Thursday, September 20, 2012

होळी


अंगास अंग लावु दे,
अंगास रंग लावु दे,
सण होळिचा आहे,
प्रेम रंगात न्हावु दे..

दिवस आज मस्तिचा
प्रेमाचा व जबरदस्तिचा
गाली गुलाल फासु दे
थोडिशी मस्ति करु दे

उघडा खांदा रंगवु दे,
गोरे तन चिंब करु दे,
ओलेति तुला बघु दे,
प्रेम रंगात न्हा‌उ दे,

तनु रंगात रंगली
सखि सचैल न्हाली
वस्त्रे तनुस लिपटली
गुन्हे माफ,असे होळी

मुठित रंग,मनात रंग
मन तव प्रेमात दंग
रंगात श्रीरंग रंगु दे,
राधे आज होळी खेळु दे

अविनाश

No comments: