Saturday, July 7, 2007
,नजर खाली झुकते.
काय बोलु, कस बोलु, लाज वाटते,
बघता तुजकडे,नजर खाली झुकते.
यौवनात मी,देहात रानवारा उफाळे पिसाट
यौवानाच्या उधाण लाटा,उसळती अफाट,
थरथरे देह माझा,घे जवळ प्रियकरा,
जादुई स्पर्शाने, शमव हा पीसाट वारा.
प्रीतिचा रंग मम ह्र्दयी फुलला रे
फुटल्या डाळिंबाचा रंग गालवर पसरला रे.
मोग~याचा गजरा माळला केसांवरी,
कशी बघु, मी मेली, मुलखाची लाजरी.
गोरेपान यौवन.घातली काचोळी काळी,
तुच धर हात, अन, घे मजला जवळी,
कैफ चढला प्रीतिचा,आग लागले उरी,
स्पर्श सुखा आसुसले हे, यौवन बिलोरी,
घे रे चुंबन,टिप, अधरातील मकरंद,
चुंब नग्न देह,मग उरेल, आनंद,आनंद.
देहात विरता देह,श्वासात श्वास मिसळला
ह्या प्रणय वेडीने, तो प्रणय क्षण अनुभवला.
काय बोलु, कस बोलु, लाज वाटते,
बघता तुजकडे,नजर खाली झुकते.
तो प्रणय आठवता, जिव वेडावतो,
आठवणीने नुसत्या,सारा देह मोहरतो
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment