Saturday, September 29, 2007

नांदी अद्वैताची

अधरावर गोड हसु अवखळ
गात्रांत मदनाची, मादक सळसळ
सुवर्ण कांति अशी झळाळली
अन देहांत रातराणी दरवळली

लांब रेशमी कुंतळ काळे
ओल्या अधराचे चंचल चाळें
मोहक नयनांच्या त्या कोंदणी
उमलली जणु शुक्राची चांदणी

तनुवर आरस्पानि रेशमी वस्त्रे
ते मोहक नेत्र.सळसळणारी गात्रे
मी घायाळ, कसा टिकेल तुझपुढे
अनंग, मदनाची,शस्त्रे तुझकडे

विरघळलीस,आलिस जेंव्हा मिठित
गोडी अशी काम लाघवि स्पर्शाची
संपला तो आपला पृथक भाव
प्रिये हि तर नांदी अद्वैताची

Thursday, September 20, 2007

Sunday, September 16, 2007

कुण्या गावची नार

कुण्या गावची नार
अशी गुलजार,
ज्वानीचा कहर
नाजुक चाफेकळी
कोवळी कळी
भरदार वक्ष
खेचते लक्ष
रति अवतरली
विज चमचमली
नजरेत बसली
करुन दिलावर घाव
नाहिशी झालि
नाहिशी झालि
जीजी ग, जीजी ग जी !१!

मुसमुसलेली कळा
जिव चोळामोळा
गालावर लाली
वर जिवघेणी खळी
शराबी नजर
सुरीची धार
वार आरपार
रक्ताची धार,
थांबता थांबेना
शुक्राची हि चांदणी
अशी चमचमली
दिपवुनी डोळे
नाहिशी झालि
नाहिशी झालि
जीजी ग, जीजी ग जी !२!

सुंदरसा तो मुखडा
चंद्राचा तुकडा.
लाख मोलाचा
घनदाट केशसंभार
कोवळा तनुचा भार
रुपांचा कहर
भिरभिरी नजर
लालेलाल अधर
अनंगाचा रंग
नाचे मनमयुर
ल्याली इरकली
गोरे अंग जाळी
तंग काचोळी,
यौवनाची झळाळी
झळाले अंगभर.
अशी हि नार,
जिवाला घोर,
लावुनि गेली ,
नाहिशी झालि
जीजी ग, जीजी ग जी !३!

Wednesday, September 5, 2007

प्रणय सोहळा रंगला

रुप पहाता राधेचें,
शाम गाली हासला
यमुने काठी, शाम राधेचा,
प्रणय सोहळा रंगला

यमुने काठी शामसावळा,
मोर मुकुट पितांबर ल्याला
शामल सुंदर, रुप मनोहर
मोर मुकुट पितांबर सुंदर
शामरंगी काजळ होऊनी
राधा नयनी जाऊन बसला.
यमुने काठी, शाम राधेचा,
प्रणय सोहळा रंगला

गौर गुलबी राधा काया,
राधा ना ति जग्न माया,
चित्त चोराची,एकुन बासरी
मनी उठल्या त्या प्रेमलहरी
मन मयुर तो नाचु लागला
यमुने काठी, शाम राधेचा,
प्रणय सोहळा रंगला

अलौकिक सोहळा यमुने काठी
खेळे राधा अन जगजेठी
नाचे नंद नंदन,नाचे मन मोहन
नाचे राधा नाचे यदु नंदन
पाहि अवतारी जन, पाहि सिध्द भक्तजन
पाहि ब्रज गोधन,पाहि हरपुन तन मन
तो शाम राधेच्या,मनी जावुनी बसला
यमुने काठी, शाम राधेचा,
प्रणय सोहळा रंगला