Saturday, June 30, 2007

चांदणी तु शुक्राची


तु मुसमुसलेली, षोड्शा,सुंदर बाला,
घातला नजरेन,तु,ह्रुदयावर की घाला.
नजर धारधार, यौवनाचा कहर,
तु तिलोत्तमा नि रतीहुन भासे सुंदर.

साडीत लपेट्ले,गोरे कोवळे तन,
काचोळीत बांधले, खट्याळ ते यौवन
यौवन गंध दरवळे अवती भवती,
उन्मादक नजर आग भडकवे वरती.

तो मुखडा सुंदर,गोजिरा अन लाजरा
ते नयन चेट्की, त्यावर पापण्यांचा पहारा.
ओठांची महीरप,करे मम मनांस दंग
आत असे दंतपंक्ती कि शुभ्र मोत्याची रांग.

तु मधु शर्वरी, चांदणी तु शुक्राची
सुंदर चाफेकळी तु, कळी लावण्याची,
उतरली भु तळी रंभा की अप्सरा
वळती तुझकडे वारंवार की नजरा.

काय करावी शायरी तव रुपावर
शब्दांचा खजीना,अपुरा वाटे खरोखर
कीती करु गोळा मी शब्दांचे हे कण
नाही होत पुरे तव रुपाचे वर्णन

Thursday, June 28, 2007

प्रेमाची खुमारी

ति चिडलेली,,मी भडकलेला
ति त्या खोलीत,तर मी या रुम मधे बसलेला....

तिचा आवाज फारच चढलेला,
निदान मला तरी अस वाटत होत.
मी पण जरा घाबरलेलाच
कारण आज ति फारच चिडली होति...

तस पाहील तर माझीपण चुक होती,
तिन तरातरा येवुन माझे केसच गच्च धरले..
डोळे पाण्यान तरारले होते,
"समजतोस काय स्वतःला.. मी सहन करते म्हणुन"

ति माझ्या इतकी जवळ होती,
तिची वक्षस्थळे माझ्या छातिला चिकटली होती.
तिला मिठीत गच्च आवळले होते,
’सोड मला, ति चिडुन बोलत होती,
मी चुंबन घेतल.ति सोड सोड म्हणत होती,

तिच्या कानांत I am sorry..love u dear हळुवार पणे म्हणालो.
"तुला माहिती आहे, तु मला किति आवडतोस,
मग का वागतोस माझ्याशी अस" ति म्हणाली

मी तिच्या वक्षावरुन हात फिरवीत होतो.
तिच्या शरीरात. मी मिसळलो होतो,
सार भांडण संपल होत..
"काय रे भांडाभांडी पेक्षा हे प्रेम किती सुंदर आहे’
छातिवर डोक घासत ति म्हणाली.
पण भांडाभांडी नंतर ह्या प्रेमाची खुमारी काही ऒरच आहे..मी म्हणालो...

Tuesday, June 26, 2007

निरव शांतता,

कै .बाबांच जुन रोलेक्स घड्याळ सापडल
म्हणाल्याच आठवल,"आता उरलेला सारा
वेळ तुझ्या बरोबरच काढणार, प्रॉमिस."
====================

दुपारच रणरणत ऊन, निरव शांतता,
भन्नाट वारा सुटला, अन गारांचा पाऊस सुरु झाला
आंगण मुलांनी भरुन गेल
==================
आईच्या स्तनांच्या घळीत,
बाळ शांतपणे झोपल होत,
अंगठा चोखत.
==================
रात्रीच्या वेळी आकाशातले तारे मोजत होतो,
त्या ब्रह्मांडात कुठे हरवलो ते कळलच नाही.
=====================
रात्रीच्या काळोखात, एकदम लाईट आले,
अन, मग लक्षात आले, मी तुझ्या बाहुपाशात होते
====================

लक्ष माझें हटेना,


लक्ष माझें हटेना,
तव सुंदर चेहे~या वरुनि,
लक्ष माझें हटेना,
काळी काचोळी, आत यौवन,
मन तेथुन हालेना,

प्रेम तुच, काम तुच,
रंग तुच, गंध तुच,
तुच प्रीति, तुच माया
तुच प्रित, तुच गीत.

कसला करते विचार
पाप पुण्य, विसर सारे,
ये माझ्या बाहुपाशांत,
विसरशील जग सारे.

अनावृत देह तुझा
जादुची किमया असे,
तुझ्या प्रीति पुढें,
सारे सुख फिके असे.

आलिस मिठीत जेंव्हा
काम गंघांची करीत उधळण.
लक्ष कंपने देहात,
मिसळता देह देहात.

तुझे तारुण्य अन यौवन
प्राशतो मी कण नी कण,
ओंजळीत दिले मी तुजला,
तृप्तिचे लक्ष लक्ष क्षण

मुलगा

मुलगा
मला तरुण मुल खुप आवडतात.
खुप छान दिसतात.
त्यांची कांति रसरशीत असते,
डोळ्यात उत्सुकतेचा भाव आसतो.
सार काहि नविन असते त्यांना.

त्या दिवशी तो घरी आला होता
खुप छान दिसत होता.
ओठांवर कोमल मिसरुड फुटली होति
काय रे.. त्याला विचारल.
काहि नाहि.. तहान लागली म्हणुन आलो.
त्याला पाण्याचा पेला भरुन दिला.

पाणी पितना बघत होते त्याच्याकडे.
वाटल घ्याव त्याला बाहु पाशात,
अन, लपवुन टाकाव त्याला हया शरीरात.
शिकवाव सार त्याला.
लावावि चटक त्याला... होइल गुलाम ह्या शरीराचा.
शरीर वासनेन पेटल होते.

निघतो मी.. ग्लास टेबलावर ठेवत म्हणाला.
का रे थांब ना..मी म्हणाले..
तो माझ्याकडे बघत होता..
मला वाट्ल शरीराची गोलाइ न्याहाळत होता..
नको जातो उशीर झाला आहे. तो म्हणाला..
त्याच्या बाइक वरुन निघुन गेला..

सारे शरीर पेटल होत.
आरश्यात कमनिय देह न्याहाळत होते..
अन भानावर आले.
हे काय होते आहे मला..
मनांत विचार आला..’
शेवटी तो पण कुण्या आइचाच मुलगा आहे ना.
वासनेचा विखार उतरला..मन शांत हो उ लागल
लक्षात आल, "मला पण त्याच्या वयाचाच मुलगा आहे"
ह्या जाणीवेन. मन ताळ्यावर आल..
आरश्यातल्या, माझ्या प्रतीमे काडे बघायची हिम्मत होत नव्हती


सेकंड हनिमुन

सेकंड हनिमुन
सेकंड हनिमुन च्या कल्पनेन ति मोहोरुन गेली होति.
पार्लर मधे जावुन केस ट्रीम केले होते,
फेसियल..काय, काय काय चालल होत तिच..
गप रे तुला कांही कळत नाहि..मला गप्प केल.

हिल स्टेशन च्या ते रम्य अन शांत वातावरण,
सार वतावरण धुन्द होते.
ति माझ्या मिठीत पहुडली होति.
एकदम मला हसु आले.
का हासलास?..ति..म्हणाली.
आठवती पहिली रात्र..अस म्हणालो अन तिलही हासु फुट्ल.

त्या रात्री तिला न काहि कळले न मला काहि जमले.
पहिल्या बॉल वर आउट झालेल्या खेळाडु सारखा चेहेरा झाला होता.
खुप नर्व्हस होतो.. मग तिच्या शरीरची ओळख झाली
तिला पण ति करुन दिली.सार जमत गेले..
अन दिवस मंतरल्या सारखे झाले.
दिवस कसे भराभर सरले ते कळल नाहि..

तिच्या कडे बघितल. चेहे~यावर काम धुंद भाव होता.
खुप सुंदर दिसत होति.वय झाल वाटत नव्ह्त..
छान दिसतेस..चेहे~यावर हात फिरवित म्हणालो..
हाताच चुंबन घेत तिने होकर दिला.
अन एकदम मी माझ्याकडे पाहिल..

काय झाल होत माझ?.
जिवनच्या धकाधकीत पुर्विचा राहिलो नव्हतो
निम्मे केस गेले होते, चश्मा लागला होता, पार बद्ललो होतो.
मनांत विचार आला. खरच मी तिला आवडत असेल??
तु खुप सुन्दर आहेस, पण मी वयस्कर वाटतो..मी म्हणालो
थोडस ओश्याळल्या सारख झाल होत.
ति खळखळुन हसली." वेडा रे"
अरे तु तुझ्या नजरेन मला बघतोस म्हणुन मी तुला छान वाटते.
तु माझ्या नजरेन बघ, तुझ्या कडे, मग तुला कळेल.
ति म्हणाली..’अरे तु मला अजुनही तसाच दिसतोय..
बालिश , धांधरट, केस विस्कटलेला,
थोडासा बावळट, अन खुप रोमॅंटिक..फक्त माझा..

ऎकल्यावर खुप हलक वाटत होते.
बराच वेळ ति बाहुपाशात होति...

पहाट केंव्हा झाली ते कळलच नाही....

दैना

दैना
नव्ह्ती द्यायची साथ तर
हात तु धरलास का?
होणार नव्हती पुरी ति
स्वप्ने ति दाखवलिस का?

चुंबिलेस ओठांस माझ्या,
यौवन तु चाळवलेस का?
नव्ह्ति ऎकायाची साद
तर हाक तु मारलीस का?

तंग चोळीत माझे
अंग सारे होरपाळते
घे मिठीत घट्ट मजला
भीक तुजला मागते..

नव्हते करायचे शांत तर,
हे यौवन तापवलेस का?
नव्हते घ्यायचे मिठीत तर
तर नजरेने इशारा केलास का?

मी अशी उभी एकटी
न सखा न सोबती
सोडुन अर्ध्यावर गेलास अन
दैना अशी तु केलिस का?

बघ काय केलेस तु माझे,
जिवनाचा खेळ झाला,
चिंध्या झाले माझ मन
ना आवडे पाणी ना अन्न.
शुन्यात नजर ति लागली
जगण्याची उमेद संपली
जडला जिवघेणा प्रेम रोग
ये जवळि अन घे मिठीत.
हीच दवा या रोगाला.
चंदणी हि रात्र, अंग अंग जाळी,
एकदा तरी तन शांत करण्या
सख्या तु येशील का?

Sunday, June 24, 2007

अस्तीत्व

घे माझा हातात हात आणी
सांग मला तुला काय सांगायचे आहे.
कुजबुज हळुवारपणे माझ्या कांनांत
सा~या त्या प्रेमाच्या गोड गोष्टी
घे मधाळ ओठांचे चुंबन,
चंदनि कायेला स्पर्श कर.
उफाळुन आण तुझ्यातली काम वासना.
कर विवस्त्र मला, अन घे बाहुपाशात.
तुझ्या बाहुपाशांत, विरघळेल, माझि भिति, माझ्या वेदना
ह्या रात्रीच्या अंधारात.
तुच माझी प्रेरणा,हो वाटाड्या.
उगवत्या सुर्य किरणात, सुध्धा
दे तुझे पंख मारु दे मला भरारी
अन उभारु दे मला असताना तु जवळ.
तोड माझी बंधने अन ये मम ह्रुदयात.
हिच वेळ रे ,कोसळलेली,बंधने बघण्याची.
अरे बंधनात होते मी, कर मोकळी सारी
तोड सा~या श्रुंखला, कर बंधमुक्त.
नाहि रे ताकद माझ्यात लढण्याची,
गरज आहे तुझ्या मदतीची.
मी तयार आहे.घे सामावुन तुझ्यात.
हे मुक्त तन,अन मन तुझ्यासाठीच आहे.
घे मिठीत ,अन विरघळुन जा माझ्यात.
उसळु दे प्रेमाच्या लाटा,येवु दे तुफान,
मिटवते माझ अस्तीत्व,तुझ्या अस्तीत्वात,

Wednesday, June 20, 2007

orkut - अविनाश's Profile

orkut - अविनाश's Profile

स्वप्न


तुझि वाट पाहुन थकले होते..
सा~या शरीराला आग लागली होति
मन तुझ्या शरीरात आडकल होत.
गाउन काढुन फेकला होता, विवस्त्र होऊन तुझि वाट पहत होते.
तुझी वाट पहाता केंव्हा डोळा लागला ते कळलच नाही

तुझी बोटांच्या स्पर्शान सा~या शरीरात वणवा पेटला.
तुझ शरीर माझ्या शरीरात केंव्हा रुतल ते मलाच कळल नाही.
सा~या शरीराचा चोळामोळा केला होता..
खालच्या ओठांची पाकळी चोखुन हुळहुळी झाली होती..
सा~या शरीरात काम चेतना खेळत होती..

तुझ्यांत मी कधी विरुन गेली कळलच नाही..
वासनेच्या डोहांत खोल खोल सुखांच तो क्षण आला..
शरीरातुन वेगान सुखाची लाट बाहेर पडली..
सार मन, शरीर चिंब चिंब भिजल होत..
सा~या शरीरावर सुखाची साय पसरली होती..

खाडकन डोळ उघडला.. बेडरुम मधें मी एकटीच होते,
दिवा ढण ढण जळत होता. गाउन घतला दिवा मालवायला उठलें..
स्वप्न कि सत्य कळत नव्ह्त..हो स्वप्नच ते..
त्याचा ओलसर पणा शरीराला जाणवत होता.
सहज आरशात नजर गेली. निरखुन पहिल अन..
खालच्या ओठावर दंत व्रण दिसत होता. रक्ताळलेला..
अन स्तनावर नखक्षतांची रांगोळी घातली होति..

स्वप्न कि सत्य कळत नव्ह्त.
विचार करत होते. डोळा कधि लागला कळलच नाही...

जेवण

जेवण
संध्याकाळी घरी आल्यानंतर हातपाय धुतल्यावर नेहेमीप्रमाणे विचारु नकोस
की जेवण तयार आहे का..
आज मी जेवण तयार केल नाही..
आज मुड नाही रे...
महाबळेश्वर हुन आपण आणलेल्या सा~या स्ट्रा बेरी मी टेबलवरच्या ग्लास बाउल मधे ठेवल्या आहेत..
त्या मुठभर मी तोन्डात घेणार आहे..
अन तु तुझ्या ओठानि त्याचा सारा रस चोखुन घ्यायचा आहे..
होय मला माहित आहे ओठतुन सारा रस वक्षावर
अन ओटी पोटावर ओघळतोय,
पण तो तु ओठांनी हाळुवार पणें टिपून घ्यायचा आहेस..
ह्या बेधुन्द संध्याकाळी. आज, थोड वेड्या सारख वागायच आहे..
सा~या स्ट्रा बेरी आपण अशाच संपवणार आहोत...
संध्याकाळी घरी आल्यानंतर हातपाय धुतल्यावर नेहेमीप्रमाणे विचारु नकोस
की जेवण त्तयार आहे का..

सुवर्ण

तव सुवर्ण कांति असो,
वा असो सावळी काया.
तु असो पुरंध्री,
वा नवथर तरुणी माया..

तु असे पद्मीनि,वा जहालशी शंखीणि,
ललना साधी, वा,सुंदरशी तरुणी,
आम्हि भ्रमर, तृष्णा आम्हा,
तव प्रेम रसाची राणी.

रुप कामुक असो वा सोज्वळ साध्विचें
आकर्षण आम्हा,तुझ्यातल्या रतिचे.
पात्र मृत्तिकेचें असो वा सुवर्णाचें,
वेड मजला आतल्या अमृताचें

प्रणय रात्र


प्रणय रात्र ति बेभान होति,
तु नवखा, होति मीहि नवखी,
सुटता वसनें,फिरे तनुवर हात,
घेता मिठीत,लक्ष लक्ष कंपने, देहात.

हात फिरे चैत्यन्य कुंडावर
लक्ष लक्ष ठिणग्या मस्तकांत,
फुटली कुपी अत्तराची,
माखला देह सारा, त्या अत्तरांन,

अरे आपल दोघांच गुपित,
बंद होत त्या अत्तराच्या कुपित.
मी जपल होत तुझ्यासाठीच,
आता बंद झाल ते, ह्या देहाच्या कुडित..

हसुन

ति हसुन जरा बोलली,
आम्हि त्यालाच प्रेम समजलो
हृदय घायाळ, जिवाची तळमळ,
उमेदिचें दिवस वाया घालवुन बसलो....

पाउस

पाउस
भेटण्यास आलि तु अन
पाउस सुरु झाला होता,
थांबण्यास मज जवळ
किति सुंदर बहाणा होता.

बाहेर पाउस, गारठा हवेत.
आग देहात, कंपने ह्रुदयात.

कमनिय बांधा तुझा,
धिर धरु किति,
हा वेडा एकांत
मनांस आवरु किति.

घडावयाचे विपरीत,
नेमके तेच घडले.
घेतले मिठित तुजला
भान आपले हरपले.

चुंबिता मधाळ ओठांना
गालावर पसरली लालि,
फिरता हात वक्षावर
सारी तनु थरथरली.

भान नसे वसनांचे,
देह नग्न मिठित असे,
सोड ति सारी लाज,
साथ प्रेम चेष्टेस दे सखे.

रमलो देहात आपण
काळांचे भान राहिले नाहि,
पाऊस केंव्हाच थांबला होता,
तिकडे लक्ष गेलेच नाहि.
delete


वेळ नाहि.

सारी सुखे पदरात आहेत
पण हसुन बघायला वेळ नाहि.
ह्या धावपळीच्या जिवनामधे
जगण्या साठी सुध्धा वेळ नाहि.

आईचे उपकार सदा स्मरतो
पण विचार पुस करायला वेळ नाहि.
सारी नाति तर मोडुन पडलीत
त्याना पुरायला पण वेळ नाहि.

सारी नांवे मोबाइल मधे आहेत
पण फोन करायला वेळ नाहि.
दुस~याना देण्याबद्दल काय बोलु
घरच्यांना द्यायला क्षण भर वेळ नाहि.

डोळ्यावर झोपेची झापड आहे,
झोप घ्यायला वेळ नाहि.
मन वेदनेन भरल आहे,
पण रडण्यासाठी वेळ नहि.

कमवण्याच्या शर्यतित असा पळतोय,
कि थकण्याला पण वेळ नाहि
दुस~यांच्या मनांचा काय करु विचार
स्वत:च्या स्वप्नासाठी सुध्ध वेळ नाहि

हे जिवना तुच आता सांग
ह्या आयुष्याच काय होणार,
प्रत्येक क्षणाला मरणारे आम्हि
जगण्या साठी पण वेळ नाहि

माझे पपा..

माझे पपा..
पपा मला तुम्ही खुप आठवता,
पपा मला तुम्ही खुप आवडता,

मला आठवत,मी लहानपणी,
तुम्ही दाढी करताना बघत बसायचीं
अन नकळत, माझ्या गालाला, ब्रशन साबण लावायचा..
"करायची का दाढी," म्हणत चिडवायचें..
दाढी झाल्यावर तुमच्या गालाची, पप्पी घेतना,
दरवळणारा,ओल्ड स्पाइस, लोशनचा गंध,
अजुनही, मनांत दरवळतो आहे.

पपा मला तुम्ही खुप आठवता,
पपा मला तुम्ही खुप आवडता,

नाही,शब्द माझ्यासाठी नव्हता,
तुमच सा~याला हो च असायच.
सिनेमा हो, नाटक हो, पिकनिक हो,
पण तेव्हडीच करडी नजर, अन शीस्त.
तुम्हि स्वातंत्र्य दिले, अन त्याचा अर्थ हि दिला.
ति माया, शिस्त, आजहि धामन्यातुन वहात आहे.

पपा मला तुम्ही खुप आठवता,
पपा मला तुम्ही खुप आवडता,

लहान पणी तुम्ही शाळेत यायचा.
वर्गातल्या मैत्रीणी, म्हणायच्या,
तुझे पपा किति स्मार्ट आहेत..
पपा तुमचच सार रुप अंगावर घेतलय.
तेच संस्कार, तिच शिस्त,तेच प्रेम,
सारच तुमचच, आहे.पपा..

पपा मला तुम्ही खुप आठवता,
पपा मला तुम्ही खुप आवडता,



ऑरकुट नामक जादुई नगर

ऑरकुट नामक जादुई नगर
मित्रांनो सारी गंमतच आहे.
आपण सगळेजण ह्या ऑरकुट नामक
जादुई नगरीत कैद झालो आहोत.
सगळेच एकमेकात आडकलो आहोत.
हा माझा मित्र, तो त्या मित्राचा मित्र.
सारे जण मैत्रीच्या धाग्यात बांधले आहोत.
एक गोड गुंता आहे. मस्त वाटत आहे.
ह्यातुन सुटण फार अवघड.
आहो माउलीनच म्हटल आहे,
लाकडी तुळया, लिलया पोखरणारा
भ्रमर, कमळात कैद झाल्यावर कमलदलाच्या,
पाकळ्या तोडुन उडुन जाउ शकत नाहि.
कमल उमलल्यावर उडुन जातो,
थोडक्यात आपल्या भाषेत,
"च्यायला,साल सगळ ऑरकुट होउन बसलय."
तुझ्या रुपात मन कैद माझे झाले.
तो कविता वाचत होता.
"गप रे" ति वैतगली होति.
जरा सिरीयस बन. २ वर्षे झालीत..
बाबा मागे लागलेत लग्नासाठी..

माझा हो कळव.. तो हसत म्हणाला..
अन काय कळवणार? तुला ना नोकरी,
ना काहि व्यवसाय. अरे लग्न म्हणजे गंमत नाहि.
अग गंमतच आहे. लग्न म्हणजे सहजिवन, प्रेम,
एक मेकात आडकण.लग्न म्हणजे संलग्न.

वेडा आहेस. अरे लग्न म्हणजे संसार,
म्हणजे घर, दुध, किराणा, मुल, म्हणजे पैसा..ति म्हणाली
हातात हात तुझा, अन तुझी साथ. पैसा येइल. येतो. तो म्हणाला
पैसा म्हणजे परसातल प्राजक्ताच झाड नाहि.
हालवल कि फुलांनी आंगण भरुन जात..तिन फटकारल..

अग पण, तो बोलायच्या आतच ति म्हणाली..
पैसा कि प्रेम हा वाद विवाद कालबाह्य आहे..
प्रेमाच्या जागी प्रेम आहे, अन पैसा त्याच्या जागि.
तु मल खुप आवडतोस.. पण तु मला विचार करुन निर्णय दे.
तिन अल्टिमेटम दिला..

१५ ऑगस्ट चा दिवस होता आज खिशात पैसे होते.
दिवस तिच्या बरोबर मजेत घालवायचा होता.
त्यान तिला फोन केला.बर झाल, फोन केलास,
मला पण तुझ्याशी बोलायच आहे.ति म्हणाली.
नो प्रोब्लेम.. ताज मधे भेटु. काय?.. ति उडालीच.

ताज च्या थंडगार वातावरणात, ति सुखावलि होति.
मग काय ठरल?.तिन विषयाला हात घातला.
तो बोलतच नव्हता. मी थांबु शकत नाहि.
हि आपली शेवटची भेट.. तिच्या बोलण्याला धार होति..

तो आतुन तुटत चालला होता..प्लिज..
अरे प्लिज काय? सारच कठीण आहे.ति म्हणाली.
मी निघते? ..प्लीज थांब, मला एक संधी दे..तो म्हणाला.
तु फक्त एक वर्ष दे मला, तुल पाहिजे तेवढा पैसा देतो...तो म्हणाला.

ति खळखळुन हसली." वेडा रे"अरे पैसा म्हणजे?...
आय नो. त्यान वाक्य तोडल."किति पैसे लागतात संसाराला?
लाखो रुपये ति म्हणाली..ठीक आहे. एक डिल.तो म्हणाला.
आपण पुढच्या १५ ऑगस्ट ला आपण इथच, ताज मधे,संध्याकाळी. ७ ला भेटु.
अन काय करु..तिन विचारल..
मी त्या दिवशी तुझ्या पायावर ७५ लाख रुपये ओतिल...तुला संसारा साठी.

त्या चित्रपटांत हिरो हिरॉइन ला नोटांनी अंघोळ घालतो तशी.अंघोळ घालीन...
तो हसत म्हणाला."मॅड आहेस." पण म्हणुनच तु मला आवडतो.ति..
पण वचन दे, वाट पहाशील म्हणुन.. तो म्हणाला.

ठिक आहे, पण ७५ रुपये तरी आणशील अस वाटत नाहि. ति हासली.

१५ ऑगस्ट.. तो तिचि ६ वाज ल्या पासुनच वाट पहात होता.
तेच टेबल होत, मागच्या वर्षीच, ति ये‌इल? तो अस्वस्थ होता
७ वाजायला आले होते, अन तेवढ्यात ति आत येताना दिसली.
तिच्याशी नजरानजर होतच त्यान हात हलवला.
हाश हूश करत ति समोरच्या खुर्चीवर बसली.

कशी आहेस? फार गरम होत आहे. पहिल पाणी पिते.
म्हणत उठुन ति त्याच्या समोरच्या ग्लास घ्यायल वाकली.
ति वाकली असताना, त्याला ब्ला‌उज मधे लपवलेल्या मंगळसुत्रचा पदर दिसला.
अग मी मागवतो म्हणेपर्यंत तिन ग्लास तोंन्डाला लावला होता.

अरे फार पाणी पाणी झाल होत.. हं आता बोल.
काय बोलु? तुच सांग. तिच्याकड बघत तो म्हणाला.
मग काय? कुठे आहे ७५ लाख? ति हसत म्हणाली..
त्याचा चेहेरा पड्ला होता., नाहि जमल, तु म्हणालीच तेच खर.
७५ लाख काय ७५ रु जमले नाहि. पैसा मिळवण कठिण आहे..

जा‌उ देत, मला माहित होत, ति समजावणीच्या स्वरांत म्हणाली.
मल पण तसच वाटत होते. पण म्ह्टल तुला शब्द दिला होता...
तो बघत होता..अजुन काय? पडलेल्या चेहे~यानि तो म्हणाला.
सांगु ति म्हणालि.. अरे माझ लग्न झाल, घरचे मागे लगलेच होते.
तो बॅन्केत आहे, १ बेडरुम च घर आहे... तुझ अस.. ति म्हणाली. सॉरी..

तुझ खर आहे., तु ठीकच केल, माझ्याबरोबर.... वायाच गेल असत.
तो म्हणाला.. ठीक आहे. मी निघते, तुला आता अस भेटण बर नाहि...ति.
बरोबर आहे. निघते.. ति म्हणाली.. तो तिच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता..

तो बराच वेळ तो बसुन होता. सार संपल होत.
रुम च्या नोकरानि टॅक्सीत सामान भरल..
सर कुठे? टॅक्सी ड्रायव्हर ने विचारले.
सहारा एयर पोर्ट. ईंटर नॅशनल टर्मीनल.


टॅक्सी वेगात चालली होति,
गार हवेच्या सपक्यान डोक शांत होत होत.
विमान तळावर टॅक्सी थांबली,
त्यान ट्रॉलीत लगेज भरल.व भाड देवुन तो निघाला,

सर,टॅक्सी ड्रायव्हर ने हाक मारली,
सर, तुमची बॅग राहिली आहे,
त्यान टॅक्सी ड्रायव्हर कड बघितल, अन म्हणाला
बॅग तुला राहु देत, त्यात ७५ लाख रुपये आहेत.
नाहितरी, मला आता त्याचा काहिच उपयोग नाहि,

ड्रायव्हर बराच वेळ त्याच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता

स्ट्राबेरी

स्ट्राबेरी
महाबळेश्वरला रसाळ स्ट्राबेरी चोखताना,
एकदम तुझी आठवण झाली,
अन स्ट्राबेरी ची चवच निघुन गेली

मराठ मोळी आई

मराठ मोळी आई
आपली मराठ मोळी आई म्हणजे एक मजेदार, प्रेमळ, अस रसायन आहे
*आई तुम्हाला दोन वेळां सल्ला देते. एक तुम्हाला हवा असतो त्या वेळी,व तुम्हाला नको असतो त्या वेळी सुध्धा·
*आई हि अशी एकच व्यक्ति आहे, जिला तुमच्या बद्दल, तुम्हाला तुमच्या बद्दल माहित आहे त्या पेक्षा ज्यास्त माहित असत.
*एखाद्या वेळी एखादी गोष्ट जर तुम्हाला नसेल,व आइला तुम्हि ती तिला विचारली अन जरी तिला ति माहीति नसली तरी ति, गोष्ट माहीति असल्यासारखी ठोकुन देते.
*आई जीतकी चांगली तितके मुंले वाया जाण्याच्या संभावना जादा
*अरे पावसांची चिन्हें आहेत रेनकोट घेउन जा अस ती म्हणते, तुम्हि नेहमी पणे,दुर्लक्ष करता, अन मधे कुठेंतरी नेमका तुम्हाला पाउस गाठ्तो.
* तुम्ही एखादी गोष्ट विसरला, तर ति तुमच्या साऱ्या चुकांची तुम्हाला आठ्वण करून देइल ज्यामुळें तुम्ही ति चुक परत करणार नाहीत.
*तुमच्या साऱ्या गोष्टीवर टीका करण्याचा तिला ह्क्क आहे,जरी त्यातली एखादी गोष्ट तुम्ही केली नसली तरी सुध्धा.
*आई च्या जेवणाला नावे ठेवण्याची चुक करु नका[मेल्या बाहेरच शिळ पाक घाण तेलातल मीटक्या मारत खाशील.]
* आई शी कधीच खोट बोलु नका अन जरी प्रयत्न केला तरी निश्चीत पकडलें जाताल·
*जस जस तुमच वय वाढत जात तस तस एखाद्या लहान मुलासारख तुम्हि तिच्याशी वागायला लागता·
*पैशांची कडकी असते, तिला पैसें मागा ति पैसे देइल अन,तुम्ही पैसे कसे उधळता या वर लेक्चरपण देइल·
*तुम्ही कीतिहि चुका करा, ति हजार वेळा तुम्हाला त्याची आठवण करुन देइल, पण मनांत कधीच ठेवणार नाही·
*तुम्ही एखादी गोष्ट केल्यानंतर[आधी नाही], ती आणखी कशी चांगली करता आली असती हे फक्त तिच सांगु शकते.
*तुमची आई कीतिही गरीब कींवा अशीक्षीत असो ति तुमच्या पेक्षा नेहमीच मोठी आसते.
*एखादी गोष्ट तुम्ही केली तर ति आणखी कशी चांगली करता येइल ते ती तुम्हाला सांगेल ,पण जर तीनें केली अन जर तुम्ही सांगायला गेला तर ती म्हणेंल, मग तुच का नाही करत.
*तुम्ही कितिही चांगला विनोद केला तरी तिला तो विनोद नेहमीच वाह्यात वाटतो.
*आइ काम संपवुन जरा बसली कि मुलाला भुक लागते.
*तुम्हि मोठ होउन नांव काढाव इतकच तिला वाटत असत.

नांव

नांव
तु मला प्रथमच नांवानी हाक मारली
अन माझ सार विश्वच बदलुन गेल.
त्या रात्री सारा मदहोशीचा आलम होता.
सकाळी उठल्यावर सार अपुर्ण वाटत होत.
अन जाणिव झाली ,तुझ्या नांवाआधी
नांव लावल्या शिवाय ते पुर्णत्व येणार नाहि..

आमंत्रण

तिन त्याला आमंत्रण दिल..
ये अन माझ्या अथांग जलाशयात मनसोक्त काम क्रीडा कर.
तो नुसता हसला, अन त्यान तिच नग्न शरीर कवेत घेतल..
विश्वाला व्यापेल एवढ्या लांब जिभेने त्यान, तिच्या तापलेल्या शरीरावर
चांदण्याचा शितल लेप दिला..
तिच्या स्तनांवरुन त्याचा हात फिरत होता..
स्तनाग्र त्याचा मुखात देताना, तिन त्याच्या कडे पाहिल..
अन ति चकित झाली..
त्याच्या आ केलेल्या मुखांत कोट्यावधी ब्रम्हांड खेळत होति..
त्यान मुखात तिच स्तन घेतल. अन तिच्या स्तनांतुन जिवन सरीता पाझरु लागली..
सा~या ब्रम्हांडात चैतन्य पसरले..तिच अस्तित्व त्याच्यात विलिन झाल..
शिव अन शक्तिचा खेळ सुरु होता..
तिच्या उदरांत एक ब्रम्हांड हुंकार देत होत.....
अवि.

कृष्ण गोजिरा लडीवाळा,

कृष्ण गोजिरा लडीवाळा,
पाय़ांत चांदिचा वाळा.
खोड्या करण्यात रममाण,
यशोदेचा, जिव की, प्राण.//१//

श्यामल,सुंदर, रुप मनोहर,
मोर, मुकुट,पितांबर सुंदर,
गुण करी, अन दुडुदुडु धावे,
लिला बघता, चित्त हारवे.

यशोदेच्या आंगणी, नाचे मधुसुदन,
वाळा वाजे रुणुझुणु रुणुझुण
नाचे जग वंदन,नाचे आनंद घन,
नाचे कमलनयन, नाचे गोपी जिवन.

नाचे निल घन तन, नचें यदु नंदन.
नाचे सखे सवंगडी,नाचे सारे वृंदावन.
धन्य यशोदा, धन्य सारे वृंदावन.
गोजि~या, लडिवाळाच्या लिला पाहुन

पाऊस

पाउस
भेटण्यास आलि तु अन
पाउस सुरु झाला होता,

थांबण्यास मज जवळ
किति सुंदर बहाणा होता.

बाहेर पाउस, गारठा हवेत.
आग देहात, कंपने ह्रुदयात.

कमनिय बांधा तुझा,
धिर धरु किति,

हा वेडा एकांत
मनांस आवरु किति.

घडावयाचे विपरीत,
नेमके तेच घडले.

घेतले मिठित तुजला
भान आपले हरपले.

चुंबिता मधाळ ओठांना
गालावर पसरली लालि,

फिरता हात वक्षावर
सारी तनु थरथरली.

भान नसे वसनांचे,
देह नग्न मिठित असे,

सोड ति सारी लाज,
साथ प्रेम चेष्टेस दे सखे.

रमलो देहात आपण
काळांचे भान राहिले नाहि,

पाऊस केंव्हाच थांबला होता,
तिकडे लक्ष गेलेच नाहि.