Wednesday, June 20, 2007

माझे पपा..

माझे पपा..
पपा मला तुम्ही खुप आठवता,
पपा मला तुम्ही खुप आवडता,

मला आठवत,मी लहानपणी,
तुम्ही दाढी करताना बघत बसायचीं
अन नकळत, माझ्या गालाला, ब्रशन साबण लावायचा..
"करायची का दाढी," म्हणत चिडवायचें..
दाढी झाल्यावर तुमच्या गालाची, पप्पी घेतना,
दरवळणारा,ओल्ड स्पाइस, लोशनचा गंध,
अजुनही, मनांत दरवळतो आहे.

पपा मला तुम्ही खुप आठवता,
पपा मला तुम्ही खुप आवडता,

नाही,शब्द माझ्यासाठी नव्हता,
तुमच सा~याला हो च असायच.
सिनेमा हो, नाटक हो, पिकनिक हो,
पण तेव्हडीच करडी नजर, अन शीस्त.
तुम्हि स्वातंत्र्य दिले, अन त्याचा अर्थ हि दिला.
ति माया, शिस्त, आजहि धामन्यातुन वहात आहे.

पपा मला तुम्ही खुप आठवता,
पपा मला तुम्ही खुप आवडता,

लहान पणी तुम्ही शाळेत यायचा.
वर्गातल्या मैत्रीणी, म्हणायच्या,
तुझे पपा किति स्मार्ट आहेत..
पपा तुमचच सार रुप अंगावर घेतलय.
तेच संस्कार, तिच शिस्त,तेच प्रेम,
सारच तुमचच, आहे.पपा..

पपा मला तुम्ही खुप आठवता,
पपा मला तुम्ही खुप आवडता,



No comments: