लक्ष माझें हटेना,
लक्ष माझें हटेना,तव सुंदर चेहे~या वरुनि,
लक्ष माझें हटेना,
काळी काचोळी, आत यौवन,
मन तेथुन हालेना,
प्रेम तुच, काम तुच,
रंग तुच, गंध तुच,
तुच प्रीति, तुच माया
तुच प्रित, तुच गीत.
कसला करते विचार
पाप पुण्य, विसर सारे,
ये माझ्या बाहुपाशांत,
विसरशील जग सारे.
अनावृत देह तुझा
जादुची किमया असे,
तुझ्या प्रीति पुढें,
सारे सुख फिके असे.
आलिस मिठीत जेंव्हा
काम गंघांची करीत उधळण.
लक्ष कंपने देहात,
मिसळता देह देहात.
तुझे तारुण्य अन यौवन
प्राशतो मी कण नी कण,
ओंजळीत दिले मी तुजला,
तृप्तिचे लक्ष लक्ष क्षण
1 comment:
khupach chhan
Post a Comment