सेकंड हनिमुन
सेकंड हनिमुन च्या कल्पनेन ति मोहोरुन गेली होति.
पार्लर मधे जावुन केस ट्रीम केले होते,
फेसियल..काय, काय काय चालल होत तिच..
गप रे तुला कांही कळत नाहि..मला गप्प केल.
हिल स्टेशन च्या ते रम्य अन शांत वातावरण,
सार वतावरण धुन्द होते.
ति माझ्या मिठीत पहुडली होति.
एकदम मला हसु आले.
का हासलास?..ति..म्हणाली.
आठवती पहिली रात्र..अस म्हणालो अन तिलही हासु फुट्ल.
त्या रात्री तिला न काहि कळले न मला काहि जमले.
पहिल्या बॉल वर आउट झालेल्या खेळाडु सारखा चेहेरा झाला होता.
खुप नर्व्हस होतो.. मग तिच्या शरीरची ओळख झाली
तिला पण ति करुन दिली.सार जमत गेले..
अन दिवस मंतरल्या सारखे झाले.
दिवस कसे भराभर सरले ते कळल नाहि..
तिच्या कडे बघितल. चेहे~यावर काम धुंद भाव होता.
खुप सुंदर दिसत होति.वय झाल वाटत नव्ह्त..
छान दिसतेस..चेहे~यावर हात फिरवित म्हणालो..
हाताच चुंबन घेत तिने होकर दिला.
अन एकदम मी माझ्याकडे पाहिल..
काय झाल होत माझ?.
जिवनच्या धकाधकीत पुर्विचा राहिलो नव्हतो
निम्मे केस गेले होते, चश्मा लागला होता, पार बद्ललो होतो.
मनांत विचार आला. खरच मी तिला आवडत असेल??
तु खुप सुन्दर आहेस, पण मी वयस्कर वाटतो..मी म्हणालो
थोडस ओश्याळल्या सारख झाल होत.
ति खळखळुन हसली." वेडा रे"
अरे तु तुझ्या नजरेन मला बघतोस म्हणुन मी तुला छान वाटते.
तु माझ्या नजरेन बघ, तुझ्या कडे, मग तुला कळेल.
ति म्हणाली..’अरे तु मला अजुनही तसाच दिसतोय..
बालिश , धांधरट, केस विस्कटलेला,
थोडासा बावळट, अन खुप रोमॅंटिक..फक्त माझा..
ऎकल्यावर खुप हलक वाटत होते.
बराच वेळ ति बाहुपाशात होति...
पहाट केंव्हा झाली ते कळलच नाही....
No comments:
Post a Comment