
एक साधी सरळ प्रेम कहाणी
जोश्यांच्या बि~हाडात आलि होति पाहुणी गोडशी
सुटी म्हणुन आली होति कळले करता चौकशी
उतरताना जिना मित्रांनो भिडली नजरेस नजर
गोडसा चेहरा नजर धारधार केला हृदयावर वार
काकांच्या घरात उठबस जरा जादा वाढु लागली
दांड्या मारता म्हणुन ऑफिसात बोंब होवु लागली
मधाळ वाणीत तिच्या नागपु्रच्या गप्पा रंगु लागल्या
मात्र ह्या नादात ऑफिस मधे दांड्या मात्र वाढु लागल्या
विचारले आवडले का पुणे कि बरे आपले नागपुर ?
हसुन वदली आवडले पुणे व पुणेकर नको नागपुर
मग ति नागपुर ची कन्या पक्की पुणेकरीण झाली
साधी सरळ प्रेम कहाणी मित्रांनो अशी संप्पन झाली
अविनाश .....
No comments:
Post a Comment