Wednesday, January 10, 2007

बाला




बाला
ति आली नवथर सुंदर बाला
घातला कि काळजावर घाला
केले ह्रुदय कायमचे घायाळ
झुरणीस लागला हा देह तिळतिळ

तो सुंदर लाजरा मुखडा,
ते नयन चेटकी, जादुंचे ग
रसाळ ओठांची महिरप,
आत, दतपंक्ती कि मोती ग?

तनुवर उरोज कूंभे डौलदार,
तिथेच फसलो जिव झाल ठार.
मोहास पडलो बळी, कसा मी फसलो
ह्रुदयाची पार दशा करुन बसलो,


दे चुंबन,आलिंगन सुंदरी आता
निकामी काळजास हेच औषध आता,
तव मनांत अन देहात मिसळुन जावे,
तव समागमाने, जिवनाचें सार्थक व्हावें.