दैना
नव्ह्ती द्यायची साथ तर
हात तु धरलास का?
होणार नव्हती पुरी ति
स्वप्ने ति दाखवलिस का?
चुंबिलेस ओठांस माझ्या,
यौवन तु चाळवलेस का?
नव्ह्ति ऎकायाची साद
तर हाक तु मारलीस का?
तंग चोळीत माझे
अंग सारे होरपाळते
घे मिठीत घट्ट मजला
भीक तुजला मागते..
नव्हते करायचे शांत तर,
हे यौवन तापवलेस का?
नव्हते घ्यायचे मिठीत तर
तर नजरेने इशारा केलास का?
मी अशी उभी एकटी
न सखा न सोबती
सोडुन अर्ध्यावर गेलास अन
दैना अशी तु केलिस का?
बघ काय केलेस तु माझे,
जिवनाचा खेळ झाला,
चिंध्या झाले माझ मन
ना आवडे पाणी ना अन्न.
शुन्यात नजर ति लागली
जगण्याची उमेद संपली
जडला जिवघेणा प्रेम रोग
ये जवळि अन घे मिठीत.
हीच दवा या रोगाला.
चंदणी हि रात्र, अंग अंग जाळी,
एकदा तरी तन शांत करण्या
सख्या तु येशील का?
No comments:
Post a Comment