट बघत होते..
डॉक्टर बाहेर आल्यावर सा-यानी त्यांना गराडा घातला..
माफ करा माधव..वर दिसणारी पुळी जरी लहान असली तरी क्यान्सर मेंदूत आत खोलवर पसरला होता...आम्ही नाही वाचवू शकलो
माधवी बॉडी थिएटर मधून बाहेर आली...
खेळ संपला होता..
माधव भकास पणे हताश होऊन सारे बघत होता...
*
काळ पुढे सरकत होता..माधव माधवी ची आठवण आली की व्यथित होत असे..
पहिले वर्ष श्राद्ध आले त्या वेळी माधवी चे आईबाबा ...साठे काका आले होते..
नाही म्हटले तरी दुःखाचा जोर ओसरलेला होता..
गप्पांच्या ओघात साठे काका म्हणाले..माधवराव..एक विचार व्यक्त करतो..माधवी गेली..ती ईश्वरेच्छा..ते आपल्या हातात नाही..तुम्ही तरुण आहात व उभे आयुष्य आपल्यापुढे वाढून ठेवले आहे..अशा वेळी साथीदाराची गरज असते..तुम्ही पुनर्विवाह करावा व नव्या आयुष्यास सुरवात करावी..आम्ही पिकली पाने केव्हाही गाळून जाऊ....
माधव काहीच बोलला नाही..मात्र "माधवीची खूप आठवण येते" असे म्हणाला..यावर काका म्हणाले मान्य आहे पण आठवणीवर आयुष्य जगता येत नाही..आपण सुज्ञ आहात..काय पटेल तो निर्णय घ्या.
काही दिवसातच माधव ने पुनर्विवाह केला..रेवती शी लग्न लावले व संसार सुरू झाला...
रेवती फार सुंदर नव्हती पण गृहकृत्य दक्ष होती...
*
आज वट पौर्णिमेचा दिवस होता..अनायासे माधवाला पण सुटटी होती..
तू पुजा करणार आहेस का आज? माधवने विचारले...
खरं तर माझा फारसा विश्वास नाही अश्या गोष्टीवर..पण तुम्हा म्हणत असाल तर करेन पुजा..पण उपास करणे जमणार नाही....रेवती म्हणाली...
हरकत नाही... केली तर आनंदच आहे नाही केली तरी हरकत नाही....माधव म्हणाला...
दुपारी रेवती तयार झाली..व म्हणाली मी तयार आहे चला आपण जाऊ वड पुजायला...
माधवने तिला एका वडाच्या झाडाजवळ नेले दुपारची वेळ होती..गर्दी पण नव्हती...
तू पुजा उरकून घे ..असे म्हणत तो बाजूला बाक होता त्यावर जाऊन बसला.
रेवती पुजा करू लागली अन अचानक वडाच्या झाडावरून एक स्त्री दणकणं खाली आली..तिचे केस पिंजारलेले होते डोळ्यात क्रुद्ध भाव होते..तिला पाहताच रेवती घाबरली...
तू माधवची दुसरी बायको ना? तिच्या आवाजात जरब होती...हो रेवती तत फफ करत म्हणाली पण तू कोण?/तुला पाहिल्यासारखे वाटते...
मी माधवी माधवची प्रथम पत्नी..त्याने मला ७ जन्म एकत्र राहण्याचे वचन दिले होते...
तिचा तो आवेश बघता रेवती घाबरली व चक्कर येऊन पारावर पडली...
तिथून माधवी माधव कडे आली तो मोबाईल वर मेसेज वाचत होता...
माधव..असे म्हणताच त्याने समोर पाहिले माधवीला पाहताच तो आश्चर्य चकित झाला...तू????
हो मी च...आठवतंय ना ७ जन्म एकत्र राहण्याचा आपला संकल्प होता...
माधव नखशीकांत घामाने डबडबला होता...
हो पण तूच सोडून गेलीस...चाचरत माधव म्हणाला...
अरे पण वड पुजला आहे..त्याचे बळ माझ्यात आहे..तुला आठवते.तू म्हणाला होतास.."खूप छान दिसते आहेस"..त्यावर मी गोड हसले
चला म्हणजे आता सात जन्म अशी बायको मिळणार यावर शिक्का मोर्तब झाले म्हणायचे...तू हसत म्हणाला...
अरे सात जन्म का? मला तू खूप आवडतोस ..आपले नाते जन्म जन्मांतराचे आहे..तू कुठेही असलास तरी तुला माझा कडे खेचून आपणण्याचे सामर्थ्य माझ्या प्रेमात आहे..."असे मी म्हणाली...
अग तू नुसती साद घाल आहे तिथून तुझ्या कडे येईन " हे तुझेच शब्द आहेत ना???
जर सावित्री मृत्यू लोकातून सत्यवानाला इहलोकात परत आणू शकते तर मग मी तुला मृत्युलोकात का नाही घेऊन जाऊ शकत...असे बोलत ती विकटपणे हसली
माधव तिचे बोलणे ऐकून घाबरला...नको गं ..मी इथेच बरा आहे...
नाही..ति डोळे विस्फारत म्हणाली तुला माझ्या बरोबर यावेच लागेल असे म्हणत तिने त्याचा हात धरला...
अन दोघेही इहलोकातून अंतर्धान पावले.
*
थोड्या वेळातच रेवती शुद्धीवर आली..तिने आकांताने माधवला हाक मारली..पण ओ आली नाही..
ति पारावरून खाली उतरली..पण माधव दिसेना तिने बरेच शोधले..व कंटाळून घरी आली..
सर्व ठिकाणी तिने माधव चे चौकशी केली पण माधव सापडेना..ति भय कंपित झाली..
शेवटी तिने पोलिस ठाण्यात "मिसिंग " ची तक्रार नोंदवली..
बरेच दिवस ति ठाण्यात चकरा मारत होती..पण माधव सापडला नाही...
*
अमावास्येची रात्र होती ..रेवती झोपली असताना साधारण १२-१२.३० च्या सुमारास तिला जाग आली.
बेडरूम एकदम थंड पडली होती..बहुतेक खिडकी उघडी राहिली असावी असे म्हणत ति उठली..
कोप-यात एक पांढरी आकृती उभी होती..
ति घाबरली तिने नाइट दिवा लावला....
कोप-यात एक व्यक्ती उभी होती..सारे शरीर त्याचे सुताच्या धाग्याने गुंढाललेले होते फक्त चेहरा उघडा होता..
तिने पाहिले तो माधव होता ....चेहरा भयानक झाला होता ती किंचाळणार तेव्हढ्यात माधव म्हणाला.......
रेवती मी माधव आहे..आता मी या जगात नाही..माधवी ने सुताच्या साहाय्याने मला जखडले आहे...माझा शोध घेणे थांबव...मी निघतो..." असे म्हणत ति आकुती वायू रूपाने खिडकीतून बाहेर गेली..व सुताचा ढिगारा कोप-यात कोसळला..
हे सारे बघताच रेवतीची शुद्ध हरपली...
तिच्या मुखातून"माधव तू कुठे आहेस" एव्हढेच शब्द निघाले...

Monday, June 27, 2016

जग हे मधुशाला
कुणी न येथे भला चांगला, जो तो पेदाड झिंगलेला

ज्याची त्याला प्यारी बाटली
बाटली तले सखे सौंगडी
देशी असो वा विदेशी, प्रिय हो ज्याची त्याला

जो तो अपुल्या जागी लुडके
नजर न धावे चकण्या पलीकडे
गिल्लासातले सारे बेवडे पिवुनी करिती लीला

कुणा न माहीत किती ढोसले ते
कोठुन आलो ते नच स्मरते
उता-याला मन घाबरते, जो आला तो रमला