Sunday, November 23, 2008

मधहोश हि हवा

मधहोश हि हवा

मधहोश हि हवा,धुन्द करते जिवा
चोरटा स्पर्श तुझा ,वाटतो हवा हवा

घेतले रे मिठित, चमकुन गेलि दामीनि
रान वारा उफाळला, या बिलोरी यौवनि

प्रणयाचे शत रंग ,पसरले सारे अंबरी
उमलली सुगंधीत हि, कोवळी कळी बावरी

अंग अंग गात्रांग,प्रीत रंगी नहाले
नेत्री आनंद आसवे,देहि चांदणे झळाळे

स्पर्श हावरे,कुजबुजशी कानी ,अनंग कथा
दाटते तारुण्य, ठेविशी जसा, वक्षावर माथा

ऎकता अनंग कथा,सहन होईना मदन चाळे
त्या काम दाहात, शरीर नाजुक होरपाळले

तु रमता धुंद यौवनि ,मी तुझीच रे झालें
नाहि नाहि म्हणता तुला, सर्वस्व अर्पिलें
अविनाश........

Wednesday, November 5, 2008

तरी मैत्रीण का आवडे मला ती?

चेह~यावर रेशमी बटा रुळती
का इतकी सुंदर दिसते ती?

धवल गुलाबी साडि नेसति ति
जणु गुलाबास पाकळ्यात लपेटति ती

बोलायचा प्रयत्न जरी केला मी
तरी सारखि बिझि का असते ती?

कधि ड्रेस,कधि जिनटॉप वापरे ती
पण साडित अति सुंदर दिसते ती

किति गोड कविता लिहिते ती,
त्यात दुखा:चे रंग का भरते ती?

भेटलो नाही कधी तिला मी
तरी ओळखिची का वाटते ती ?

नाहि जरी दोन शब्द बोललो मी
अनामीक ओढ का लावते ती?

खुप गुढ वागणे आहे तिचे जरी...
तरी मैत्रीण का आवडे मला ती?

Saturday, October 25, 2008

पत्त्यांचा डाव

त्या वेळी आम्हि शाळेत होतो.
सुटित पत्त्यांचा डाव पडला कि
तिचि माझि कायम जोडि असायची
लॅडिस खेळायचो...
आमचि जोडि कायम जिंकायचि,
आमच्या गुप्त खुणा असायच्या,
केसावरुन नकळत हात फिरला कि...किलवर
डोळ्यांच्या हळुवार हलचाली....इस्पिक
ओठांच्या हळुवार हलचालि.......चौकट
जिभ हळुच बाहेर काढणे............बदाम
आम्हाला बरोबर पाने कळायची एकमेकांची
कॉलेज ला गेल्यावर हि ति तशाच खुणा करायची..
मला वाटायचे हिला पत्ते खेळायचे आहेत..
म्हणायचो लहान नाहि आपण तसे खेळ खेळायला..
वेडि मुलगी नाराज व्हायची
नंतर कळाले तिचे लग्न ठरले...
अन सा~या खुणांचा अर्थ लागला
पण अरेरे.. अर्थ कळाला तेंव्हा वेळ निघुन गेली होति...
अन हातात हुकमाचि पाने असुन हि डाव गमावुन बसलो होतो
@ Avinash

तु म्हणजे अस्सा आहेस ना

तु म्हणजे अस्सा आहेस ना

चल तुझ आपल काहितरीच
मारुन चापटि हळुवार खांद्यावर
जरी म्हणालिस तु कृतक कोपानी
सांगुन गेलीस बरेच काहि तु प्रणयीनि

मुडपुन अधरास, तुझे मान वेळावणे
ते गालातल्या गालातले, सुचक हसणे
बघण्या~यास वेडे करुन सोडणे.
नाहि नविन मला तुझे हे बहाणे

लांब रेशमी ते कुंतल काळे
रक्तवर्णी अधरांचे विभ्रमी चाळे
तनु गंध अवति भोवति दरवळे
गात्रात साजणे मदन सळसळे

स्वार होऊनि रेशमी कुंतलावर
गंध दरवळे अवति भवति
ति भिरभिरी नजर,लाजरी बावरी
समजले ईशारे तुझे, मदन मंजीरी

घालतेस मिठी मागुन तु हळुच
पाठिस जाणवे स्पर्ष उरोजांचा
घेता मिठीत,भिडे दिठीस दिठी
वर्षाव होतसे साजणे चुंबनाचा

तु म्हणजे अस्सा आहेस ना
सोडवित मिठी वर मलाच म्हणणे,
लाजणे, हसणे, वर वेडावुन दाखवणे,
स्वर्ग सुख काय निराळे असते साजणे???

अपुर्ण

अपुर्ण

का कोरतेस, काजळ तु कुरंग नयनात,
नसेल बघणार मी, तर श्रुंगार व्यर्थ आहे

का लिहितिस त्या भावपुर्ण कविता
नसेल गाणार मी, तर ते शुष्क शब्द आहेत

जरी माळला ,सुगंधित मोगरा तु कुंतलात
स्पर्षाविना माझ्या, तो साजणे, गंधहिन आहे

लावलेस जरी अस्मानि सुर तु गळ्यातुनि
माझ्या साथि विना ति मैफित अधुरी आहे

जरी जगात प्रेम आहे, हे पुर्ण सत्य आहे
तरी माज्या विणा साजणे, मात्र सारे मिथ्य आहे

का रेखाटतेस हट्टाने ,सुख चित्र भविष्याचे
भरु देत रंग मजला, अन्यथा ते बेरंगी आहे

समजुन घे, तु माझी,मी तुझा हे प्राक्तन आहे
एकमेका विना आपल्या दोघांचे जिवन अपुर्ण आहे

अविनाश. बेभान स्वछ्छंदि मुक्त जिवन

Friday, October 17, 2008

स्वर्ग सुख

स्वर्ग सुख

चल तुझ आपल काहितरीच
मारुन चापटि हळुवार खांद्यावर
जरी म्हणालिस तु कृतक कोपानी
सांगुन गेलीस बरेच काहि तु प्रणयीनि

मुडपुन अधरास, तुझे मान वेळावणे
ते गालातल्या गालातले, सुचक हसणे
बघण्या~यास वेडे करुन सोडणे.
नाहि नविन मला तुझे हे बहाणे

लांब रेशमी ते कुंतल काळे
रक्तवर्णी अधरांचे विभ्रमी चाळे
तनु गंध अवति भोवति दरवळे
गात्रात साजणे मदन सळसळे

स्वार होऊनि रेशमी कुंतलावर
गंध दरवळे अवति भवति
ति भिरभिरी नजर,लाजरी बावरी
समजले ईशारे तुझे, मदन मंजीरी

घालतेस मिठी मागुन तु हळुच
पाठिस जाणवे स्पर्ष उरोजांचा
घेता मिठीत,भिडे दिठीस दिठी
वर्षाव होतसे साजणे चुंबनाचा

तु म्हणजे अस्सा आहेस ना
सोडवित मिठी वर मलाच म्हणणे,
लाजणे, हसणे, वर वेडावुन दाखवणे,
स्वर्ग सुख काय निराळे असते साजणे???

@Avinash..........................

Tuesday, September 30, 2008

शाम निल घन

शाम निल घन, तनात असा बरसुन गेला
कोवळे हे तन, चिंब चिंब करुन गेला

डवरला प्राजक्त, असा सडा घालुन गेला
प्राजक्ताचे लाख बहर, या तनुत ऊधळुन गेला

गौर देहावर ,चुंबन फुले तो रेखाटुन गेला
रक्त वर्णी अधरावर,प्रेमगीत लिहुन गेला

भिडता नजरेस नजर,जरी लाजभरे वाकली
गात्र गाभा~यात, गोजीरी स्वप्ने फुलवुन गेला

आलिंगलेस,कायेस माझ्या काया भिडली
स्पर्श अधिर, गौर तनुत विरघळवुन गेला

रिक्त जरी झालस तु, पण तृप्त होऊन गेला,
प्रेमप्रपातात माझे कुंवारे पण उधळुन गेला

@..अविनाश. बेभान स्वछ्छंदि मुक्त जिवन

Monday, September 8, 2008

थांब ना

थांब ना, नको करु घाइ जाण्याची..
बघ ,नभात शशी अजुन मावळला नाही 

रातराणीने नुकतिच फुलायला सुरवात केली बघ
थांब ना ,गंध वातावरणात अजुन मातला नाहि

डवरला आहे तो प्राजक्त ,त्याला दवाने न्हाउ तर दे
थांब ना, थोडा वेळ, प्राजक्तांचा सडा तर पडु दे

नको सैल करु, तु साजणे मिठि रेशमाची
थांब ना, उरोजाची म्रुदुता तर अनुभवु दे

अत्ताच चेतली बघ प्रिये ति कामधुंद काया
ते काम लाघवि ओले स्पर्श तर अनुभवु दे

थांब ना, नको संपवु हा धुंद काम सोहळा,
विझु दे धग,गात्रांना,क्लांत तर होऊ दे

@ Avinash
first  |  <>  |  next >  |  last

Monday, July 28, 2008

घनदाट गर्द रेशमी केशसंभार..

घनदाट गर्द रेशमी केशसंभार..
काजळ नक्षी त्या टपो~या नेत्रास,
तनुत रातराणीची अशी मादक दरवळ
मदमस्त,असे यौवन रंगाचि उधळण

नजर, कधि लाजरी, कधि नाचरी
रतिरुप,नखशीकांत तु लावण्य मुर्त
वाकलेली लज्जेने तु अबोध रमणी
रुप चमके,जशी नभी शुक्रचांदणी

वसने ,गर्भ रेशमी अंगी ल्याली
तव उरास काचे ,भर्जरी काचोळी
देहात रानवारा,उसळे उधाण लाटा
गालास खळी,अशी तु लावण्यकळी

अबोल पौर्णीमा, अन धुंद चांदणी
जवळ श्रुंगार वेडी,बेधुंद रागीणी
मुग्ध कुजबुज अन चोरटी अलिंगने,
नाचति वक्षावर, चकोर मंडले बेभान

रोम रोम नशेने फुलले,श्वासात श्वास भिनले..
एक मेकाच्या सहवासात राणी,बहरुन यौवन आले

Tuesday, June 3, 2008

रात्र तु जागुन जा.

रात्र पौर्णीमेचि,राजसा रात्र तु जागुन जा.
सडा चांदण्याचा ,अंगावरी तु घेवुन जा...

हि नाजुक तनुवेल,बघ राजसा बहरली..
त्या कोवळ्या पानांवर, प्रेमगीत कोरुन जा... 

लावलिस नजरेने तु, आग ज्या गात्रांना..
त्याना एकदा तरी, तु स्पर्शुन जा...

मुडपला रसाळ ऒठ, दाबला तो दातांखाली
समज इषारा, सुखमय डंख तु मारुन जा...

चैन नाहि जिवाला, मदन दाह मज सोसवेना..
वक्षावर माथा, एकदा तरी ठेवुन जा....

कशी आवरु स्वत:ला?, हि, ति वेळ नाहि..
ये धस मुसळ्या, गात्रांस तु चुरगाळुन जा...

मुश्किलीने लागला डोळा, हा पहाटे पाहटे
गोजिरी स्वप्ने घेवुन, झोप तु चाळवुन जा

अविनाश.....एक बेधुंद..मुक्त जिवन 

Friday, May 23, 2008

तु


तु मज स्विकार,या धिक्कार
मी तुला मनोमन वरले आहे
दे होकार या दे नकार
ह्रुदयात तुला मी पुजले आहे.

स्वप्नांत येतोस तु,सत्यात आहेस तु
प्रेमात तुच तु, रागात फक्त तु

कथेचा नायक तु, कवितेत राजसा तु
श्वासांत भिनला तु,गात्रात लपलास तु

अधरातिल मकरंद तु,गात्रातला वणवा तु
काजळाची रेघ तु, लाजरे प्रेमगीत तु

माझ्या रोम रोमात बसलास तु
नाहि जगु शकणार ज्या शिवाय
असा माझा प्रियकर आहेस तु

तुझ्याशिवाय दुसरे काहि सुचत नाहि
तुजविण मजला चैन नाहि.
तु माझा मी तुझी,हेच फक्त सत्य आहे
आपण एकमेकाचें हे आपले प्राक्तन आहे

Avinash.............

Tuesday, May 20, 2008

ति विलासिनि मदालसा,

ति विलासिनि मदालसा,मिठीत कैद होति 
अनंग कथा ऎकण्यात, ति जरा गुंग झाली असावी  

चुंबिता अधर लाल,लागता हात उरोजास 
कोवळी लावण्य कळी ,ति जरा लाजली असावी  

घुसता आरपार तो मदन शर ह्रुदयात 
रतिसम सुंदरी ,ति जरा घायाळ झाली असावी  

कुरवाळीता ,त्या मोकळ्या रेशीम कुंतलास 
त्या काम गंधाने, ति जरा बेभान झाली असावी  

मधाळ हसुन,टाकता कटाक्ष त्या दर्पणात 
तो भंगला पाहुन,ति जरा चकित झाली असावी  

स्पर्शिता ,प्रथमच तिची कुंवारी कामस्थळें 
उत्तेजित होऊन, ति तोल हरवुन बसली असावी  

अर्पीता कोवळी कोरी तनु, ह्या पौरुषाला  
ति कोमलांगी ,पौरुषा पुढे हरली असावी 
avinash

Monday, May 12, 2008

Father Complex


५०शी ला आलो होतो,...छंद म्हणुन C++ चा क्लास लावला
ति पण यायची क्लासला....असेल १९ ची.....
काळीसावळि..पण उफाड्याची...माझ्या बाजुलाच तिचा कॉम्प होता..
बघितले कि हसायची...क्लास सुटला कि माझी वाट खाली थांबायची.
सारखी माज्या कडे बघत रहायची.....
मला जरा सार संकोचल्यागत होत होते...काहि ठीक नव्हत..
कारखान्याच्या कामासाठी मी ३-४ दिवस बाहेरगावि होतो..
३-४ दिवसानि क्लास ला गेलो तर ति खालीच वाट बघत होति..
डोळे रडुन सुजलेले...’सर तुम्हि कुठे होता? 
मला किति काळजी वाटत होति तुम्हि आला नाहि म्हणुन"
माझा हात धरत ति म्हणाली...सारच अवघड होत चालल होत
मी बोललो नाहि...ठरवल द्यायची तिला समज..
एकदा क्लास संपल्यावर तिला बोललो..फाडफाड..रडायला लागली..
दुसऱ्या दिवशी पहिल..ति क्लासला आली नव्हति..
४-५ दिवस ति आली नहि मी पण अस्वस्थ झालो
पत्ता घेवुन घरी गेलो..घरी आईच होति..ओळख करुन दिलि....
बोलताना समजल.त्यांचा डायव्हर्स झाला होता..
ति तापान आजारी होति...आत पलंगावर झोपली होति..मलुल, ग्लानीत,
कपाळावर हात ठेवला..ताप जाणवत होता..
हाताचा स्पर्श होताच ति मंद पणे बडबडली" पपा, पपा....आलात
मी सुन्न झालो..बाहेर येवुन बराच वेळ विचार करत होतो........
______________

Avinash...............

प्रथम तुझ पहाता


प्रथम तुझ पहाता जिव वेडावला,
तुज चुंबण्यासाठी जिव आसुसला.
नाजुक नासिका, मधाळ डोळे,
बघता तुला शहाणे होतात खुळे.

श्याम नभ जसे झाकोळे चंद्रमा
कृष्ण कूंतल व्यापे तव मुख चंद्र्मा
नभातुन जसा चंद्र प्रकाश झळाळे
कुंतलातुन तव सौंदर्य प्रभा झळाळे

हे नयन चेटकी,वर काजळ नक्षी
साधा ग नयन बाण
पुरे मजला घायाळ करण्यास 
त्यावर कशाला काजळाचें हलाहल
मग सज्ज आहे आता मरण्यास.

हसताना पडते गालावर खळी
बघता तुझकडे होति बुध्धि खुळी
गो~या तनुवर उरोज कुंभाचा भार,
तिथेच फसलो, जिव झाला ठार,

मखमली गालावरचा तिळ बघता
भान ते कसे हरपुन गेले 
जे शब्द ते ओठांत आलें
ते बोलायचे सारे राहुन गेले.

केस रेशमी,बटा रुळती भाळावर,
गुंतले ह्रुदय,त्या काळ्या नागीणित
अनंग कथा होत्या मनात अगणीत
ते सारे सांगायाचे राहुन गेले 
----------------------------------
avinash

श्रावण सर


श्रावण सर जेंव्हा कोसळत असेल
आठ्वण माझी ति काढत बसली असेल
रात्र भर नक्किच निट झोपली नसेल
आठवणीने ति बिछान्यावर तळमळत असेल

माझ्या आठवणीने ति मनोमन् मोहरली असेल्
केवड्याची नाजुक् तनु रोमंचीत् झाली असेल्
तो निर्दयी श्रावण् वारा आग् भडकावत् असेल्
ह्रुदयाची धडधड तिची वाढली असेल

प्रणय् रात्रीचे मदन् चाळे आठवित् असेल्
प्रेमपत्रे वाचताना अश्रुंची धार लागली असेल
मी ठीक तर आहे ना असे काळजीने
श्रावण मेघास ति विचारत असेल

माझ्या फोटोकडे ति बघत बसली असेल
ह्र्‌दया जवळ घेवुन चुंबन वर्षाव करीत असेल
कदाचीत मी ये‌ईल या वेड्या आशेने
साज श्रुंगार करीत बसली असेल

कसे सांगु सखे, मी निराळ्या दुनियेत आहे
सिमेवर लढता लढ्ता शहिद झालो आहे
नको पाहुस वाट,भेटणे कसे शक्य आहे?
या ताटातुटीने, माझाहि आत्मा तडफडत आहे....

अविनाश........

Thursday, May 1, 2008

प्राक्तन

प्राक्तन
लहान कोकरु ,काळ भोर, गोंडस,
आई भोवति दुडु दुडु खेळत होत,
मधुनच तिच्या आचळाला 
ढुश्या देत दुध पीत होत
हळु हळु होइल ते मोठ..
अन मग कापल जाईल कत्तल खान्यात..
तुमच्या आमच्या जिभेचे चोचले पुरवण्या साठी...

अविनाश

Indecent Proposal

Indecent Proposal

मी कंपनित सिनियर Executive होतो,
माझ्या शब्दाला वजन आणि मान होता
ते माझ्या एका दुरच्या मित्राचा
रेफ़रंस घेवुन आले होते....
ताज मधे तो मी अन त्याची बायको बसलो होतो..
त्यान सेल्स मॅनेजर साठी कंपनित इंटरव्हु दिला होता..
मी बघितले तो साधारण ३५ व ति ३२ शी चि असेल..
सर माय वाइफ़. .द्रौपदि.....त्यान ओळख करुन दिलि.
ति गोड हसली..मुलगी गोड होति...
" सर खन्ना सरांनि Interview घेतला...P.A ६.०० लाख्हाच पे पॅकेट आहे"
तो सांगत होता........खन्ना म्हणजे कंपनिचा Executive Director.
"काय म्हणाला खन्ना???" मी विचारल
" मी बहुतेक सिलेक्ट झालो आहे..सर म्हणाले अजुन एक मीटिंग घेउ,
ते एक प्रपो्जल डिस्कस करणार अन मग फाईनल....सर आपण लक्ष ठेवा
म्हणुन सांगायला आलो आहोत"
मी चरकलोच..त्यांना माहित नव्हते..खन्ना म्हणजे एक नं दारुड्या अन xxxxबाज
ह्याची सारी प्रपो्जल्स म्हणजे ........Indecent Proposals
मला त्याला सांगावस वाटल.नको पडु ह्या भानगडीत..
खुप किंमत मोजावि लागेल....विचार करत होतो तेव्हड्यात
तो मला म्हणाला..."कोठल्याहि किमतिवर मी हा जॉब मीळवणारच...
माझ सार करीअर बनुन जाईल.."त्याच्या डोळ्यातली ति महत्वा कांक्षा व करारी पणा पाहुन मी घाबरलो...त्याल माहित नव्हते
नोकरीच्या जुगारीचा डाव जिंकण्यासाठी त्याला द्रौपदी डावावर लावावि लागणार होति...डाव जिंकेल कि नाहि माहित नव्हते..पण द्रौपदी गमावुन बसणार होता...

Avinash

काहि मदत् करु का?

रेशमी ते कृष्ण कुंतल,
कुंकवान भरलीस मांग
आणी हा खट्याळ वारा,
विस्कटतो, तुझा भांग,

द्वाड हा चावट वारा,
झोंबतो ग पदराला
उडवि तुझा पदर्
पाडी उघडे यौवनाला

सहाजिक् आहे सखे
झालिस् तु कावरीबावरी
प्रश्ण असेल पड्ला
सावरु ह्या कुंतलांना
कि झाकु यौवनाला ?

मी आहे तुजजवळ्
काहि मदत् करु का?
सावर् तु रेशमी बटा
मी ऊरोजांना झाकु का?
---------------------

Avinash

Wednesday, April 16, 2008

देवा असा माझा पति असावा

देवा असा माझा पति असावा
मी त्याचि राणी असावि 
अन तो माझा राजा असावा

उंचापुरा अन देखणा असावा
दाट केसांचा भांग असावा
जिन वर चेक्सचा शर्ट असावा
हसताना थोडा मिस्कील दिसावा
पहिल्या भेटितच पसंत पडावा
देवा असा माझा पति असावा

शीकलेला अन लठ्ठ पगार असावा
सारा पगार माझ्या ताब्यात द्यावा
राजा राणीचा संसार असावा
भरपुर शॉपिंगची आवड असावी
साडीच घाल असा आग्रह नसावा
देवा असा माझा पति असावा

माझ्या रुपाच कौतुक असाव
दिसले नाहि तर कावरे बावरे व्हाव
हिंडण्या फिरण्या ची आवड असावी
सिनेमा,हॉटेलिंग कायम कराव
हसण्या खिदळण्यात जन्म जावा
देवा असा माझा पति असावा

साधा ,सरळ अन प्रेमळ असावा
हट्ट पुरवणारा, समजुत दार असावा
मी रागीट आहे, तो शांत असावा
माझ्याच सल्ल्यान चालणारा असावा
सा~या चुकांची जबाबदारी घेणारा असावा
देवा असा माझा पति असावा

सभ्य, संयमीत असला तरी रोमॅंटिक असावा
सा~या  रात्री त्याने बेभान रंगवाव्या
मी रतिरुप अन तो मदन असावा 
दोघात प्रेम, अद्वैत भाव नांदावा.. 
देवा असा माझा पति असावा
मी त्याचि राणी असावि 
अन तो माझा राजा असावा

अविनाश.........







Monday, March 31, 2008

चांदण्याच्या देशात तुझी वस्ति होति

चांदण्याच्या देशात तुझी वस्ति होति
कसे शोधु?अवसेची रात संपत नव्हती.....

का त्या फुलाची छबी सारखी आठवत होति?
विसरावे म्हणुन, बाग उखड्ण्याची तयारी होति...

माझ्या ति किति जवळ बसली होति..
हाकेच्या अंतरावर होति..तरी का लांब वाटत होति?

मौसम शराबी, अन हवा गुलाबी होती..
कुणास खबर, दिवस होता की रात्र होति....

ति भेटली की, वेळ भांडणात जायची..
नसताना का तिची आठवण छळत होति??...

गंध, सुगंधा सारखी हवेत पसरली होति
जाणवत होति,पण स्पर्शीता का येत नव्हति?

सा~या आठवणी पुसल्या,विसरलो होतो तुला
प्रेम केल्याची, ति जिवघेणी शिक्षा घेतली होति..
Avinash

Monday, March 24, 2008

कंडोम

भांडवल शाही ख~या अर्थाने रुजवलीत तुम्हि, मालक
आता या देशावर तुमचेच राज्य चालु झाले आहे मालक

भाकरीसाठी लढायचा अधिकार काढुन घेतलात मालक
नोटा चारुन संप फोडण्यात तरबेज झालात ,तुम्ही मालक

मजुराचे रक्त खुप स्वस्त दरात मिळते या देशात मालक
५-५०रु थोबाडावर फेकुन ८तास शॊषायला चटावलात ,तुम्हि मालक

देशातल्या राज्यकर्त्यांचे खरे रंग उमगलेत, आम्हा मालक
निळे, तिरंगी, भगवे, सा~यांचा एकच रंग उमगले ,आम्हा मालक

भांडवल शाहित जाति व्यवस्था चांगलिच राबवलित मालक
कंत्राटि कामगार नांवाची नविन जात निर्माण केलित मालक

कंत्राटि कामगार, पण कच्चि बच्चि आहेत, आम्हाला मालक
वापरा,काम झाले फेकुन द्या"अस करायला कंडोम नाहि
कामगार आहोत ,आम्हि मालक
_____________________________________

अविनाश बेधुंद.स्वच्छंदी..मुक्त जीवन

Friday, March 21, 2008

तो रात्र जागवण्याचा इशारा होता

ति मधुर, शरद पौर्णीमेची रात्र होति
प्रणयिनि,तुझ्याच रुपाचि मनांशी चर्चा होति...

कविता कोणावर करु,गहन प्रश्ण पडला होता
एक चंद्र्मा नभात, तर एक बाहुपाशात होता..

यमक, उपमा,उत्प्रेक्षा, का शब्दलावण्य पाजळु?
ति छंदबध्ध,तरी मुक्त छंदात लिहिण्याचा विचार होता

काजळ पसरले होते,ओष्ट रंगाने शर्ट रंगला होता,
तरी,तुझा नटण्या मुरडण्याचा सोस मला आवडत होता

तुझे ते काम लाघवि स्पर्श शरीरात भिनले होते,
स्पर्शताना तुझ्या तनुचा इंच हि भाग सुटला नव्हता

गर्भ रेशमी मिठि, साजणे घट्ट केली होतिस,
कळतय मला, तो रात्र जागवण्याचा इशारा होता
_____________________________________________

अविनाश बेधुंद.स्वच्छंदी..मुक्त जीवन

तो मोहक कटाक्ष काय टाकलास तु,

तो मोहक कटाक्ष काय टाकलास तु,
मोहरलो, कविता करु लागलो होतो......

तु हसुन काय बोललीस मजसमवेत
त्यालाच, प्रेम समजु लागलो होतो.........

तव तनुत वसंत असा फुलला होता
कोकिळ कुंजन, मी करु लागलो होतो.......

प्राजक्ताचा डवरलेला तु वृक्ष तु
वेचण्यास, मी सज्ज झालो होतो.........

मुर्तिमंत लावण्यमुर्ति,तु,अप्राप्य चंद्रमा
तुझाच ध्यास घेउन बसलो होतो.............

तु नाहि मीळणार, हे माहित आहे मला
तरी, आयुष्य पणाला लावुन बसलो होतो.....
______________________________

अविनाश बेधुंद.स्वच्छंदी..मुक्त जीवन

Wednesday, March 12, 2008

नाहि नाहि म्हणता तुला, सर्वस्व अर्पिलें


मधहोश हि हवा,धुन्द करते जिवा
चोरटा स्पर्श तुझा ,वाटतो हवा हवा

घेतले रे मिठित, चमकुन गेलि दामीनि
रान वारा उफाळला, या बिलोरी यौवनि

प्रणयाचे शत रंग पसरले अंबरी
उमलली सुगंधीत हि, कळी बावरी

अंग अंग गात्रांग,प्रीत रंगी नहाले
नेत्री आनंद आसवे,देहि चांदणे झळाळे

स्पर्श हावरे,कुजबुजशी कानी अनंग कथा
दाटते तारुण्य, ठेविशी जसा वक्षावर माथा

ऎकता अनंग कथा,सहन होईना मदन चाळे
त्या काम दाहात, शरीर सारे होरपाळले

तु रमता धुंद यौवनि मी तुझीच झालें
नाहि नाहि म्हणता तुला, सर्वस्व अर्पिलें
________________________

अविनाश..........

प्रेमगीत


का लावीशि सखे तु, जिव्हा लाल अधरास,
पुसशील प्रेमगीत ,जे अधरावर लिहिलेले..

नको सारखि चाचपु तु केश कुंतलास,
खाली पडुन जाइल, मी फुल माळलेले..

किति तंग घातली, ति काचोळी रेशमाचि
गुदमरुन जाइल ना सखे, ते यौवन बांधलेले

तु मोहगंधा, विरघळे रातराणी गंध तव तनुत,
कसे येतिल गंध मजला, श्वास माझे थांबलेले

नको करुस प्रेम इतके, नको लावुस जिव
मी एक मुक्त बेधुंद जीव पण, मन तुझ्यात गुंतलेले
-------------------
अविनाश बेधुंद.स्वच्छंदी..मुक्त जीवन

ते सुंदर दिसणे,रोज भेटणे, हसुन बोलणे,

ते सुंदर दिसणे,रोज भेटणे, हसुन बोलणे,
त्यात माझा जिव, साजणे, अडकुन गेला

भेट नुकतिच झाली,वाटे ऒळख युगायुगाची
तुझा मोहमयी सहवास,बेधुंद असर, करुन गेला

का टाकला कटाक्ष सौदर्यवति, तु दर्पणात
नाहि एकसंध राहीला तो, भंगुन गेला

का उधळलेस तु रंग शतरंग,सखे प्रेमाचे,
हा जीव माझा वेडा त्यात, रंगुन गेला

"शक्य नाहि"जरी किति तु, गोडव्यात म्हणाली
तो शब्द सखे, मला पुरता घायाळ, करुन गेला

छ्द्मीपणाने हसलो,जरी बेपर्वा‌इने जा म्हणालो,
ताटातुटीचा तो क्षण जिव्हारी माझ्या,लागुन गेला

अविनाशा, बेधुंद, मुक्त, स्वच्छंदि जरी तुझे जिवन
तरी"ति नाहि" हा विचार सारी धुंदी, उतरवुन गेला

-----------------------------------------------------------
अविनाश बेधुंद.स्वच्छंदी..मुक्त जीवन

तुझी ति नजर शोधते मी

घोळक्यातुन तु मला ज्या नजरेने टिपले
तुझी ति नजर शोधते मी

नुसत्या नजर कटाक्षाने घायाळ केलेस,
तुझी ति नजर शोधते मी

ज्या नजरेने आयुष्य नजर कैद झाले
तुझी ति नजर शोधते मी

"तु मला खुप आवडतेस" म्हणताना खुललेली
तुझी ति नजर शोधते मी

पहाताक्षणी जन्म जन्माची ओळख पटली
तुझी ति नजर शोधते मी

क्षण बर दृष्टी आड होत कावरी बावरी होणारी
तुझी ति नजर शोधते मी

सुख दु:खात ,साथ देणारी
तुझी ति नजर शोधते मी

झालास फितुर,बे‌ईमान तु अन चुकवतोस जी
ति तुझी नजर शोधते मी

प्रेम केले तुझ्यावर,लागली प्रेमास् नजर जी
ति नजर शोधते मी
_______________________

अविनाश बेधुंद.स्वच्छंदी..मुक्त जीवन

शाक्त पंथीय साधक साधिकांची शक्ति उपासना

नरमुंड धारी, कालिके,स्यय:म उर्जा स्त्रोत,तु शक्ति असे.
आम्हि वामाचारी,शाक्त पंथीय, माते, तुज आमुचे वंदन असे.

हे नाग नंदिनि,कालिके,चंद्र सुर्य ,तुझे अलंकार असे
जरी वाटे भयभित तुजे रुप,त्यातच आम्हा ममता दिसे

योनितत्व प्राशुनि,साधक साधिका अराधनेस माते सज्ज असे
हे मातंगी,भुवनेश्वरी,महालक्ष्मी,आम्हि स्वेछ्याचारी तुझे दास असे

"म"कार साधक आम्हि,मद्य,मास,मुद्रा,मत्स्य,मैथुन,चे उपासक आहे,
तव प्राप्तिसाठी बगलामुखी देवि,घट्कंचुकी विधी अनुष्टीत आहे

उघडले उघडले द्वार,ईडा,पिंगलेचे,तव उर्जा आत शिरली आहे
माते धन्य धन्य हा साधक, मा कुंडलीनि जागृक झाली आहे.

लागली बघ ब्रह्मांनंदी टाळी,सारा देह उर्जेत नहात असे.
वितळले ब्रह्मांड लक्ष लक्ष रंगात,प्रत्येक रंग कणांत तव रुप दिसे

धन्य झाले जिवन,काहि न उरले ,तव दैदिप्य मान दर्शन घडले आहे
कृत कृत्य मी,शीरच्छेद करुनी, मी ,शीर कमल तव चरणी वहात आहे.
__________________________________________

अविनाश बेधुंद.स्वच्छंदी..मुक्त जीवन

तुझ्या बरमुडा त्रिकोणा चे आकर्षण

तु आहेसच सागरा सारखी.
अथांग,....गुढ
निळेशार.. कधी खवळलेली..
उंच लाटा..कधी शांत वरवर..
आत खवळलेली...
खुप खोल..खारट....
आवडत..तुझ्या लाटावर स्वार व्हायला..
खवळलेल्या विशाल पात्रांत झोकुन द्यायला....
अन तिथेच कुठेतरी आहे तो
Bermuda triangle..... बरमुडा त्रिकॊण...
अदृश्य..अनाकलनिय, गुढ...
जबरदस्त आकर्षण शक्ति असलेला...
खेचतो मला गलबता सह..आत..आत
विरुन जातो मी, बनतो समुद्राचाच एक भाग...
त्या त्रिकोणाचा...विसरतो देहभान...,
मग डोळे उघडतो, अन स्वत:लाच पहातो..
तुझ्या किना~यावर पडलेला...विवस्त्र..शान्त..निपचीत

-------------------------------------------
अविनाश बेधुंद.स्वच्छंदी..मुक्त जीवन

Saturday, February 9, 2008

रुसवा...

माळण्यास आणली आहेत मी
ही शुभ्र फुले मोगऱ्याची
का रुसलीस प्रिय सखे
काय झाली चुक पामराची.......

पौर्णेमेची ही रात्र आहे सखे
धवल चंद्र बघ नभी उगवला
काय खता झाली प्रिये माझी
माझा चंद्र का बरे रुसला???.....

नजर इकडे तिकडे भिरभिरलेली
गौर वर्ण,नाजुक नासीका फुललेली
अधर पाकळी दाता खाली दाबलेली
गोड दिसतेस, जरी असली रुसलेली........

स्पर्शीता तनुस ,का हात झिडकारतेस?
भामीनि मी प्रिय सखा,का दुर लोटतेस??
मनवण्यात जरी प्रिये, मध्य रात्र उलटली
पण प्रणयाची धुंदि नाहि अजुन उतरली........

सुहास्य वदने, सुंदरी, रुसवा सोड हा
मान्य चुका, जरी नसतिल मी केल्या
संपव अबोला, अन छळवाद, तु हास,
ये मिठीत, विनवितो तुला तुझा दास......

अविनाश बेधुंद.स्वच्छंदी..मुक्त जीवन

तुलाही,मलाही

नहालीस तु, केस मोकळे पाठीवरी ऒले,
स्पर्शातुन सखे ओल जाणवे,तुलाही,मलाही

घेतले मीठीत मी सखे तुजला,चुंबिले,
मिटला दुरावा चार दिवसांचा ,तुझाही,माझाही

स्पर्शीता हळुवार उरोज,घसरला टॉवेल तनुवरुन
नसे भान त्याचे प्रिये,तुलाही,मलाही

रस गंधाची माद्क बरसात,उधळण असे,
धुंद करी ते, तुलाही,मलाही

शयन गृहाचे कवाड सखे असे उघडे,
नसे भान त्याचें, तुलाही,मलाही

कामधूंद सखे असे तु, असे मीहि कामातुर
नसे लज्जा, नसे भय, तुलाही,मलाही

अविनाश बेधुंद.स्वैर..मुक्त जीवन

Friday, February 8, 2008

नयन नक्षत्रांचे चाळे

नयन नक्षत्रांचे चाळे बघता बघता
तुला निट निरखता आलेच नाहि.

ऒठांत उष्ण अधर फोडी घेता घेता
हनुवटी वरचा तिळ दिसलाच नाहि.

न्याहळता नजरेने काचोळी तले यौवन
तोल संभाळता आलाच नाहि

मेंदिची केशरी नक्षी बघता बघता
बिल्वरी चुडा बघितलाच नाहि

मोकळे दाट केस छेडता छेडता
गंध ग्लानी आलि समजले नाहि

गात्रांतुन ओसंडणारे लावण्य बघता
तुझे सोळा श्रुंगार बघितलेच नाहि

झेलता कटाक्ष,लावण्य सुंदरी तुझा
भंगलो, मी, एकसंध रहाता आले नाहि.

मंत्रमुग्ध झालो ,लाघवि बोलणे ऎकता ऎकता
सांगावयाचे तुला, ते सांगता आलेच नाहि..
Avinash/...................

Wednesday, February 6, 2008

हे प्रेम नाहि तर काय आहे?

मला बघुन तुझ मधाळ हसण
बघुन न बघितल्या सारख करण
मी बघीतल्यावर गोड लाजण
सखे..हे प्रेम नाहि तर काय आहे?

ड्रेस खरेदी करताना,
माझी आवड लक्षात घेण
मग तो घालुन माझ्या समोर मिरवण
"छान दिसतोय" म्हणाल्यावर
तुला आवडला विचारण..
हो म्हटल्यावर खुष होण..
सखे..हे प्रेम नाहि तर काय आहे?

ऑरकुट वर माझ Scrap बुक चेक करण
कुणाचे Scrap आले बघण
मुलिंचे Scrap दिसले की चिड्चिडण
सखे..हे प्रेम नाहि तर काय आहे?

माझ्या बद्दल मैत्रीणींनी विचारल्यावर हसण
"तोच सारखा विचारतोय" अस सांगण
"अग तस काही नाहि" म्हणत..
We are just friends
म्हणत सफाई देण
सखे..हे प्रेम नाहि तर काय आहे?

सारखी भेटायची वाट पहाणे
भेटल्यावर कृतक कोप लटक रागावणे
कान धरून माफ़ी मगितल्यावर
गालावर खळी उमटणे
सखे .. हे प्रेम नाही तर काय आहे

तु माझ्यावर प्रेम करण,
हे माझे सौभाग्य आहे
तुज कडे मन धाव घेण
हे माझे प्राक्तन आहे
तुझी अन माजी ओळख
हि युगा युगाची आहे.
मी तुझा अन तु माझी
हे तर विधिलिखीत आहे....!

अविनाश बेधुंद.स्वैर..मुक्त जीवन

प्रेम रोग

त्याच्या एका कटाक्षाने घायाळ झाले
त्याच्या मधु हास्यावर मोहित झाले
रात्री नाहि निद्रा,दिवसा चांदणे दिसु लागले
मी माझीच होते पण आता मी माझी न राहिले ...
कोणी सांगेल का .... काय मला हे झाले ???

अग सखे ऎक बोल अनुभवाचे....

त्या चित्त चोरांने, तुला पुरते लुट्ले ग
तुलाच तुझ्यापासुन, पळवुन नेले ग

आता तु कशी राहशिल सखे तुझी तु
त्याच्या मोहमयी प्रेम पाशात अडकलीस तु

हा आजार गोड फार, पण जिवघेणा असे
लक्षणे तर दिसतात, प्रेम रोगाची सखे

हा रोग मुरे शरिरी, वेदना थेट काळजास
हकिम, वैद्य, थकले, नाहि दवा या रोगास.

अनुभवाचे बोल ऎक तु,एकच यावर उपाय असे.
प्रियकराचे दर्शन,हा खात्रीचा उपचार असे

भेट त्याला उपवनी,नभात शरद चांदणे असे
चुंबनालिंगने,सहवास,हिच त्या रोगावर दवा असे

अविनाश.............

Monday, January 21, 2008

तुझी ओढ लागे, असा जीव नादावला

तुझी ओढ लागे, असा जीव नादावला
तुझाच ध्यास, राजसा लागे मनाला.
रातराणीचा कामगंध,तनुत या उतरला
मदनाचे कैक बाण, ह्या ह्रुदयात घुसले.
स्पर्शीलेस तु मला,अन मी माझी न राहीले......१

जशी निळाइ व्यापे, सा~या नभाला
तुझा भास व्यापे रे, माझ्या मनाला
मोकळ्या ह्या कुंतलास,तु असे कुरवाळले,
सुवासीत गंधाने,आसमंत सारे दरवळले
स्पर्शीलेस तु मला,अन मी माझी न राहीले.....२

सडा लाल रंगाचा अधरावर घातला
भासे जणु करंडा, कुंकवाचा लवंडला
लांब रेशमी कुंतल,रुळत होते वक्षावरी
सारुन दुर कूंतलाना,तु यौवानास छेडले
स्पर्शीलेस तु मला,अन मी माझी न राहीले......३

जसा चुंबीशी राजसा, मम अधराला
मदन लाट व्यापे, ह्या कोवळ्या तनुला
घेतले रेशमी मीठित,अन अधरास चुंबिले
तुझे अधिर स्पर्श,गात्रा गात्रात विरघळले
स्पर्शीलेस तु मला,अन मी माझी न राहीले......४

कोवळी हि तनु,अर्पीली तव तनुला,
अन तनुत माझ्या तु अलगद विरघळला
मदनाचे कैक समुद्र,नाजुक देहात उसळले
तुझ्या पौरुषाने ह्या सौंदर्यास जिंकले
स्पर्शीलेस तु मला,अन मी माझी न राहीले......५

Avinash................

दिसलास मला तु,

अल्हाद वसंती संधी प्रकाशी कसे सांगु कुणा
दिसलास मला तु, उमदा अन देखणा

झालि भेट नजरांची,त्यात होता उत्स्फुर्तपणा
खटयाळ हास्य मीशीतले तुझे, होता मीश्किलपणा

अशाच भेटि घडत गेल्या,त्यातही होता सह्जपणा
घेतलास ठाव मम ह्रदयाचा, भावला तूझा स्वच्छंदीपणा

मी माझी राहीलेच नव्ह्ते, सरला होता रीतेपणा
नयनी तुझ्या हरवुन बसले, माझ्यातील मी पणा

प्रेम भावनांनी घेतला ताबा, होता तो बेधुंदपणा
भाळले तुझ्या हास्यावर, आवडला तुज, माझा वेडेपणा

दिलेस मुर्तरुप आपल्या नात्याला, अनुभवला अद्वैतपणा
नभीच्या चांदण्या सामावल्या ऒंजळीत माझ्या,
गवसला स्वर्गीचा ठेंगणेपणा......

अविनाश

शेवटच स्टेशन

रेल्वे गाडित खचाखच गर्दी होति.जिव गुदमरला होता..
एकदाची सुटली...१-२ स्टेशन वर थांबली..
काहि आत आले काहि बाहेर गेले...एका मुलान बसायला जागा दिली...
आरामात बसलो,गाडिन वेग घेतला.गाडी लयात धावत होति..
खिडकीतुन गार वारा येत होता...कधि डोळा लागला कळाले नाहि..१

स्वप्न कि काय कळेना..एक घर दिसल,माझच होत..
बरेच लोक जमले होते,मित्र होते ,नातेवाइक होते.
आत गेलो तर, हि कोप~यात रडत बसली दिसलेली,बायकांच्या घोळक्यात.
काय प्रकार कळेना,जमीनिवर कुणीतरी झोपले होते..
नाका कानांत कापसाचे बोळे,अंग पांढ~या कपड्यान झाकलेल...
त्यावर हार, गुलाल,जवळ जावुन पाहिल अन,हबकलोच
तो मीच होतो..खाडकन जागा झालो..पाहिल तर गाडी थांबलेली होति...२

डबा मोकळा होता..खाली उतरलो,अंग हलक,डोक जड झाल होत..
बाहेर अंधार होता..प्लॅटफोर्मवर शुक शुकाट होता..
कुठे आलो कळत नव्हते, कुठल स्टेशन आल समजत नव्हत..
समोर स्टेशन मास्तर उभा होता..त्याचा चेहेरा पण निट दिसत नव्हता..
मास्तर कुठल स्टेशन आल?..विचारल अन डोळ्यासमोर अंधारी आली..
बाजुच्या बाकावर बसलो..काहिच उमजत नव्हत.
"काका शेवटच स्टेशन आहे, गाडी पुढे जाणार नाहि..प्रवास संपला..
बस एवढच ऎकु आल..........३
Avinash.................

Matrix

मॅट्रिक्स...[Matrix]

तु एक चैतन्यमय,अथांग मन,ना आदि ना अंत,
तु स्वयंभु उर्जा स्रोत,मनात तुझ्या विचार अनंत

अनंत कोटी ब्रह्मांडाची रचना करतो,लागे क्षणाचाच वेळ
निर्मीति करणे अन,लय करणे,हा तुझा आवडता खेळ

अतर्क्य,अगम्य,गुढ चमत्कारीक स्वभाव तुझा,न लागे मेळ,
ब्रह्मांडा तल्या उलटा पालटी म्हणजे ,सारे तुझ्या मनांतले खेळ.

मनातच निर्माण केले हे ब्रह्मांड तु,मधे पडदा टाकला Matrix चा, मायेचा
दिले आव्हान आम्हाला, शोध मला,माझे अस्तित्व,खेळ तुझा, डोक्याबाहेरचा.

तुझ्या Matrix मायेची जादु अशी, सारे आज्ञानी "ज्ञानी" झाले
मीथ्या जग सत्य समजु लागले,आणि तुला मिथ्या ठरवण्यास पुढे सरसावले.

जिथे हरते बुध्धी,ज्ञान,तिथुन तुज कडची वाट सुरु
हा प्रांत ना बुध्धीचा,अनुभुतिचा, सांगतात तिथले वाटसरु

धन्य ते पाहिले तुला ज्यांनी,तो अलोक,तो ओंकार,संपला त्यांच्यातला "मी"
विचारले कसा आहे "तो" कोण आहे "तो" तर हसुन म्हणतात... अहं ब्रम्हास्मि , अहं ब्रम्हास्मि

Avinash...........

भुकेचा आग डोंब

दुपारचे १२.३० वाजुन गेले होते..ति जिना चढत होति.
ऊन मी म्हणत होते..पोटात भुकेचा आग डोंब उसळला होता
कालपासुन अन्नाचा एक कण पोटात नव्हता..
राजादादाला २ महिन्याची जेल झाली अन तिचे दिवस फिरले.
तो जेल जाण्या आधी हप्त्यातन ३ वेळा तरी यायचा..पैस पण बरा द्यायचा.
तो सुटलाय अस कानावर आल होत..ति वाट बघत होति त्याची.
गिऱ्हाईक येत नव्हत...धंदा होत नव्हता...उधारी झाली होति..
कुणीच उधार द्यायला तयार नव्ह्त..घरवालीला पैसे मागयची सोय नव्ह्ती..
२हजार रु अंगावर होते...ति चिडुन म्हणली की..धंदा कर अन पैसा मिळव
नसल जमत तर भिक माग..हा भाकड गुर पोसायचा पांजर पोळ नाय ...

वर आल्यावर ति शांत बसली..भुकेमुळें काहि सुचत नव्हत..
भुक असह्य झाल्यामुळे ति पाणी प्यायला उठली अन समोर राजादादा उभा
"गोदे..सकाळीच सुटलो अन तुझ्याकडच आलो.२ महिने जेल मधि..
बाईच नख बि बघायला नाय मिळाल..लय आंग ताठलय..ताव आलाय..
लई भुक लागलीय..रातभर कच्चा खाणार तुला...."

ति बघतच होति...
दोघाना कडकडुन भुका लागल्या होत्या.
दोन्हि भुका शरीराच्या होत्या..
फक्त भुकेची जात निराळी होति...

"अर..२ दिवस झाला अन्नाचा कण पोटात नाय,
चा, भज्जी पाव,मिसळ पाव मागव..माझी भुक भागव
मग मी तुझी भागवते..."भुकेन तिला त्याच्या मिठीत चक्कर आली....

अविनाश.......

लग्न करुन तु सासरी गेली आहेस

तु मी अन ममा, आपला ग्रुप होता..
त्यात आपल्या दोघांचा Secrete groupहोता.
आता आपला ग्रुप फुटला आहे,
कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस
तुझ्या नव्या जगात तु रमली आहे..

तुझ्या रुमच्या दारावर लावलेल पोस्टर
It is my Mess and i Love it
पलंगावर पुस्तके उघडी, कपडे पडलेले,
बाजुला ड्राईंग बोर्ड,त्या वर ड्राईंग शीटसचे भेंडोळे
कॉंम्प चालु, अन त्यात तुझा अभ्यास चालु
ममान तुला पसाऱ्या बद्दल दटावणे,मग चिडचिड,
मी हळुच तुझी बाजु घेणे.."सासरी काय होईल देव जाणें"
तिच पुट्पुटणे....आता सार शांत आहे...
कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस
तुझ्या नव्या जगात तु रमली आहे..

तुझ्या कॉलेजची अन मी कारखान्याला जाण्याची एकच वेळ..
मग, ति सकाळची मरण घाई..माझ्या नकळत अंघोळीला जाणे.
१५-२० मिनीटे बाथरुम अडवणे..माझी चिड्चीड..आता फक्त आठवणी
कामावरुन दमुन आलो की..Whatzzz up dad..How was the day विचारण...
रात्री जेवण झाले कि Long ride ला जाण....... मग त्या कॉलेजच्या गमती सांगण..
पी.जे..ऎकविण..ति बरीस्ता कॉफि पिणे...ह्या साऱ्या आठवणी..
कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस
तुझ्या नव्या जगात तु रमली आहे..

तु म्हणजे घरातल आनंदाच कारंज होत..थुइथुइ उडणार..
आता तुझ्या मैत्रीणीचा थवा येत नाहि..चिवचिवाट नाहि..
तुझी रुम शांत आहे..पुस्तके कपाटात.कपडे पण घडी करुन.
ड्रॉईंग बोर्ड भिंतिला टेकुन उभा..कोपऱ्यात गणपती बाप्पा ध्यानस्थ
टेडी बिअर, आणी स्टफ टॉइज पलंगावर बसलेली, तुझी वाट बघत..
फ्रीज मधल्या दुधाच्या पिशव्या,अन बोर्न व्हिटाचा डबा तसाच..
कारण दुध पिणारी माऊ अमेरिकेला गेली आहे.
आम्हाला आठवण येते..पण आम्हि पण खुष आहोत..
कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस
तुझ्या नव्या जगात तु रमली आहे..

Avinash..................

Sunday, January 20, 2008