धुंद नजरेन अशी,रोखुनी बघु नको,
चालताना तु सखे, ह्रुदय हे तुडवु नको.
झुळुक मंद वा~याची
त्यास साथ मदनाची,
रुपाला आज बहर.
जोडीला धुंद ही नजर
केश संभार घनदाट
त्यात तारुण्य बेफाट,
काय धुंद हा सुवास,
यौवनगंध भीने मनात.
मोग~याचा माळला गजरा,
थबकतात तिथे या नजरा,
आज थाट असे निराळा
जीव करी वेडाखुळा
रुप असे हे रतीचे,
मादक शराबी तारुण्याचें
तु तर नाजुक चाफेकळी
की मस्त लावण्याची कळी,
काचोळीची घट्ट गाठ
मागे गोरीपान पाठ,
उरोज कुंभ आत लपले,
पहाण्यास नयन आतुरले.
माळला गजरा,काय हा नखरा,
नजर लागेल ना,दृष्ट होइल ना,
धरीला मी तुझा,सखे हात हातात,
हा रांगडेपणा ,क्षम्य असे प्रेमात.
धुंद नजरेन अशी,रोखुनी बघु नको,
चालताना तु सखे, ह्रुदय हे तुडवु नको
No comments:
Post a Comment