Thursday, September 20, 2012

एक मजेदार कविता अनुवादित आहे....



तिने सरांना विचारले
सर त्रास तर होणार नाहि ना?
छे, ग, आगदी साधि क्रिया आहे..
माझ्यावर विश्वास ठेव..सर म्हणाले

सरांनि रुमचे दार लावुन घेतले.
खुर्चिवर तिला रेलुन बसवले.
रीलॅक्स हो..शांत पडुन रहा..
अन कस करतो ते बघत रहा

सर मला खुप भिति वाटते
मला पुर्विचा काहिच अनुभव नाहि
पण मैत्रीणिला मात्र अनुभव आहे..
ति म्हणते कि ते खुप सुजते बाई

घाबरु नकोस, तस काहि नाहि..
मला अनुभव आहे ना..
मी सांगतो तसे कर...
सारे काहि ठिक होईल..

आता खुर्ची वर मागे रेल..
आता उघडता येईल तेव्हढे उघड..
म्हणजे हत्यार आत घालता येईल
काम झाल कि बाहेर काढता येईल.

सरांनि हत्यार आत घातले..
पकडले अन खस्सकन बाहेर ओढले.
बघ झाले..त्रास झाला का?
नाहि सर काहि कळले पण नाहि..

तिने त्या जागेबाजुनी बोट फिरवले.
सर..रक्त आले आहे..
काळजी नको करुस...
कापसाचा बोळा आत दाबुन धर.

सरांनि कापुस बोळा आत घातला
तिने गच्च पकडुन ठेवला..
आता कसे वाटते..सर म्हणाले..
थॅंक्यु सर..आता बरे वाटते..

दाताचे डॉक्टर विद्यार्थीनिचा
दुखरा दात काढत होते..
तुम्हि समजता तस काहि नाहि..
माणसाचे मनच घाण असते.
त्यावर मात्र काहिच ईलाज नाहि

No comments: