दिसलास तु, उमले यौवन
हसलास तु, लाजले नयन.
अवेग प्रीतिचा,तनुत मोहरे
गंध पसरवे, यौवन वारे.
रोम रोमात रे फुलतो फुलोरा
देहात उसळे, बेभान वारा
जाळते तन, धुंद चांदणे,
घे मिठीत, हेच मागणे,
अधरा वरती तु लिहिले ते
गुपित आपले अधरी जपते
मिठीत तुझ्या हि तनु विरघळते
श्वासांत मीसळता श्वास, नयन मिटते,
देहास आलिंगता देह,मी एकरुप होते,
अर्पिते मी तुला ,जे तुला हवे ते.
No comments:
Post a Comment