Wednesday, June 20, 2007

तुझ्या रुपात मन कैद माझे झाले.
तो कविता वाचत होता.
"गप रे" ति वैतगली होति.
जरा सिरीयस बन. २ वर्षे झालीत..
बाबा मागे लागलेत लग्नासाठी..

माझा हो कळव.. तो हसत म्हणाला..
अन काय कळवणार? तुला ना नोकरी,
ना काहि व्यवसाय. अरे लग्न म्हणजे गंमत नाहि.
अग गंमतच आहे. लग्न म्हणजे सहजिवन, प्रेम,
एक मेकात आडकण.लग्न म्हणजे संलग्न.

वेडा आहेस. अरे लग्न म्हणजे संसार,
म्हणजे घर, दुध, किराणा, मुल, म्हणजे पैसा..ति म्हणाली
हातात हात तुझा, अन तुझी साथ. पैसा येइल. येतो. तो म्हणाला
पैसा म्हणजे परसातल प्राजक्ताच झाड नाहि.
हालवल कि फुलांनी आंगण भरुन जात..तिन फटकारल..

अग पण, तो बोलायच्या आतच ति म्हणाली..
पैसा कि प्रेम हा वाद विवाद कालबाह्य आहे..
प्रेमाच्या जागी प्रेम आहे, अन पैसा त्याच्या जागि.
तु मल खुप आवडतोस.. पण तु मला विचार करुन निर्णय दे.
तिन अल्टिमेटम दिला..

१५ ऑगस्ट चा दिवस होता आज खिशात पैसे होते.
दिवस तिच्या बरोबर मजेत घालवायचा होता.
त्यान तिला फोन केला.बर झाल, फोन केलास,
मला पण तुझ्याशी बोलायच आहे.ति म्हणाली.
नो प्रोब्लेम.. ताज मधे भेटु. काय?.. ति उडालीच.

ताज च्या थंडगार वातावरणात, ति सुखावलि होति.
मग काय ठरल?.तिन विषयाला हात घातला.
तो बोलतच नव्हता. मी थांबु शकत नाहि.
हि आपली शेवटची भेट.. तिच्या बोलण्याला धार होति..

तो आतुन तुटत चालला होता..प्लिज..
अरे प्लिज काय? सारच कठीण आहे.ति म्हणाली.
मी निघते? ..प्लीज थांब, मला एक संधी दे..तो म्हणाला.
तु फक्त एक वर्ष दे मला, तुल पाहिजे तेवढा पैसा देतो...तो म्हणाला.

ति खळखळुन हसली." वेडा रे"अरे पैसा म्हणजे?...
आय नो. त्यान वाक्य तोडल."किति पैसे लागतात संसाराला?
लाखो रुपये ति म्हणाली..ठीक आहे. एक डिल.तो म्हणाला.
आपण पुढच्या १५ ऑगस्ट ला आपण इथच, ताज मधे,संध्याकाळी. ७ ला भेटु.
अन काय करु..तिन विचारल..
मी त्या दिवशी तुझ्या पायावर ७५ लाख रुपये ओतिल...तुला संसारा साठी.

त्या चित्रपटांत हिरो हिरॉइन ला नोटांनी अंघोळ घालतो तशी.अंघोळ घालीन...
तो हसत म्हणाला."मॅड आहेस." पण म्हणुनच तु मला आवडतो.ति..
पण वचन दे, वाट पहाशील म्हणुन.. तो म्हणाला.

ठिक आहे, पण ७५ रुपये तरी आणशील अस वाटत नाहि. ति हासली.

१५ ऑगस्ट.. तो तिचि ६ वाज ल्या पासुनच वाट पहात होता.
तेच टेबल होत, मागच्या वर्षीच, ति ये‌इल? तो अस्वस्थ होता
७ वाजायला आले होते, अन तेवढ्यात ति आत येताना दिसली.
तिच्याशी नजरानजर होतच त्यान हात हलवला.
हाश हूश करत ति समोरच्या खुर्चीवर बसली.

कशी आहेस? फार गरम होत आहे. पहिल पाणी पिते.
म्हणत उठुन ति त्याच्या समोरच्या ग्लास घ्यायल वाकली.
ति वाकली असताना, त्याला ब्ला‌उज मधे लपवलेल्या मंगळसुत्रचा पदर दिसला.
अग मी मागवतो म्हणेपर्यंत तिन ग्लास तोंन्डाला लावला होता.

अरे फार पाणी पाणी झाल होत.. हं आता बोल.
काय बोलु? तुच सांग. तिच्याकड बघत तो म्हणाला.
मग काय? कुठे आहे ७५ लाख? ति हसत म्हणाली..
त्याचा चेहेरा पड्ला होता., नाहि जमल, तु म्हणालीच तेच खर.
७५ लाख काय ७५ रु जमले नाहि. पैसा मिळवण कठिण आहे..

जा‌उ देत, मला माहित होत, ति समजावणीच्या स्वरांत म्हणाली.
मल पण तसच वाटत होते. पण म्ह्टल तुला शब्द दिला होता...
तो बघत होता..अजुन काय? पडलेल्या चेहे~यानि तो म्हणाला.
सांगु ति म्हणालि.. अरे माझ लग्न झाल, घरचे मागे लगलेच होते.
तो बॅन्केत आहे, १ बेडरुम च घर आहे... तुझ अस.. ति म्हणाली. सॉरी..

तुझ खर आहे., तु ठीकच केल, माझ्याबरोबर.... वायाच गेल असत.
तो म्हणाला.. ठीक आहे. मी निघते, तुला आता अस भेटण बर नाहि...ति.
बरोबर आहे. निघते.. ति म्हणाली.. तो तिच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता..

तो बराच वेळ तो बसुन होता. सार संपल होत.
रुम च्या नोकरानि टॅक्सीत सामान भरल..
सर कुठे? टॅक्सी ड्रायव्हर ने विचारले.
सहारा एयर पोर्ट. ईंटर नॅशनल टर्मीनल.


टॅक्सी वेगात चालली होति,
गार हवेच्या सपक्यान डोक शांत होत होत.
विमान तळावर टॅक्सी थांबली,
त्यान ट्रॉलीत लगेज भरल.व भाड देवुन तो निघाला,

सर,टॅक्सी ड्रायव्हर ने हाक मारली,
सर, तुमची बॅग राहिली आहे,
त्यान टॅक्सी ड्रायव्हर कड बघितल, अन म्हणाला
बॅग तुला राहु देत, त्यात ७५ लाख रुपये आहेत.
नाहितरी, मला आता त्याचा काहिच उपयोग नाहि,

ड्रायव्हर बराच वेळ त्याच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता

No comments: