रिमझिम पावसात उगवली पहाट घेउन संगे मृदगंध, दारी निशीगंध बहरला अन दरवळे धुंद धुंद, ओढुन पदर लज्जेचा नभाआड, लपली ति शुक्र चांदणी, पर्ण फुलांवर दवबिंदु भासतसे, मोतीयाची गोंदणी. तुझ्यासवे रंगवाया पहाट ही, झाले अधीर हे मन. तु तर पण झोपेत तृप्त, शांत निद्राधीन. रात्रीच्या निशब्द प्रहरी, किति खेळ तु खेळला, अन सकाळी कवितांचा गजरा तु बांधला. कळले गुपीत मजला, अशा पहाटेच्या उत्तर प्रहरी, तु तर चंद्रमा, अन मी तुझी मधु शर्वरी....
No comments:
Post a Comment