Wednesday, August 25, 2010

अल्हाद वसंति

अल्हाद वसंति, संधी प्रकाशी कसे सांगु कुणा
दिसलास मला तु, उमदा अन देखणा

झालि भेट नजरांची,त्यात होता उत्स्फुर्तपणा
खटयाळ हास्य मीशीतले तुझे, होता मीश्किलपणा

अशाच भेटि घडत गेल्या,त्यातही होता सह्जपणा
घेतलास ठाव मम ह्रदयाचा, भावला तूझा स्वच्छंदीपणा

मी माझी राहीलेच नव्ह्ते, सरला होता रीतेपणा
नयनी तुझ्या हरवुन बसले, माझ्यातील मी पणा

प्रेम भावनांनी घेतला ताबा, होता तो बेधुंदपणा
भाळले तुझ्या हास्यावर, आवडला तुज, माझा वेडेपणा

दिलेस मुर्तरुप आपल्या नात्याला, अनुभवला अद्वैतपणा
नभीच्या चांदण्या सामावल्या ऒंजळीत माझ्या,
गवसला स्वर्गीचा ठेंगणेपणा......

@ Avinash

Monday, July 19, 2010

प्रणय रात्र

अधरावरल्या दंतव्रणावर जिभ ह्ळुवार फिरली
प्रणय रात्र ति आठविता, गात्रे पुन्हा मोहरली

धुंद सारे शब्द होते..कामधुंद त्या भावना
बहर प्रीतिचा मनि, अन मदन दाह सोसवेना
प्रणयाची लाट ओसरे,पण ओल अजुन राहीलि
ति प्रणय रात्र आठविता,गात्रे पुन्हा मोहोरेली

घेतले मिठीत तु अन कामगंध उधळले
मिसळता श्वासांत श्वास, गंध उन्माद्क परीमळे.
प्राशिता मकरंद अधराचा, खुण मागे ठेवली
ति प्रणय रात्र आठविता,गात्रे पुन्हा मोहोरेली

पुनवेच्या चांदण्यात सारी ,ति मधुरात्र डुंबली
प्रणय खेळ खेळता ,रात्र सारी जागवली
उन्मादक तृप्त तनु, काम रसानें माखली
ति प्रणय रात्र आठविता,गात्रे पुन्हा मोहोरेली
Aavinash

Sunday, July 18, 2010

प्रेम कविता

प्रेम कविता

नाहि कळत मला तुझ्या प्रेम कविता
त्या श्रुंगारीक उपमा....ते शब्द लालित्य
त्या अनुप्रासात,गण,मात्रात गूंफलेल्या शब्द रचना..
माझी प्रेम कविता चार अक्षरात सुरु होते व संपते..
"तु माझा
मी तुझी"
मला वाटते जगातली हि सर्वात सुंदर प्रेम कविता आहे

Aavinash

देहदाह शमवुन जा

देहदाह शमवुन जा.

सुगंधी श्वासांत श्वास तु मिसळवून जा
मखमली गालावर, प्रेमखुणा ठेवुन जा.
रसाळ अधरावर तुझे ,नाव तु कोरुन जा
ह्रुदयात जी लावली, ति आग तु विझवुन जा.

त्या कटाक्षानें तुझ्या,गात्रें सारी उमलली,
कवेत घेतलेली तनु,लाजेन चुर झाली,
मधाळ चुंबनाने जो देह सारा पेटला,
चंदनी स्पर्शाने तो दाह शांत करुन जा

शराबी डोळे,स्पर्श गहिरा,धुंद प्रितीचा,
उठले काहुर,लागली हुरहुर, ति मिटवुन जा,
दाटले तारुण्य माझे,त्या रेशमी काचोळीत,
वक्षावर त्या,अनंगाचा ठसा उठवुन जा.

फुलले, बहरले यौवन,देह सारा जाळते,
देहात मिसळुनी देह, देहदाह शमवुन जा.
ह्रुदयात जी लावली, ति आग तु विझवुन जा.
AAvinash.................

नाते जन्मोजन्मीचे

नाते जन्मोजन्मीचे
माझ्या घरावरुन तुझे ,रोज येणे जाणे असते
म्हणुन तर मी सजुन, रोज गॅलरीत उभि असते

एकदाहि नाहिस टाकिला तु, वर कधि कटाक्ष
समजेनासे झाले मजला, कसे वेधावे तव लक्ष

मुद्दामुन अनेकदा मी ,तुझ्या नजरे समोरुन गेले
पण नजरेचे तुझ्या अन माझ्या, मिलन नाहि झाले

तु असा कसा रे कलंदर, तुझ्याच विश्वात रमतो
हि वेडी तुजसाठी झुरते,तडफडते, हे कसे विसरतो

आवडतात तुला कविता ,असे मज बाहेरुन समजले
म्हणुन तर उद्देशुन तुला मी, प्रेम कविता रचत बसले

अनेकानि केली स्तुति,अनेकानी कौतुकाने थोपटली पाठ
नाहि आला तुझा अभिप्राय, ज्याचि होते पहात मी वाट

असशिल विश्वामित्र,स्वतःच्या विश्व निर्मितित दंग
मी पण बनुन मेनका ,नक्किच करेन तव तपोभंग

जरी वरवर दाखवित असशी मी तुझ्या खिजगणतित नाहि
ठावुक आहे तव ह्रुदयी ,मज वाचुन दुसरी कोणी नाहि

विश्वास आहे मज, तव हृदयी, मजसाठी फक्त प्रेम वसे
पति म्हणुन मी ,प्रियकरा तुजला जन्मोजमी ,वरले असे

Aavinash

अप्सरा

अप्सरा

तलम साडीतुनी डोकावे तुझा खांदा गोरापान
पडता नजर त्यावरी होइ मन खट्याळ व बेभान

कापलेले रेशमी केस रुळति तुझ्या गो~या पाठिवर
अवखळ रेशमी बटा येती तव डोळ्यावर वारंवार

हिरेजडीत कर्ण भुषणे डुलती.वा~यासंगे आनंदुन
ओशाळला गुलाव.. तव गौर गुलाबी तनु पाहुन

मोहक गुलाब लाली गालावरची लाजविते लज्जेला
रति रुप असे देखणे ,का तु लाजवितेस अप्सरेला

लवता नेत्र पापणी,तेजस्वि नेत्र प्रभा अशी फाके
विलगता अधरपाकळ्या. शुभ्र दंतपंक्तिची रांग झळके

नाजुक मंगळसुत्र रुळते ,तव वक्षस्थळांच्या घळी
भाग्यवान धनी,नावाने ज्याच्या कुंकु लावितेस भाळी

Aavinash

नव्हते मनांत तरीहि


नव्हते मनांत तरीहि,कसे अघटीत घडले
त्या चित्त चोरट्याला,आपले म्हणुन बसले

होते पुढे शिकायचे,आइचे ऎकुन बसले
वधु परिक्षेस मी,का सजुन बसले?

त्या हस~या छबित,मीच हरवुन बसले.
त्या एका कटाक्षाने,घायाळ होवुन गेले..

बोलणे असे आर्जवि,का मनास गुंतवावे.?.
ठेवले जे सांभाळुन,का वाटे उधळावे?

असेल मी आवडली?,कितिदा मना पुसावे
येइल का होकार,म्हणुनी किति झुरावे

येता होकार त्यांचा,मन पाखरु व्हावे.
वाटे हे जिवन,त्या चरणी अर्पावे..

नव्हते मनात माझ्या,मग का असे घडावे?
या गारुडास सांगा,काय नाव द्यावे?

त्या रात्रीचे काय सांगु, तोल् माझा गेला होता.


रात्र चांदणी होति, अंधार मातला होता,
त्या रात्रीचे काय सांगु, तोल् माझा गेला होता.

दोघांच्या देहां मधे श्वासाचेच अंतर होते
तिच्या उष्ण श्वासांनी देह तापला होता

त्या काळ्या कुंतलात, शशि चमकत होता
नेत्र शांभवि पिताना,माझा पाय घसरला होता.

सभ्य संयमीत मी, वक्षावर नजर घसरली
ढळला पदर तुझा, अन, तनु सारी कल्लोळली

हातात हात घेता,हात तु सोडवुन घेतला
भिति तुला वाटत होति, पण स्पर्श हवहवासा वाटला

शांत होते आसमंत , मंद वारे वहात होते, ,
रात्र होति वादळी, आपले विश्व बदलले होते

संपली रात्र केंव्हा, ना कळले तुला न मला
कळिचे फुल उमलले,ना कळले तुला न मला

ति रात्र वादळी होति , कि दोष माझा होता.
वाटच निसरडी होति, पाय घसरला होता

बेभान श्रावण

बेभान श्रावण


हळवे ग मन
गाते गाणे मन

गोरे गोरे पान
रुप हे बेभान

गालावर खळी
पडते ग छान

बेभान श्रावण
मदनाचा बाण

अधिर यौवन
सजलीस छान

अधरात ठेवलय
गुपित दाबुन

लवते नयन
येणार कोण?

नाचते ग मन
येणार साजन

avinash

डोळे

डोळे

लाजभरे,सलज्ज नेत्रपल्लवि विसरु लागले डोळे
का आता सावजे, हेरु लागले तुझे धिट डोळे

अंगभर पदर,किति गोड विनयी होति देहबोली
ढाळुन पदर,दाखवित उरोज,खुणवु लागले डोळे

तो भाव प्रेम समर्पणाचा,विसरले तुझे डोळे
सार शरीर आता ,ओरबाडु लागले तुझे डोळे

सात जन्माची सोबत कशी विसरले .तुझे डोळे
रात्र भर पुरे सोबत ,का म्हणु लागले तुझे डोळे


avinash

प्रित माझी कळेना..


या प्रियकराला,प्रित माझी कळेना..
अधरी अडकति शब्द ..भाषा डोळ्यांचि उमजेना

मास श्रावणाचा .,शशि तेवतो नभि
ते चांदणे हि शितल..पण तनुदाह सोसवेना

सुकुन गेले अधर..,कोमेजली काया.
कसा कठोर हा..मम दुःख्ख त्यास कळेना,,

आठवता छबि..विज तनुत कल्लोळे
रात्रभर ना डोळ्यास डोळा..ना पापणी मिटेना

वाटते असे..हे गुपित त्यास वदावे
हि लाज गडे मुलखाचि..पाठ माझी सोडेचना
avinash

मिळता नजरेस नजर


मिळता नजरेस नजर
श्वास थांबुन गेला
मनात मन मोराचा
पिसारा फुलु लागला

कशी चुकवु नजर
जिव गोंधळुन गेला
त्या हस~या छबिचा
काळजाने ध्यास घेतला

त्याच्या लाघवि बोलण्यात
जिव रंगुन गेला
या बिन चेहे~याच्या जगात
वाटले साथी मिळाला

अधिर हव~या स्पर्शाने
तनुत चंद्र उजळला
चुंबिता कोवळे अधर
गात्री मदन सळसळला

लोचने त्रुप्त् झालि
स्वप्ने नयनी तरळे
प्रुथक् भाव् विरघळे
अद्वैत भाव आला

पुजले प्रेम दैवताला
कौमार्य नैवेद्य वाहिला
विश्वासु सखा होता तो
जिव्हारी घाव देवुन गेला

उतरता धुंदी प्रेमाचि
जगाचा व्यवहार कळाला
तो पहिला घाव
बरेच शिकवुन गेला

@...अविनाश. बेभान स्वछ्छंदि मुक्त जिवन

या गर्द नील नयनी


या गर्द नील नयनी, दाटून मेघ आले
का मोर पापण्यांचे मिटवून पंख बसले..?

तुझ्या आठवणीने रे,मन कसे विभोर झाले
कसे आडवु आसवांना,नयनि पुर बघ आले.,

त्या प्रेम पावसाने,अशी चिंब चिंब भिजले
नाहि रे मी विझले,आत जळतचि राहिले

घेतले होते रे मिठित, चमकुन गेलि दामीनि
रान वारा उफाळला, या नाजुक बिलोरी यौवनि

अंग अंग गात्रांग,प्रीत रंगात नहाले
नेत्री आनंद आसवे,देहात चांदणे झळाले

ऎकता अनंग कथा,सहन हो‌ईना मदन चाळे
त्या काम दाहात, शरीर नाजुक होरपाळले

तु रमता धुंद यौवनि. मी तुझीच रे झालें
राखले होते जे तुजसाठी.ते तुला अर्पिलें


आठवता हे सारे नयनी, दाटून मेघ आले
अन मोर पापण्यांचे मिटवून पंख बसले..

Avinash

Tuesday, January 5, 2010

चुंम्बनाचे सुंदर प्रकार

चुंबनाचें प्रकार.
चुंबनाचे खालील प्रमाणें निर निराळें प्रकार आहेंत. जर आपणा पैकी कुणास यातला प्रकार आवड्ला तर आपण त्याचा प्रायोग करु शकता.[आपल्या जोडिदारा बरोबर]

फुलपाख्ररु चुंबन-ह्या चुंबन प्रकारामधें प्रेयसीनें तिचा चेहेरा प्रियकराच्या चेहेऱ्याच्या एक श्वासांच्या आंतरावर आणावा. आणी त्याच्या नजरेंत नजर मिसळुन आपल्या डोंळ्यांच्या पापण्या फुलपाखरच्या पंखा प्रामाणें फडफडाव्यांत. डोंळ्यांच्या पापण्यांचि फडफड ह्रदयांची फडफड वाढवण्यास समर्थ असते..

मान चुंबन- हे एक मैत्रिपुर्ण. "तु मला खुप आवडतिस" प्रकारच चुंबन आहे. नुकतिच नविन ओळ्ख होत असताना तिच्या खांद्यावर हात ठेवुन हाळुवार पणें आपलें ओठ तिच्या मानेंवर फिरवावेत

कर्ण पाकळी चुंबन- हळुवार पणॆ तिच्या कांनाचि पाळी [पाकळी] ओठांत घ्यांवी व ति पाकळी हळुवार पणॆं चुंबण्यास सुरवात करावि, जोरात आवाज करीत पाकळी चोखु नये. कान संवेदनाक्षम असल्यांने आवाजा मुळें रसभंग होण्यांची शक्यता आहे.

एक्सिमो चुंबन- तिच्या चेहेऱ्याच्या जवळ चेहरा आणुन आपल नाक तिच्या नाकांवर हळुवार पणॆं घासाव..[एक्सिमो लोकात हि पद्धत खुप लोकप्रिय आहे]

तुहिनशर्करा {बर्फ} चुंबन- हे एक खुप मजेदार प्रकारचें चुम्बन आहें. एक बर्फाचा तुकडा तोंडात घे‌उन तोंड उघडत आपल्या जोडीदाराचें चुंबन घेत बर्फाचा तुकडा जिभेंने तिच्या तोंडात सरकावा. व तिनें पण जोडीदाराच्या तोंडात बर्फाचा तुकडा जिभेंने त्याच्या तोंडात सरकावा...भडकलेल्या प्रणय ज्वाला बर्फ वितळविण्यास समर्थ असतात

सोन पा‌उल { पादाङगुलि } चुंबन- हि एक प्रणयाराधानांची क्रिया आहें. तिच्या टाचा जवळ घे‌उन टाचांचे चुम्बन घेत हाळुवार पणें तिच्या पायाच्या तळव्यांवर चुम्बनाचा वर्षाव करावा. पायाला गुदगुल्या झाल्यानें प्रणयाराधान करतांना मजा ये‌इल.

ललाट {कपाळ} चुम्बन- हे एक मैत्रिपुर्ण भावनांचे प्रातिक असलेले चुम्बन आहें. समोरच्या व्यक्तिच्या कपाळांवर ओठ टेकवुन हे चुम्बन घेतलें जाते, वात्सल्य व मैत्रि भांवाचे प्रतिक असणारें हें चुंबन आहे..

फ्रेन्च चुम्बन-[ French Kiss]- ह्या चुम्बन प्रकारांत दोन्हि जोडिदार जिभेचा वापर करतात. तोंड उघडुन एकमेकांचे ओठ ओठांत घेंउन व एकमेकांच्या जिभेंला जिभ लावत व एक मेकांच्या श्वासांची मुखांतुन देवाण घेवाण करित हे चुम्बन घेतले जाते. French Kiss या नांवान हा चुम्बन प्रकार जगांत ओळखला जातो. पण गंमत म्हणजे French लोक या चुंबन प्रकारास "The English Kiss". अस म्हणतात.

फल रसामृत चुंबन-एखाद्या फळांचा तुकडा दोन्ही ओठांमधें पकडवा.[शक्यतो द्राक्ष, स्ट्रा बेरी, अननसाचा छोटा तुकडा, अंब्याची फोड अस रसाळ फळ असाव]
व तिच चुंबन घेत तीच्या ओठांवर तो तुकडा चीरडत रहावा.अर्धा तुकडा तोडत एक मेकांच्या मुखांतला रस एक मेकांच्या मुखांत सोडत चुंबन घ्यावे.

हस्त चुंबन... हळुवार पणें तीचा हात हातात घेत ओठ तीच्या हातांवर हळुवार पणें घासत तीच्या हाताचे चुंबन घ्यावे. कमरेत वाकुन हे चुंबन घ्यावयाच असत. तीच्या बद्दल आदर दाखवण्यासाठी हा चुंबन प्रकार आहे ..पुर्विच्या राज घराण्यात् हि पद्धत् होति

ओष्ठ व्रण चुंबन.... हे चुंबन घेताना तीच्या ओठांचा नाजुक पणें चावा घेत तीचें चुंबन घ्यावें. ओष्ठावर चाव्यांचा व्रण असल्यांन तीला कळत कि हे चुंबन स्वप्नांतल नसुन सत्यातल आहे.

Avi