Sunday, August 26, 2007

मधुचंद्राची रात

मधुचंद्राची रात
आली मधुचंद्राची पहिली रात
प्रणय सुखांची करीत बरसात.

प्रणय खेळ हे नवे मजला
यौवन उखाणा न सुटे मजला
प्रणय सुखाची ओढ लागली
कल्पनेने मम काया मोहरली


मिठीत घेता तनु थरथरते
गालावर गुलाब लाली येते
वक्षावरती तव हात फिरता
कामधुंद नयन तृप्तिने मिटते

टाकलास तु दिप मालवुन.
गात्रांत गेले गात्रे मिसळुन
तव चरणी हे यौवन अर्पीले
जिवन माझें धन्य जाहले.

सुंदर,मंगल भाव मनि दाटला
एकरुप होण्या जिव आसुसला
एका रात्रीत सारे बदलुन गेले
नवे आयुष्य सुरु जाहले.
तन मन सारे बुडले सुखांत

आली मधुचंद्राची पहिली रात
प्रणय सुखांची करीत बरसात.

यौवन.

प्रेम पाउस कोसळता कोसळता,
सारें अंग शहारुन गेला,

हळुच मिट्ता कामधुंद डोळें
सुगंधी श्वास परीमळुन गेला.

मधाळ अधरावर कोरता दंतव्रण
अधर ओला करुन गेला..

घालता बेभान रेशमी विळखा
वक्षावरला पदर घसरुन गेला.

मखमली गाला वरती अधराने
प्रेमगीत तो लिहुन गेला,

अडकवुनी रेशमी देहांत देह
यौवन सारें लुटुन गेला.

बेभान श्रावण

बेभान श्रावण
हळवे हे मन
गाते गाणे मन

गोरे गोरे पान
रुप हे बेभान

गालावर खळी
पडते ग छान

बेभान श्रावण्
मदनाचा बाण्

अधिर यौवन
सजलीस छान

लवते नयन
येणार ग कोण

नाचते ग् मन्
येणार साजन

मन-धुंद करी


मन-धुंद करी
मन-धुंद करी मज हा गंध तुझ्या प्रीतिचा
गंध उमलत्या गात्रांचा,मनातल्या स्वप्नांचा.
मधाळ अधर, नयनातिल काजळ रेघेचा
तुझ्या न माझ्या बेभान श्रुंगार गुपीतांचा.

मन-धुंद करी मज हा गंध तुझ्या प्रीतिचा
त्या आतुर प्रतिक्षेचा,चोरट्या अलींगनांचा.
रेशमी कृष्ण कुंतलांचा,अधर चुंबनाचा.
मन-धुंद करी मज हा गंध तुझ्या प्रीतिचा

मन-धुंद करी मज हा गंध तुझ्या प्रीतिचा
सुगंधी श्वासात् मिसळलेल्या धुंद् श्वासांचा
मखमली गालावर,अधरांच्या प्रेमखुणांचा
मन-धुंद करी मज हा गंध तुझ्या आठवणीचा

Tuesday, August 7, 2007

गुलाबी चेहेरा

आरक्त गुलाबी चेहेरा
दोन नयने टपोरी
त्या नयनांत डोलती
गुलाबी स्वप्ने लाजरी।

लाल भडक अधरात
लाख गुपिते जपलेली

लाल रेशमी वसनांत
कामतुर तनु लपेटलेली
बेभान काम गंधाची
देह्कुपी लवंडलेली

मंद मादक कामगंध
बेभान रात्री दरवळला
मिठित धरता प्रियेला
श्वासांत श्वास मिसळला

रसगंधाची रात्र होति
श्वास धुंद परीमळे.
स्पर्श करीता वक्षाला
मिटले धुंद डोळे.

स्पर्श कोवळा यौवनाचा
तनुस विळखा रेशमाचा
चालता खट्याळ चाळे
देहांत देह मीसळले

प्रणयरात्र बेभान होति
लावण्य कळी उमलली होती
त्या धुंद यौवनी रमता
श्रुंगार गुपिते कळली होती

तुझे नि माझे श्रुंगार् गुपित,
बंद आपल्या देह कुपित.

Saturday, August 4, 2007

मन बेभान, बेभान,


मन बेभान, बेभान,
थबके तुझ्याच रुपांत

मन काजळाची काळी रेघ
कोरते तुझ्या नयनांत
मन बेभान, बेभान,
चुंबे, तुझ्या नयनांस.

मन जाइचा ग गंध,
दरवळे, रेशमी कुंतलात
मन बेभान, बेभान,
गुंतले रेशमी कूंतलात.

मन मोत्याची ग माळ
बिलगे तुझ्याच वक्षास,
मन बेभान, बेभान,
छेडे तव यौवनास.

मन खट्याळ पवन
झोंबे भाळीच्या बटेस,
मन बेभान, बेभान,
अडकले,भाळीच्या बटेत,

मन चंद्राची ग कोर
अन क्षते तुझ्या वक्षावर
मन बेभान, बेभान
चुंबे रसाळ ऒठास

मन स्वप्नांत स्वप्नांत
बिलगे तुझ्या तनुस
अन तुझ्या जागेपणी
ओल तुझ्या ग अंगास.

मन बेभान, बेभान,
थबकलय तुझ्या रुपांत
मन बेभान, बेभान,
कायम तुझ्याच स्वप्नात

Thursday, August 2, 2007

डोळे तुझें शराबी,

डोळे तुझें शराबी,
झालो ग मी निकामी
विध्ध करुन मजला
खट्याळ भाव नयनि.

शामरंगी ते लोचन
शामरंगात मी रंगलो
कि डोह हा काळाभोर,
त्यात खोल बुडुन गेलो,

तु डोळ्यांत कोरतेस
ते गीत भावनांचे
रेशमी शब्द कुजबुजले
जणु हितगुज प्रेमिकांचे

अवखळ, अल्लड नयन
तिरपा कटाक्ष मधाळ
घेतिल प्राण माझें
चाळे तुझे खट्याळ

दंडावर रुतली चोळी
तनुवर चंद्रकळा काळी
गालावर गोड खळी
रुप तुझे काळीज जाळी

सुगंधित कळी कोवळी
स्पर्शानें तु फुलते
यौवनातले गुपित मनोहर
नयनांत कैद करते.