Sunday, January 22, 2012

प्रेम

प्रेम
प्रेम करण..किति सोप आहे..काय लागत प्रेम करायला?
अं..अं..काय बर..??अं..अं....हा,,

तो...... ति..
चंद्र..चांदण्या..
हिरवळ..एकांत,,
बहरलेला निशिगंघ
बेधुंद संध्याकाळ...

अं..अं..आणखि काय बर..??
हा...
चॉकलेट्स..मल्टि प्लेक्स..
मॉल..प्रेसेन्ट्स..टेडी..
गिफ्ट्स..आईस क्रीम..
परफ्युम्स.....मो बाईक.....

बस ..झाल???...आणखि काय बर ?....
अं अरे हो , आठवल..
एक सुंदर, निर्मळ, संवेदनाक्षम मन..

आविनाश

Tuesday, January 17, 2012

तुझ्या नकळत


तुझ्या नकळत

तुझ्या नकळत तुला रतिने बघावे
अन पाहुन तव रुप लज्जित व्हावे

असा ,सखे लयब्ध्ध पदन्यास तुझा
पैजणास वाटे तुज बिलगुनि रहावे

अशी लाजरी अबोध रमणी असे तु
आला वसंत देही,तुज ठावुक नसावे.

नाभित जशी त्याच्या कस्तुरी दरवळे
तसे मम हृदयी तु दरवळत रहावे

हे काय झाले,तुला हि कळेना
ते पाहुन ,मदनाने गाली हसावे

तारकांच्या साक्षिने विवाहबध्ध व्हावे
मी तुला अन तु सौभाग्यास मिरवावे

अविनाश

घनदाट गर्द रेशमी केशकुंतल


घनदाट गर्द रेशमी केशकुंतल

घनदाट गर्द रेशमी केशकुंतल
नेत्रास कोरले काजळ कि सोमल
तनुत रातराणीची मादक दरवळ
गात्रात मदनाची बेफाम सळसळ

नजर, कधि लाजरी, कधि नाचरी
रतिरुप,नखशीकांत तु लावण्य परी
वाकलेली लज्जेने तु अबोध रमणी
रुप चमके,जशी नभी शुक्रचांदणी

वसने ,गर्भ रेशमी अंगी ल्याली
तव उरास काचे ,भर्जरी काचोळी
देहात रानवारा,उसळे उधाण लाटा
गालास खळी,अशी तु लावण्यकळी

अबोल पौर्णीमा, अन धुंद चांदणी
जवळ श्रुंगार वेडी,बेधुंद रागीणी
नाचति वक्षावर, चकोर मंडले बेभान
मुग्ध ति कुजबुज अन चोरटे अलिंगन ,

रोम रोम नशेने फुलले,श्वासात श्वास भिनले..
एक मेकाच्या सहवासात,बहरुन यौवन आले
तारुण्य अन यौवनाचा प्राशितो मी कण नी कण
ओंजळीत दिले मी तुजला,तृप्तिचे लक्ष लक्ष क्षण

Avinash

शर्ट

शर्ट

तो दोन दिवसासाठी टुर वर गेला होता..
रात्रीचे १२ वाजून गेले होते..
तीचां अनावृत देह बेड वर तळमळत होता..
त्याच्या विरहात......तनु दाह होत होता .
तिचे लक्ष गेले त्याच्या भिंतीवर लटकलेल्या शर्ट कडे..
उठून तिने शर्ट काढला भिंतीवरून ...
त्याचा घर्म गंध तिच्या तनुत दरवळला.
शर्ट घालून दिवा मालवला ...अन झोपली..
तिला वाटत होते त्याच्या मिठीतच ती पहुडली आहे..नेहमीप्रमाणे...
Avinash....

कृष्ण विवर....

कृष्ण विवर....
आहेसच तु..आकाशा सारखि...
गुढ..अनाकलनीय..रहस्यमय..अनंत..
भुरळ पडते..अनेक रंग..अनेक छटा..
कधि मेघाछ्छादित..तर कधि निरभ्र...
कधी मळभ.. तर कधि शुक्र चांदणी तेजस्विनी...
कधी शांत..तर कधी खवळलेली...
बघत रहावस वाटत....सारख..
धवल शुभ्र.आकाश गंगेच्या पट्ट्याकडे..
अन मग खेचला जातो
त्या तिथेच असलेल्या कृष्ण विवरात...
कुठल्या तरी अनामिक आकर्षणाने..
ओढला जातो..खोल..खोल..आत..आत..
हरवुन बसतो स्वतःचे अस्तित्व...
विरुन जातो..अन बनतो त्याचाच एक अविभाज्य भाग...
Avinash...

गातेस जे गीत

गातेस जे गीत

गातेस जे गीत ते माझे नव्हे
भाव अन शब्द हि माझे नव्हे

बहरली जरी तनु वेल नाजूक
गंधाळलेली तनु आता माझी नव्हे

बिलागालीस त्या चांद रात्री मला
तो चन्द्रमा हि आता माझा नव्हे

लोटलीस तू नौका ज्या सागरात
तो किनाराही आता माझा नव्हे

फिरतो असाच दिशांहीन मी
ती दुनिया हि आता माझी नव्हे
avi

तुझ्या प्रेमात साजणे

तुझ्या प्रेमात साजणे

चुंबिता ओले अधर,दरवळे श्वास गंध
चुरता म्रुदु ऊरोज,दरवळे तनुत गंध.

ते काम सोहाळे, त्या काम धुंद रात्री
येई उधाण प्रेयसी ,तुझ्या कोमल गात्री

तुझ्या प्रेमात साजणे मी रात्रं दिन दंग
आली मिठित,उमलला रात राणीचा गंध
avinaash
..........................

कवि

अरे माझे ह्रुदय काढुन घ्या
मला सरणावर ठेवण्या आधी
नाहितर ति जळुन जाईल
जि ह्रुदयात वसली आहे.

न बघता मागे वळुन
निर्दय पणे सोडुन गेली
जाता जाता मला ति
कवि मात्र बनवुन गेली

अविनाश

थोडे मला कळाया लागले.

थोडे मला कळाया लागले.
तव रुप छळाया लागले.

काजलनेत्र वा पिन पयोधर
दोघेहि मला खुणवु लागले.

गंधित मादक केश संभार
मन त्यात अडकु लागले..

पहाताच तव यौवन रुप
सारे आईने तडकु लागले.

पहाता रसाळ अधर फोडी
मन कविता प्रसवु लागले.

निरखता मादकआक्रुति बंध
द्वैताद्वैत रहस्य उकलु लागले.

अविनाश

दररोज मीच पाही


हे रुप सुंदरीचे, दररोज मीच पाही.
वाटे रोज निराळे, मन अचंबीत होई.

रुळे कुंतल वक्षावर.तर कधी बांधलेले.
त्या नागीणीत माझे ,का मन बेभान होई..

साधे असे बोलणे, पण गोडवा किति.
बोलण्यात जिव वेडा, का गुंतुन जाई?

नाजुक लाल अधर ,चाळे किति विभ्रमी.
चुंबण्यास अधर, मन ते आधिर होई..

नित्य नवे रुप ,दररोज मीच पाही
गारुड काय हे ,मज उमजत नाहि

अविनाश

दररोज मीच पाही

हे रुप सुंदरीचे, दररोज मीच पाही.
वाटे रोज निराळे, मन अचंबीत होई.

रुळे कुंतल वक्षावर.तर कधी बांधलेले.
त्या नागीणीत माझे ,का मन बेभान होई..

साधे असे बोलणे, पण गोडवा किति.
बोलण्यात जिव वेडा, का गुंतुन जाई?

नाजुक लाल अधर ,चाळे किति विभ्रमी.
चुंबण्यास अधर, मन ते आधिर होई..

नित्य नवे रुप ,दररोज मीच पाही
गारुड काय हे ,मज उमजत नाहि

अविनाश

Monday, January 9, 2012

मुसळ धार पाऊस

मुसळ धार पाऊस
मुसळ धार पाऊस सुरु असतो व आपण झाडाच्या वा बस स्टॅण्डच्या आडोश्याला उभे असतो..पावसाने निम्मे तर भिजवलेले च असते..
काल झाला तसाच पाउस सुरु असतो..रस्त्यावर तुरळक वहातूक...गाड्या हेड लाईट फ़ुल ऑन करुन मंद गतिने धावत असतात..
वेगाने येण्या~या जलधारा अंगावर झेलत वसुंधरा त्रुप्त होत असते..बोचरे वहाणारे वारे झाडांशी लगट करित झाडे लयात हलत असतात....
वातावरणात एक सुखद गारवा पसरु लागतो....रस्त्या वरुन एखादा तरुण व त्याला मागुन घट्ट बिलगलेली तरुणी पावसाची मजा लुटत होंडा मोटर सायकल वरुन जाताना दिसते..

सारे जण अंग आखडुन उभे असतात. व चेहे~यावर कधि पाऊस थांबतो अन घरी पोहोचतो असा भाव असतो...

घरी बसलेली एखादी आजी नातु भिजून येणार म्हणून काळजीत असते..सोसायटी मधल्या चिल्या पिल्याना तर पाऊस म्हणजे पर्वणी..सारे आईचा ओरडा खात बाहेर भिजत खेळत असतात....

पावसाचा जोर कमी होतो...तरी बुरबुर चालुच असते...मोटर सायकल ला किक मारुन तसेच थोडेसे भिजत भिजत सारे जण घरच्या ओढीने निघालेले असतात...

बाल गंधर्व चौकात सालाबाद प्रमाणे तळे साठलेले असते ते सारे चुकवत चुकवत एकदाचे घर येते....

बेल वाजवून दार उघडल्यावर " मला वाटलच तुम्ही भिजले असणार" हातातला टॉवेल देत सौ म्हणते आधी केस पुसा...तुम्हि केस पुसुन अंग कोरडे करुन कपडे बदलता व हुश्य करुन सोफ्यावर रेलुन बसता अन ति समोर गरमा गरम कांद्या भज्याची बशी व वाफाळलेला चहाचा कप आणुन ठेवते....

पिठ भिजवुनच ठेवेल होत म्हटल तुम्ही आला कि गरम घाणा काढावा ..........ति म्हणते...

बोचरा गारवा..बाहेर रिमझिम व समोर गरमा गरम कांद्या भज्याची बशी व वाफाळलेला चहाचा कप सुख म्हणजे या पेक्षा काय निराळे असते....
पाऊस अन् कविता...पाऊस अन् छत्री...पाऊस अन् प्रेयसी यांचे अतूट नाते आहे तसे पाऊस अन गरमा गरम कांद्या भज्याची बशी व वाफाळलेल्या चहाच्या कपाचे पण...

अविनाश

एक साधी सरळ प्रेम कहाणी


एक साधी सरळ प्रेम कहाणी
जोश्यांच्या बि~हाडात आलि होति पाहुणी गोडशी
सुटी म्हणुन आली होति कळले करता चौकशी

उतरताना जिना मित्रांनो भिडली नजरेस नजर
गोडसा चेहरा नजर धारधार केला हृदयावर वार

काकांच्या घरात उठबस जरा जादा वाढु लागली
दांड्या मारता म्हणुन ऑफिसात बोंब होवु लागली

मधाळ वाणीत तिच्या नागपु्रच्या गप्पा रंगु लागल्या
मात्र ह्या नादात ऑफिस मधे दांड्या मात्र वाढु लागल्या

विचारले आवडले का पुणे कि बरे आपले नागपुर ?
हसुन वदली आवडले पुणे व पुणेकर नको नागपुर

मग ति नागपुर ची कन्या पक्की पुणेकरीण झाली
साधी सरळ प्रेम कहाणी मित्रांनो अशी संप्पन झाली
अविनाश .....

तुझा देह गोरा


तुझा देह गोरा

खट्याळ चंद्रमाने ,केला तुला इशारा
मोहरुन गेला बघ, तुझा देह गोरा

फडफडले सखे ,तुझ्या मोर पापण्यांचे
गौरगुलाबी तनुने ,बघ फुलविला पिसारा

धवल निशिगंध सखे ,तव मनांत फुलला
गंधाळुन गेला बघ, हा आसमंत सारा

कसे बांधले काचोळीत, तुफान यौवनाचे
घसरला पाय, अन गेला तोल सारा

स्पर्शिता तव यौवनाला,झंकारली देहविणा
फुलले गुलाब गाली,करतिल चहाडी सख्यांना

Avinash

तुझा देह गोरा


तुझा देह गोरा

खट्याळ चंद्रमाने ,केला तुला इशारा
मोहरुन गेला बघ, तुझा देह गोरा

फडफडले सखे ,तुझ्या मोर पापण्यांचे
गौरगुलाबी तनुने ,बघ फुलविला पिसारा

धवल निशिगंध सखे ,तव मनांत फुलला
गंधाळुन गेला बघ, हा आसमंत सारा

कसे बांधले काचोळीत, तुफान यौवनाचे
घसरला पाय, अन गेला तोल सारा

स्पर्शिता तव यौवनाला,झंकारली देहविणा
फुलले गुलाब गाली,करतिल चहाडी सख्यांना

Avinash

रहस्यमय,

रहस्यमय,

Victoria's Secrete च्या
तलम अन मुलायम...
नाजुक व रेखिव रांगोळी घातल्यागत
लेस गुंफलेल्या सॅटीन च्या
काचोळी व कटीवस्त्राच्या आत
तु तुझ्या ता्रुण्याची रहस्ये दडवली आहेत
अनावृत अवस्थेत खोल खोल जावुन हि
त्या रहस्यांचा उलगडा होत नाहि....
तु म्हणजे एक रहस्यमय,रोमांचकारी
कादंबरी आहे....
जि सारखी वाचाविशी वाटते...
Avinash

मजला महाग पडले.






मजला महाग पडले.

रुप बहरता हसणे, मजला महाग पडले............................
तुझ्या डोळ्यात फसणे, मजला महाग पडले.

ओठांची नाजुक महिरप, वर विभ्रमी चाळे.
अधरावर नाव कोरणे,मजला महाग पडले.

ते कोवळे तारुण्य.बांधले रेशिम काचोळित
अनंग ठसा उमटवणे,मजला महाग पडले.

नजर, कधि लाजरी, तर कधि नाचरी
नजरेस नजर देणे ,मजला महाग पडले.

तु श्रुंगार वेडी, असे बेधुंद रागीणी
विसावणे मिठीत तुझ्या,मजला महाग पडले.

फुलले, बहरले यौवन,देह सारा जाळतो
देहात देह मीसळणे.मजला महाग पडले

Saturday, January 7, 2012

उर्ध्व रेता..


उर्ध्व रेता..
सनातन वैदिक धर्मात ब्रह्मचर्यास महत्व आहे...
ब्रह्मचर्य हेच जीवन विर्य नाश हा मृत्यु..असे आपणहि वाचले असेल...
पूर्वी वीर्य किंवा रेत याला फार महत्त्व होते. पुरुषाचे बल किंवा तेज त्याच्या वीर्यावर अवलंबून आहे असे समजत.
अन्ना पासून रक्त वगिरे प्रमाणे रेत वा वीर्य हि तयार होत असते..
मैथुन वा रतिक्रिया करताना रेतःस्खलन होते व वीर्य बाहेर पडते...हा शरीर धर्म आहे...
हट योगा मध्ये संभोग करीत असताना वीर्य बाहेर योनी कुंडात न टाकता पुन्हा शरीरात शोषून घ्यायच्या प्रक्रियेचे अत्यंत किचकट व अशक्यप्राय वाटणार्‍या कृती चे वर्णन व विवरण आहे.. व याने ब्रह्मचर्य टिकून राहतं असे असं म्हटलं होतं..
या योग क्रियेस ऊर्ध्व रेता असे नाव दिलेले वाचनात आहे..
शरीरात असणाऱ्या रसांना याविष्ठ बनवण्याची पद्धती म्हणजे प्राणायाम प्राचीन ऋषींनी प्राणाविदेचे रहस्य जाणून ज्या योगविद्येचा आविष्कार केला अनंतकाला पर्यंत हीच योगविद्या किंवा प्राणविद्या ही दीर्घायुष्य प्राप्तीसाठी सर्वोत्कृष्ट मानली जाईल. प्राणाची प्रतिष्ठाच अमृतत्व आहे. तर प्राणाची उत्क्रांती हा मृत्यू आहे. प्राणायमच कुण्डलिनी जागृती, उर्ध्वरेता होणे किंवा ब्रह्मचर्याच्या रक्षणाचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे.
रेतो वै प्राण:, प्राणो रेत: ।
प्राणच रेत अर्थात शुक्र किंवा सोमरस आहे. या रेताचे शरीरात सम्यक पचन होणे हेच ब्रह्मचर्य आहे. हेच परम तप आहे. हे ब्रह्मौदन परिपक्व झाल्यास अमृतत्व उत्पन्न होते
ब्रह्म चर्यात रती सुख वर्ज नसून वीर्य च्युत न होणे महत्त्वाचे मानले गेले आहे...
ब्रह्मौदन परिपक्व झाल्यास अमृतत्व उत्पन्न होते. हेच सोमपान होय.
यस्मात्पक्वादमृतं संबभूव यो गायत्र्याअधि पतिर्बभूव ।
यस्मिन्‌ वेदा निहिता विश्र्वरुपास्तेनौदनेनातितराणि मृत्यूम्‌ ।।
(अथर्ववेद 4.35.6)
जे ब्रह्मोदन शरीरात परिपक्व झाल्याने अमृत उत्पन्न होते जो गायत्री (ब्रह्मचर्याकाळ) चा सर्वेसर्वा आहे. आणि ज्यात विश्र्वरुप वेद स्थापित आहेत. त्या सिद्ध ओदन (रेटा) च्या माध्यमातून मी मृत्यूलाही ओलांडून पुढे जातो.
वैदिक भाषेत ब्रह्मांड किंवा मस्तिष्क हे स्वर्ग आहेत इन्द्राच्या इन्द्रिय शक्तीचा वास ब्रह्मांडातच राहतो. हेच संपूर्ण इन्द्रियांचं केंद्र आहे.
भगवान श्री कृष्णास "उर्ध्व रेता" वा "अच्युत" असेही संबोधण्यात येते..
तो तूं उर्ध्वरेता त्रिशुद्धीं । तुज भीष्म वंदी सर्वदा
नवलक्ष गोकंठपाशीं । तुज बांधवेना हृषीकेशी ।
असो वा नाथ भागवतात
घरीं सोळा सहस्त्र नारी । नांदसी एकलक्ष साठी सहस्त्र कुमरीं ।
तरी तूं बाळब्रह्मचारी । तुज सनत्कुमारीं वंदिजे
व कृष्णास प्रेमाने
उर्ध्वरेता श्रीकृष्ण ॥४॥ ज्या ज्या गौळियांच्या सुंदरी ॥ तितुक्याही होत्या निजमंदिरीं ॥ कृष्णें भोगिल्या बहुरात्रीं ॥ हेंच नवल पैं जाणा ॥५॥ तरी त्या वेदश्रुती सकळा ॥ निर्गुणरुप वर्णितां शिणल्या ॥ परी स्वरुपीं नाहीं ऐक्य जाहल्या ..
अशी वर्णने वाचण्यात येतात.....

रेत वर खेचल्याने मूलाधार चक्र ऍक्टिव्हेट होते व साधक मोक्षाच्या मार्गे चालू लागतो असे हि एक मत आहे.
शाक्त पंथा मधे हि साधना केली जाते व महत्त्वाची मानली जाते....
"म" साधना ज्या मधे मद्य..मुद्रा..मास..मैथुन हे प्रमुख घटक आहेत त्या मुळे ’उर्ध्व रेता" योग क्रियेने रतिसुख घेण्याची वर्णने पण वाचनात येतात...
काम शास्त्रात "समरति..व "विपरीत रति" असे दोन प्रकार वर्णन केले गेले आहेत..
समरति क्रियेमधे स्त्री वीर्य धारण करते व ति गर्भवती होती..तर विपरीत रति मधे पुरुष उर्ध्वरेता होत ब्रह्म पदास जाऊन पोहोचतो..
शिव शंकर हे परब्रह्म मानले गेले आहे...
शिव व शंकर हे एक नसून निराळे आहेत..शिव हे "तत्त्व" आहे तर शंकर हे मूर्त रूप मानले गेले आहे..
शिव हा ब्रह्मांडाचा महान तांत्रिक व मांत्रिक मानला जातो..
सा~या तंत्र विद्येचा ..गुप्त साधनांचा शिव हा कर्ता आहे...
व ह्या परंपरेत नाथ संप्रदायास अन्यानं साधारण महत्त्व आहे...
नाथ भक्तिसारातहि "उर्ध्व रेता" सिद्धीचा उल्लेख वाचनात येतो....

मच्छिन्द्रनाथ मजल-दरमजल करीत देशाटन करत असता आंध्रप्रदेशातील श्रीशैलम येथे पोचले. तेथे तांत्रिक योगिनींचा एक मठ होता.
या योगिनी सदासर्वकाळ विवस्त्र रहात असत. (त्यांचे केस इतके घनदाट आणि लांबसडक असत की त्यांची शरीरे झाकली जात.)
या योगिनींनी मच्छिन्द्रांना हटयोगातील वेगवेगळ्या आसनांचे आव्हान दिले. त्यातील बरीच आसने त्यांनी केली.
परंतु 'उर्ध्वरेता' या प्रकारात स्त्रीसंग अपेक्षित असतो. तो करताना ते मायेच्या बंधनात अडकले. पुढे १२ वर्षे ते त्या योगिनींच्या जाळ्यात अडकले. तेंव्हा त्यांना सोडवण्यासाठी त्यांचा शिष्य गोरक्ष तिथे पोचला. त्यालाही त्याच आव्हानांना सामोरे जावे लागले. 'उर्ध्वरेता' सकट सर्व आसने करून त्यांनी मच्छिंद्रांची मुक्ती मिळवली....
असे श्री ढेरे यांच्या"'नाथ संप्रदायाचा इतिहास' " मधे लिहिल्याचे आढळते....
ओशो यांच्या संभोगातुन समाधि कडे..मधे हेच तत्व असावे.
अर्थात हटयोग वा अश्या साधना गुरु शिवाय शिकणे कसे शक्य आहे?
गुरु वि्ण कोण दाखवील वाट...किती सार्थ आहे हा विचार..
अश्या सिद्धी येणारे अवलिये भेटणे व त्यांची कृपा होऊन हि रहस्ये समजणे हे भाग्याचेच लक्षण म्हणावे लागेल....
अविनाश

Tuesday, January 3, 2012

प्रेम रहस्य
आपण कुणावर तरी प्रेम करावे..अन कूणी तरी आपणावर जिव तोडुन प्रेम करावे हि मानवाचि उपजत अन निसर्ग दत्त अशी भावना आहे..असते..
प्रेम भावना हि सा~यांनाच हवि हविशी वाटणारी आहे.."पहिलिच भेट झाली,पण ओढ हि युगाची"अशी हि भावना असते..क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणाचा" हे गडक~यांचे म्हणणे किति सार्थ आहे..प्रेमासाठी माणसे स्वत:स संपवतात..दुस~याला संपवतात..युध्ध होते, खोटे बोलतात, सारे होते प्रेमासाठी..काय आहे हे प्रेम,ति भावना ते रहस्य,त्याचि सुत्रे...याचा घेतलेला एक मागोवा

१]विचार....प्रेमाचि सुरवात आपल्या विचारां पासुन होते..प्रेमाच्या विचाराचे तरंग मनात आले कि प्रेमाचा विचार सुरु होतो..ज्या पध्धतिचे विचार मनात असतात त्या प्रमाणे व्यक्तिमत्व घडत जाते असे म्हणतात..मनात घोळणा~या प्रेमाच्या विचाराने प्रेमाची अनुभुति, व प्रेमानुभव निर्माण होतात...विचारांचि सकारात्मकता आपला विश्वास व आपले इतरांच्या बद्दलचे विचार बदलु शकते...ज्या व्यक्तिवर आपण प्रेम करु इछ्छितो त्यांच्या भावनांचा व गरजांचा आपणास विचार करावा लागतो..आपला साथिदार कसा हवा या बद्दल आपलि मते व विचार नक्कि असावे लागतात कि ज्या मुळे भेटणा~या अनेक व्यक्तितुन आपणास साथिदारचि ओळख बरोबर चटकन पटते....
२]आत्मसन्मान....तुम्हि कुठल्याच व्यक्तिवर तो पर्यंत प्रेम करु शकत नाहि जो पर्यंत तुमच्या मनात त्याचा बद्दल सन्मानाचि, आदराचि भावना नाहि...सर्वात प्रथम तुमच्या मनांत स्वत:बद्दल आत्म सन्मानाचि भावना तुम्हि निर्माण करायला हवि...व ति निर्माण करताना स्वत:स विचारा " माझ्यात असे काय आहे ज्या बद्दल मला स्वत:चा आदर आहे?...अन दुस~या बद्दल ,मनांतुन जरी तो तुम्हाला आवडत नसेल तरीहि त्याच्यातल्या गुणांचा आदर करावयास शिका....
३]समर्पण....प्रेमाचे गणीत विचित्र असते...प्रेम मिळवायचे असेल तर आधि ते मुक्त पणे वाटावे लागते..प्यार बाटते चलो...जितके प्रेम तुम्हि वाटत चालाल तितके बदल्यात तुम्हाला ते परत मिळत राहिल...सदह्रुदयी व्हा, प्रेमळ व्हा व त्या प्रमाणे वागा, वागायचा प्रयत्न करा...प्रेमसंबंधाला होकार देवुन त्यात झोकुन देण्या पुर्वी असा विचार करु नका कि हि व्यक्ति माझ्या साठी काय करेल??उलट पक्षि असा विचार मनांत येवु द्या कि मी माझ्या साथिदारासाठी काय करु शकेल????साथिदारा बाबतचि हि समर्पणाचि भावना हेच सुखि प्रेम संबंधांचे रहस्य आहे...
४]मैत्री भावना....ख~या प्रेमाचि अनुभुति घेण्या आधि,ओळख करुन घेण्या आधि,ख~या मैत्रीचा,मित्राचा शोध घ्या,प्रेम म्हणजे एकमेकाच्या डोळ्यात पहाणे नसुन,दोघांनि एखाद्या गोष्टीकडे, एकाच विचाराने,एकाच वेळी बरोबरीने बघणे असेच नव्हे काय??...प्रेम म्हणजे त्या व्यक्तिस आहे तशी गुण दोषा सकट स्विकारणे..ति कशी दिसते? तिच्यात काय गुण आहेत याचे मुल्यमापन करुन नव्हे...मैत्रीच्या मातितच प्रेमाचि बिजे रुजतात व अंकुरतात...जर प्रेमातुन प्रेम संबंध रिलेशन वाढिस लावायचे असतिल तर आधि पक्कि मैत्री करणे आवश्यक आहे...
५]स्पर्ष....स्पर्ष प्रेम व्यक्त करण्याचे प्रभावि साधन आहे..जि भावना अनेक शब्दात तुम्हि व्यक्त करु शकणार नाहि ते काम एक हळुवार स्पर्ष करुन जातो...स्पर्षाने मानसिक व शारीरीक बंधने संपतात...व एक निराळा प्रेम संवाद सुरु होतो....
६]पाशमुक्त अवस्था....ज्या कुणावर प्रेम करीत असाल त्यास मुक्त सोडा, मोकळीक द्या...बंधनात अडकवु नका...त्यास जायचे तिकडे जावु द्या..जर ते प्रेम तुमचेच असेल तर तुमच्या कडे नक्किच परत येईल,आणी जर आले नाहि तर ते तुमचे नव्हतेच..कधिच नव्हते..तो एक तुमचा भ्रम होता..बंधनात प्रेम फुलत नाहि...प्रेम संबंधा मधे,रीलेशन
मधे,आपल्या साथिदारास विचार करायला वेळ द्या, बांधिलकी /जबाबदारी स्विकारण्या पर्वी प्रत्येकास विचार करावा लागतो,व त्या साठी वेळ द्यावा लागतो..आपला साथीदार आपल्या हातातुन निसटणार तर नाहि ना या भिति पोटी त्याच्या वर बंधने घालु नका, उगीच घाइ करुन गोंधळाची अवस्था निर्मांण करु नका....प्रेम म्हणजे एक भयमुक्त,अहंकार विरहि अवस्था..अनुभव..जर तर,किंतु परंतु, च्या पलीकडली एक सुखद अवस्था,...प्रेम म्हणजे..आज पासुन मी भयमुक्त आहे,माझ्या भुतकाळातल्या घटना चुका,आता मला घाबरवु शकत नाहि अशी एक नविन भयमुक्त,आत्मविश्वास पुर्ण अश्या नव्या जिवनाची सुरवात....
८]बांधिलकि/प्रतिबध्धता....तुम्हि जर आपल्या साथिदारा कडुन अमर्याद प्रेमाचि अपेक्षा करीत असाल तर,त्याच्या प्रेमाशि,त्याच्याशी तुमचि बांधिलकी,प्रतिबध्ध्ता हवि,...व ति तुमच्या बोलण्यातुन वागण्यातुन,कृतितुन पदोपदि दिसावयास हवि...तुमच्या ह्या कमिट्मेंट मुळे, प्रेमास एक ताकद मिळत असते..व त्याचि गोडिहि वाढत असते...जेंव्हा कुणाच्या प्रेमाशि तुम्ही वचन बध्ध असता त्या वेळी त्यातुन सुटुन जाणे हा पर्याय कधिच नसतो...वचन बध्धते मुळे प्रेमाचे नाजुक बंधने अजुन मजबुत होतात....
९]आकर्षण....एक मेका बद्दल वाटणारे आकर्षण हा प्रेमातला खुप महत्वाचा भाग आहे...ह्या आकर्षणा मुळे प्रेम फुलत रहाते..मनातुन शरीरा कडे असा हा अल्हादकारी,रोमांचक असा प्रवास असतो...ते शरीरा पुरते मर्यादित नसते तर तुम्हाला वाटणारा विश्वास,प्रेम,उत्साह,यातुन ये जागृत होत असते...प्रेम व सुखाचा तो एक असा सागर आहे ज्यात रोज बुडुन जायचे असते व जिवन जगायचे असते...जिवन समृध्ध पणे जगण्यासाठी ति एक प्रेरणा व मानसीक स्तरावर,आत्मीक प्रेमानुभव देणारी एक शक्ति आहे...
१०]विश्वासची भावना ....प्रेमात परस्परावरील विश्वासास खुप महत्व आहे...शंकेचा एक विचारहि तुमच्या साथीदाराच्या मनांत भिति, तणाव व खळबळ निर्माण करु शकतो..जर तुमच्या मनांत विश्वासाचि भावना नसेल तर प्रेमाची संपुर्ण अनुभुति तुम्हास कधिच मिळणार नाहि...आपल्या साथिदारावर प्रेम करताना त्याच्या मनांत "ह्याचे प्रेम अक्षय आहे" अशी भावना निर्माण होवु द्या.... प्रेमात वचन बध्ध होण्या पुर्वी स्वत:स विचारा कि "माझा त्याच्यावर/तिच्यावर पुर्ण १००% विश्वास आहे?" जर उत्तर हो असेल तरच पुढ्चे पाऊल टाका...नसेल तर पदरी निराशाच येणार नाहि का?

[अविनाश]

Monday, January 2, 2012

आळसावलेली दुपार..

आळसावलेली दुपार..

उन चांगलच जाणवत होत दुपारच..
घरी कुणीच नव्हत..
जेवल्यामुळे सार मन अन शरिर सुस्तावल होत.
कुठल तरी चटोर पुस्तक वाचत ति पलंगावर लोळत होति
वृत्ति जडशिळ झाल्या होत्या
अभ्यासा साठी मैत्रीण येणार होति
किति वेळ लावलास ग..आलेल्या मैत्रीणी कडे बघत ति म्हणाली
चल बसुयात का अभ्यासाला??
कंटाळा आला ग अभ्यासाचा ..म्हणत ति पण पलंगावर धबकली
काय वाचतेस..? ब~याच वेळ दोघि वाचत होत्या
ब~याच गपा झाल्या..डोळे जडावले होते..
आळसाने कमानि झाल्या होत्या शरीराच्या..
ब~याच कान गोष्टी झाल्या त्या दुपारी
ब~याच गोष्टी घडुन गेल्या त्या दुपारी
काहि आठवण्या जोग्या
काहि विसरण्या जोग्या
त्या आळसावलेल्या, सुस्त दुपारी.....
avinash

अनामिका..

अनामिका..

गाडि सुटता सुटता टिपला
फलाटावरील माणसांच्या दलदलीत रुतलेला
तुझा कमळासारखा देखणा चेहेरा..
स्लिव्हलेस ब्लाऊज व साडितला तुझा मादक रेखिव आक्रुति बंध..
काहितरी पडलेल उचलण्या साठी वाकली
तेंव्हा ब्लाऊज मधुन ओझरत झालेल तारुण्याच दर्शन
अन सार शरिर मुंग्यांच वारुळ झाल....
गाडी सुटता सुटता ओझरत झालेल तुझ दर्शन

रात्र झाली कि क्षिताजा पर्यंत पसरते अंधाराची चादर
निरव शांतता करते गप्प सारा कोलाहाल..
अश्या वेळी क्षितिजा पलिकडुन खुणावत असतो तुझा
देखणा मादक अक्रुति बंध मला वारंवार
अंथरुणावर पडलेल्या दिगंबर अवस्थेत...
आविनाश