डोळे तुझें शराबी,
झालो ग मी निकामी
विध्ध करुन मजला
खट्याळ भाव नयनि.
शामरंगी ते लोचन
शामरंगात मी रंगलो
कि डोह हा काळाभोर,
त्यात खोल बुडुन गेलो,
तु डोळ्यांत कोरतेस
ते गीत भावनांचे
रेशमी शब्द कुजबुजले
जणु हितगुज प्रेमिकांचे
अवखळ, अल्लड नयन
तिरपा कटाक्ष मधाळ
घेतिल प्राण माझें
चाळे तुझे खट्याळ
दंडावर रुतली चोळी
तनुवर चंद्रकळा काळी
गालावर गोड खळी
रुप तुझे काळीज जाळी
सुगंधित कळी कोवळी
स्पर्शानें तु फुलते
यौवनातले गुपित मनोहर
नयनांत कैद करते.
No comments:
Post a Comment