Monday, July 23, 2007

देहदाह शमवुन जा.


देहदाह शमवुन जा.
सुगंधी श्वासांत श्वास तु मीसळुन जा
मखमली गालावर,अधरांनी प्रेमखुणा ठेवुन जा.
रसाळ अधरावर तुझे ,नाव तु कोरुन जा
ह्रुदयात जी लावली, ति आग तु विझवुन जा.

त्या कटाक्षानें तुझ्या,गात्रें सारी उमलली,
कवेत घेतलेली तनु,लाजेन चुर झाली,
मधाळ चुंबनाने जो देह सारा पेटला,
चंदनी स्पर्शाने तो दाह शांत करुन जा

शराबी डोळे,स्पर्श गहिरा,धुंद प्रितीचा,
उठले काहुर,लागली हुरहुर, ति मिटवुन जा,
दाटले तारुण्य माझे,त्या रेशमी काचोळीत,
वक्षावर त्या,अनंगाचा ठसा उठवुन जा.

फुलले, बहरले यौवन,देह सारा जाळते,
देहात मिसळुनी देह, देहदाह शमवुन जा.
ह्रुदयात जी लावली, ति आग तु विझवुन जा.
d

No comments: