Thursday, September 20, 2012

एक मजेदार कविता अनुवादित आहे....



तिने सरांना विचारले
सर त्रास तर होणार नाहि ना?
छे, ग, आगदी साधि क्रिया आहे..
माझ्यावर विश्वास ठेव..सर म्हणाले

सरांनि रुमचे दार लावुन घेतले.
खुर्चिवर तिला रेलुन बसवले.
रीलॅक्स हो..शांत पडुन रहा..
अन कस करतो ते बघत रहा

सर मला खुप भिति वाटते
मला पुर्विचा काहिच अनुभव नाहि
पण मैत्रीणिला मात्र अनुभव आहे..
ति म्हणते कि ते खुप सुजते बाई

घाबरु नकोस, तस काहि नाहि..
मला अनुभव आहे ना..
मी सांगतो तसे कर...
सारे काहि ठिक होईल..

आता खुर्ची वर मागे रेल..
आता उघडता येईल तेव्हढे उघड..
म्हणजे हत्यार आत घालता येईल
काम झाल कि बाहेर काढता येईल.

सरांनि हत्यार आत घातले..
पकडले अन खस्सकन बाहेर ओढले.
बघ झाले..त्रास झाला का?
नाहि सर काहि कळले पण नाहि..

तिने त्या जागेबाजुनी बोट फिरवले.
सर..रक्त आले आहे..
काळजी नको करुस...
कापसाचा बोळा आत दाबुन धर.

सरांनि कापुस बोळा आत घातला
तिने गच्च पकडुन ठेवला..
आता कसे वाटते..सर म्हणाले..
थॅंक्यु सर..आता बरे वाटते..

दाताचे डॉक्टर विद्यार्थीनिचा
दुखरा दात काढत होते..
तुम्हि समजता तस काहि नाहि..
माणसाचे मनच घाण असते.
त्यावर मात्र काहिच ईलाज नाहि

वय उलटत चालले आहे..


हा उंचच आहे ..तर तो बुटका..
ह्याला टक्कल ..तो शामळू
हा शाहाणा वाटतो...तर तो बावळट
अग..काय हे.. तुझ अस..

ह्याला पगार कमी ..तर त्याच शिक्षण कमी,,
त्याला खूप नातेवाईक..तर ह्याच घर लहान..
ह्याला म्यानर्स नाहीत ..तर त्याच्यात ते नाही..
अग काय हे.. वय उलटत चालले आहे..
कर लवकर पसंत कुणाला तरी..
दोन वेळेच्या जेवणाची
व झोपण्याची सोय करावी लागते

होळी


अंगास अंग लावु दे,
अंगास रंग लावु दे,
सण होळिचा आहे,
प्रेम रंगात न्हावु दे..

दिवस आज मस्तिचा
प्रेमाचा व जबरदस्तिचा
गाली गुलाल फासु दे
थोडिशी मस्ति करु दे

उघडा खांदा रंगवु दे,
गोरे तन चिंब करु दे,
ओलेति तुला बघु दे,
प्रेम रंगात न्हा‌उ दे,

तनु रंगात रंगली
सखि सचैल न्हाली
वस्त्रे तनुस लिपटली
गुन्हे माफ,असे होळी

मुठित रंग,मनात रंग
मन तव प्रेमात दंग
रंगात श्रीरंग रंगु दे,
राधे आज होळी खेळु दे

अविनाश

कोजागरी


ति कोजागरी पौर्णिमेची रात्र होति
प्रणयिनि,तुझ्याच रुपाचि चर्चा होति...

कविता कोणावर करु,गहन प्रश्ण होता
एक चंद्र्मा नभात, तर एक बाहुपाशात होता..

यमक की, उपमा,उत्प्रेक्षा, का शब्द लावण्य पाजळु?
तु तर छंदबद्ध, तरी मुक्त छंदात लिहिण्याचा विचार होता

ते काम लाघवी स्पर्श शरीरात भिनले होते,
स्पर्श ताना तनुचा एक इंच हि तुकडा सुटला नव्हता

गर्भ रेशमी मिठी, साजणे घट्ट केली होतिस,
कळतय,रात्र जागवण्याचा तो इशारा होता