कुण्या गावची नार
अशी गुलजार,
ज्वानीचा कहर
नाजुक चाफेकळी
कोवळी कळी
भरदार वक्ष
खेचते लक्ष
रति अवतरली
विज चमचमली
नजरेत बसली
करुन दिलावर घाव
नाहिशी झालि
नाहिशी झालि
जीजी ग, जीजी ग जी !१!
मुसमुसलेली कळा
जिव चोळामोळा
गालावर लाली
वर जिवघेणी खळी
शराबी नजर
सुरीची धार
वार आरपार
रक्ताची धार,
थांबता थांबेना
शुक्राची हि चांदणी
अशी चमचमली
दिपवुनी डोळे
नाहिशी झालि
नाहिशी झालि
जीजी ग, जीजी ग जी !२!
सुंदरसा तो मुखडा
चंद्राचा तुकडा.
लाख मोलाचा
घनदाट केशसंभार
कोवळा तनुचा भार
रुपांचा कहर
भिरभिरी नजर
लालेलाल अधर
अनंगाचा रंग
नाचे मनमयुर
ल्याली इरकली
गोरे अंग जाळी
तंग काचोळी,
यौवनाची झळाळी
झळाले अंगभर.
अशी हि नार,
जिवाला घोर,
लावुनि गेली ,
नाहिशी झालि
जीजी ग, जीजी ग जी !३!
No comments:
Post a Comment