Sunday, July 18, 2010

नव्हते मनांत तरीहि


नव्हते मनांत तरीहि,कसे अघटीत घडले
त्या चित्त चोरट्याला,आपले म्हणुन बसले

होते पुढे शिकायचे,आइचे ऎकुन बसले
वधु परिक्षेस मी,का सजुन बसले?

त्या हस~या छबित,मीच हरवुन बसले.
त्या एका कटाक्षाने,घायाळ होवुन गेले..

बोलणे असे आर्जवि,का मनास गुंतवावे.?.
ठेवले जे सांभाळुन,का वाटे उधळावे?

असेल मी आवडली?,कितिदा मना पुसावे
येइल का होकार,म्हणुनी किति झुरावे

येता होकार त्यांचा,मन पाखरु व्हावे.
वाटे हे जिवन,त्या चरणी अर्पावे..

नव्हते मनात माझ्या,मग का असे घडावे?
या गारुडास सांगा,काय नाव द्यावे?

No comments: