Sunday, January 9, 2011

सहावि सातवित असेन.

सहावि सातवित असेन..बहुतेक
उन्हाळयाच्या सुट्या चालु झाल्या होत्या..
आमचे १०-१२ मित्रांचे टोळके बाळ पुंडलीक मित्राच्या वाड्यात दंगा करायला जमले होते...
वाडा चौसोपि व.मोठा. .. आत एक विठ्ठल मंदिर हि होते..सभामंडपात सारे जमलो होतो..
गप्पा चालु होत्या.. "अन आपण नाटक करु यात का?".चंद्या घाटपांडे म्हणाला..
सा~यांनी कल्पना उचलुन धरली.. पण कोणचे? .कुणालाच सुचेना
शेवटी "तुच एखादे नाटुकले लिहि..असा मला आग्रह झाला..
मित्रांच्या विश्वासाचा अन अज्ञानाचा फायदा घेत मी पण हो म्हटले..
रात्री विचार करीत अश्वथाम्याच्या कथेवर एक छोटे नाटुकले लिहिले...
अश्वथामा दुध मागतो ..घरची गरीबी.. आई पाण्यात पिठ कालवुन देते तिच... घिसि पिटी कहाणी..
दुस~या दिवशी वाचन झाले.दोस्त खुश झाले.व बेत ठरला..पात्रे पण २ नच होति अश्वथामा व आई..
सभामंडपातच नाटक हो्णार म्हणजे बाय डिफॉल्ट बाळ हिरो हे तर नक्किच होते..
आईच काम कोण करणार?काळ जुना असल्याने मुलांची कामे मुले व मुलिंची मुली असली चंगळ नव्हति..
मुलेच स्त्री पार्ट करीत ..शाळेतल्या स्नेहसंमेलनात हि मुलिंचे निराळे व मुलांचे निराळे अशी नाटके होत असत..
सगळ्याच्या नजरा जोश्या कडे वळाल्या..गोरा घारा व सुंदर होता दिसायला..तु हो ना आई..सारे त्याला म्हणाले..
ए हट मी नाहि...म्हणत जोश्याने ऑफर नकारली..शेवटी कसे बसे त्याला आम्हि मनावले..व तो पण राजी झाला..
तालमी जोरात सुरु झाल्या.उत्साह दांडगा होता...व उद्या रंगीत तालिम ड्रेस ..मेक अप वगैरे करुन करायचे असे ठरले..
दुस~या दिवशी दोस्त कंपनी आपल्या बहिणीचे परकर पोलके..छोट्या साड्या जमतिल तश्या घेवुन हजर झाले..
आतल्या खोलित आम्हि वेषभुषा करण्यास सुरवात केली ..बाकिची मित्र मंडळी बाहेत दंगा करीत होति..
अश्वाथाम्याचे सोंग पटकन रंगले...आईला पण परकर पोलके साडी नेसवली..मेक अप केला ..जोश्या च रुप खुलले होते..
केसांचे काय करायचे प्रश्ण होता..अर्थशुन्यावर अधारीत नाटक असल्याने विग कुठला परवडणार?
शेवटी केश वपन झालेल्या बायका घेतात तसा घट्ट पदर आईच्या डोक्यावरुन घेतला व पिन लावुन टाकली..
जोश्या एकदम "आई" दिसत होता..तरी पण एक कमी राहिली होति..
पुर्वि शाळेतल्या गॅदरिंग मधे जरी मुले स्त्री पार्ट्स करीत असत तरी "पॅडिंग" असल्याने तो "टच्च" ईफेक्ट दिसायचा..
आमच्या कडे "पॅडिंग" नसल्याने काय करावे या काळजीत बाल चमु होते...
पिंग पॉंग चे बॉल..चंद्या ने सुचवले.. आम्ही चेंडु पोलक्यात छातिवर योग्य त्या जागी ठेवले व हवा तो ईफेक्ट मिळाला.
पण पोलके जरा ढगळ असल्याने चेंडु छातिवरुन खाली घसरु लागले..
तु छाति जरा फुगव..एकाने सुचवले..व चेंडु "त्या" जागी घट्ट बसले व मी निश्वास सोडला...
पण जोश्या बोलु लागला कि श्वास सुटायचा व त्या तारुण्य खुणा परत पोटाकडे घरंगळायच्या..
त्या मुळे आयडिया फेल झाली.. "टेनिस बॉल घेवु यात का?" चंद्या म्हणाला अन सारे हसायला लागले.
मला तर शकुंतला आठवली..तिचे तर पोलके उसवले होते..
टेनिस बॉल टाकले तर चोळी फाडुन जोश्याचे तारुण स्टेजवर उडी घेईल कि काय अशी शंका माझ्या मनात आली..
शेवटी माझ्या डोक्यात आयडियाची कल्पना आली..व पुर्वि बटर मिळ्त.. ते ठेवावे असे ठरले.
बटर ची एक बाजु ब~या पैकी फुगीर असते तर दुसरी सपाट असल्याने हा पर्याय फिट्ट ठरला..
बटर पोलक्यात ठेवले. व हवा तो ईफेक्ट मिळाला.. उंचवट्या मुळे जोश्या परफेक्ट आई वाटु लागला..
सारे सजवुन आमची वरात सभामंडपात आली..
सोंगे बाहेर आल्यावर सा~या दोस्तांनी आई व अश्वथाम्या जवळ गराडा घातला..
जोश्याचे ते रुप पाहुन पौगंडावस्थेतल्या मुलांच्या भुका खवळल्या..अन सारे जण जोश्याला"आई भुक लागली दुध दे ना" म्हणुन चिडवु लागले..
मी गलका शांत करीत होतो.. बाजुस उभा असलेला अश्वथामा तरी कसा मागे रहाणार?
त्याचा तर आईच्या दुधावर जन्मसिद्ध हक्क होता..
अश्वथामा आई जवळ गेला अन नाटकी स्वरात म्हणाला.."आई भुक लागली दुध दे ना"
आई उर्फ जोश्या जरी गलक्याने वैतागला होता तरी तो गमत्या होता..
त्याने पोलक्यात हात घालुन दोन बटर बाहेर काढले व अश्वथाम्याच्या हातावर टेकवत म्हणाला..
"बाळा..या आईला दुध नाहि बटर येते ते खा अन भुक भागव.." असे म्हटल्यावर सारे जण हसु लागले...
व अश्या रीतिने हास्य कल्लोळात रंगीत तालीम संपन्न झाली.



Friday, January 7, 2011

भ्रमर वृत्ति.....

भ्रमर वृत्ति.....
विवाहबाह्य संबंध हे फार पुर्वि पासुन होते..लग्न झाल्यावर एखाद्या स्त्री कडे माणुस आकर्षित होतो अन वैवहिक जिवनाची वाटचाल वादळ वाट होते..भ्रमर वृत्ति वा इंग्लिश मधे ज्याला फ्लर्टींग म्हणु हा पुरुर्षांचा स्थायीभाव आहे..सुप्त स्वरुपात तो प्रत्येका मधे वसत असतो..
विवाहित असो वा अविवाहित.. रस्त्यावरील वा दिसलेल्या एखाद्या सुंदर तरुणी कडे वा ललने कडे नजर टाकणार नाहि असा पुरुष विरळाच...अशी ललना दिसल्यावर...
तलम साडीतुनी डोकावे तुझा खांदा गोरापान
पडता नजर त्यावरी होइ मन खट्याळ व बेभान
अशीच अवस्था होत असते...या सुकुमार फुलावरुन त्या फुलावर ज्या प्रमाणे भ्रमर गुणगुणत विहार करीत असतो.. त्या मुळेच यास भ्रमर वृत्ति असे म्हटले तर त्यात वावगे काय?
भ्रमर वृत्ति वा फ्लर्टींग ..व विवाहबाह्य संबंध यामचे सुक्ष्म सिमारेषा आहे व ति कधी ओलांडली जाते ..
खरे तर याचे परी्णाम कळत नाहित असे नसते..पण हि रेषा का ओलांडली जाते?
असे एक मत आहे कि कार्यालयात स्त्री सहका~या बरोबर पुरुष आपल्या बायको पेक्षा जादा सहवासात असतो..व आकर्षण रसायन काम करु लागते..
पुरुषांच्या मनात परस्त्री बद्दल सुप्ताकर्षण असतेच..पण संधि नसते..,
संधि मिळे पर्यंत राम हाच त्यांचा आदर्श असतो..
स्त्रीचा होकार व पुढाकर या शिवाय हे शक्य नसते..
पुरुष विवाह बाह्य संबंध का ठेवतात त्या काहि कारणे आहे..अर्थात हे अश्या वृत्तिचे समर्थन नाहि हे क्रुपया लक्षात घ्यावे.
*ईगो..पुरुष अहंकरी असतात..कर्तुत्व..व्यक्तिमत्वात..सत्ता..समाजतले स्थान या बद्दल त्यांना अहंकार असतो..
*तसेच काहि पुरुषांना न्यन गंड असतो.. .आपली दखल घ्यावी या हव्यासा पोटी पण असे घडत असते...दुसरी स्त्री आपली दखल घेते हि भावना त्यांना सुखावत असते.
*आपत्य प्राप्ति नंतर स्त्रीचे विश्व बदलते..व तिचे लक्ष मुलाकडे जादा असते..तसेच शरीर रचना बदलल्ते.. व त्या स्वतः कडे जादा लक्ष देवु शकत नाहि..व त्या कडे दुर्लक्ष होते..नवर्याची शारीरिक व भावनिक भुक त्याला या मार्गा कडे ढकलते.
*ब~याच वेळा वैवाहिक जिवन रुटीन व तच तेच होवुन जाते.काहि तरी थ्रील..नाविन्य म्हणुन हि माणुस त्या मा्र्गाने जातो..नविन प्रेयसी बरोबर चोरट्या गाठी भेटी..त्याच्या जिवनात एक नवा आनंद घेवुन येतात...
*काहि वेळा पत्निचे जुने रहस्य..तसेच तिच्या वागण्या संशय येवुन माणसाच्या मनात सुडाच्या भावना येतात..ब बदला घेण्या साठी पण काहि पुरुष ह्या मार्गाने जातात..
*काहि पुरुष जिवनातल्या पैसे कमवा..मुले..संसार..वाद विवाद या सा~या रुटीन गोष्तीला कंटाळले असतात..त्या मूळे पण असे घडत असे्ल..
*एका आर्टीकल मधे तर असा विचार मांडला होता कि विवाह बाह्य संबंध असतिल तर संसारात मजा येते...
पण या सा~या प्रकारात स्त्री ला च दोष दिला जातो..सिनेमा नाटके ,,कथा या मधेहि..एक सुखि संसार मग दुस~या स्त्री चे आगमन मग.....हे आपण पहात असतो..
कदाचित त्या दुस~या स्त्रीच्या संमति शिवाय असे संबंध प्रस्थापित होत नसल्याने तिला दोष दिला गेला असले...
या एका प्रसंगात सयामचा राजा माँग्कुट (युल ब्रायनर) त्याच्या मुलांची इंग्रज शिक्षिका अ‍ॅना लिओनोवेन्स (डेबोरा केर्र) हिच्याबरोबर युरोपियन आणि सयामी स्त्री-पुरुष संबंधांच्या फरकाविषयी चर्चा करत असतात. त्यावेळेला होणारा त्यांचा संवाद पुढील प्रमाणे. खात्री आहे सगळ्यांना आवडेल हे वाचायला...

Anna: In your house she's just another woman. Like a bowl of rice is a bowl of rice no different from any other bowl of rice.
King: Now you understand about women! So, many English books talk about love etc etc etc ha!
Anna: You disapprove?
King: It is a silly complication of a general simplicity. A woman is designed for pleasing man that is all. A man is deigned to be pleased by many women
Anna: Then how do you explain, your majesty, that many men remain faithful to one wife
King: They are sick.
Anna: Oh, but you do expect women to be faithful?
King: Naturally!
Anna: Well why naturally?
King: Because it is natural. It is like old Siamese saying. A girl is like a blossom, with honey for just one man. A man is like a honey bee and gather all he can. To fly from blossom to blossom a honey must be free. But blossom must not ever fly from bee to bee to bee.
अर्थात हे सारे व्यक्ति सापेक्ष आहे..कोण कसे वागेल हे त्या व्यक्तिवर त्या परिस्थिवर अवलंबुन असते..
हे योग्य कि अयोग्य हा ज्याचा त्याचा विचार आहे..ज्याला जमते..झेपते तो करतो..

कप आणी बशी

कप आणी बशी
कप आणी बशी ही जगत विख्यात जोडी आहे..एका लेखकाने संसाराला कप बशीच्या स्टॅंडची उपमा देत पुरुष म्हणजे कप लटकत असतात तर बश्या आरामात वर पहुडलेल्या असतात..असे वाचाल्याचे स्मरते..

आमच्या लहान पणी समाजात बशीने चहा पिण्याच्या प्रघात होता ..पण फुर्र आवाज करायचा नाहि असा दंडक होता कारण तसे करणे मागासलेपणाचे समजायचे..

पढे जसा काळ सरकत गेला तसे लोक घरात बशीने पण बाहेर मात्र कपाने चा पिवु लागले..चार चौघात बशिने चहा पिणे असभ्य/कमी पणाचे वाटु लागले..
आज तर जवळ जवळ बशीचा चहा पिण्या साठी वापर ना घरात वा बाहेर कुणी करताना दिसतो...
एका मित्राने पुर्वि एक टिप दिली होति..हॉटेल मधे चहा पिताना नेहमी डाव्या हातात कपाचा कान पकडुन चहा प्यावा..कारण जवळ जवळ ९९ % लोक उजव्या हाताचा वापर करीत असल्याने त्या कपाचा भाग दुषित असण्याची शक्यता जादा असते..पण डाव्या हातने कपाचा कान पकडुन चहा प्यायला तर ति बाजु कमी लोकांनी वापरल्याने जंतु प्राद्रुर्भाव शक्यता त्या मनाने कमी असते..

ग्लासात हि ब~याच ठिकाणी चहा दिला जातो..विषेश्ता कष्टकरी व कामगार वर्गाला व बाहेरुन बारक्याने आणलेला चहा ग्लासातुनच दिला जातो...

मी बशीने चहा न पिण्याचे एक कारण हि घडले..साधारण ६९-७० साल असेल पोटात गडबड झाली म्हणुन वैद्या कडे गेलो होतो..त्या काळी पुण्यात कै.लावगण कर व सरदेशमुख असे दोन निष्णात नावाजलेले वैद्यराज होते..नाडी परिक्षेने निदान करुन ते औषधे देत असत..नाडि परिक्षा इतकि अचुक असे कि रात्री तुम्ही काय खाल्ले हे पण ते सांगु शकत अशी वदंता होती...

वैद्यराजांनी नाडी परिक्षा केली व पुड्या दिल्या..खरे तर पोटात गुबारा धरणे माझ्या बाबत वारंवार घडत होते..असे त्यांना सांगीतल्यावर बशीने चहा पिवु नका कारण घोटा बरोबर बरीच हवा पोटात जाण्याची शक्यता असते व त्या मुळे हि गुबारा धरु शकतो...तेंव्हा पासुन मी बशीने चहा पिणे सोडले व त्याचा गुण हि आला...

कॉफी मात्र बशीने कुणी पित नाहि असे आढळते.. मग चा पण वापर मोठ्या प्रमाणात केला जातो..

चहा हा सा~यांना लागतोच..म्हणच आहे..चहाला वेळ नसते पण वेळेला चहा लागतो...

Wednesday, January 5, 2011

एक मुक्तक

एक मुक्तक

विचारांच्या युध्दात जर कोणाचा बळी जात असेल तर तो आहे माणसाचा!” ” लोक पैसा व सत्तेसाठी खून करतात. पण सर्वात निष्ठुर खुनी आपल्या विचारधारेसाठी खून करतात.’

विचारात कोट्यावधी अणुबॉंब इतकी ताकद असते हे खरे...एखाद्या विचार धारेने प्रभावित झालेले माणसे वा समुह आपल्या विचारधारेसाठी कुठल्याहि थराला जावु शकतात..

आर्यांचे वंश श्रेष्टत्व या विचाराने हिटलर भारावुन गेला होता..वर्ण संकर त्याला मान्य नव्हता..लाखो ज्युज मृत्यूमुखि पडले...गंमत म्हणजे चर्चिल जो हिटलर चा विरोधक होता त्याला माईन काम्फ मधले हे हिटलरचे वंश श्रेष्ठता संबंधिचे विचार मान्य होते....

रशियन देषात क्रांति झाली कार्ल मार्क्स ची विचारधारा म्हणजे देवाचि आज्ञा झाली...ज्यांना ति विचार धारा मान्य नव्हति अश्या लाखो लोकांना स्टॅलिन लेनिन ने यमसदनाला पाठवले...साम्य वादाचा विचार रुजवण्या साठी मोठ्या प्रमाणात दडपशाहि झाली...अन शेवटी मुळात ति विचार सरणीच फुसकी ठरली...लोकांनी साम्यवाद नकारला...स्टॅलिन .लेनिन.मार्क्सचे पुतळे लोकांनी समुद्रात बुडवले....

स्वातंत्रा नंतर समाजवादाच्या विचाराने भारतातले शिर्श नेते फार प्रभावि झाले होते..समाजवाद म्हणजे परवलीचा शब्द झाला होता...सगळीच कामे सरकार करु लागली...हॉटेल चालविणे,अवजड उद्योग,बॅंकिंग..अश्या अनेक उपक्रमाचा जन्म झाला..शेवटी यासा~या व्यवसायात व्यवसायाचे मुख्य तत्व "नफा" हेच विसरले गेले अन सारे उद्योग म्हणजे नोकरदारांचे अड्डे झाले...त्याच संप, खोटी नोकरभरती असे अनेक गैरप्रकार शिरले....या समाज वादी विचारांना जेंव्हा विरोध होवु लागला तो मोडण्या साठी..श्रीमति गांधि यानी समाजवाद हे घटनेचे कलम केले व त्या साठी घटना दुरुस्ति झाली...शेवटी उत्पादन कमी व खर्च भरपुर त्या मुळे सारा देष आर्थिक द्रूष्ट्या डबघाईला आला...सोने गहाण पडले व शेवटी भारताने समाज वादाचा त्याग करुन मुक्त अर्थ व्यवस्थेची कास धरली.....

वैशण्व व शैव..प्रोटेस्टंट व कॅथलिक या विचार धारांचा वाद पण प्रसिध्द आहे..त्या साठी अनेक धर्मयुध्दे झाली...

रामजन्म भुमीच्या विचाराने पेट घेतला..व लोकांनी आपल्यी विवेक बुध्दीशी फारकत घेतली..हिदुत्वचे हिंसक रुप पुढे आले..अन बघता बघता लाखो लोकांनी मशिदिचे चुर्णात रुपांतर केले..आणि हजारो लोक मृत्युमुखि पडले...नंतर केवल सत्तेसाठी हा खेळ होता हे लक्षात आले अन हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भा.ज.प. सरकार सपशेल हरले...

अल्ला सर्वश्रेश्ठ व मुर्तिपुजा मंजुर नसलेल्या माथेफिरुंनी एका हातात कुराण व एका हातात तलवार घेवुन सारे जग इस्लाम करण्या साठी जगाशी वैर घेतले..व लाखो निरपराध लोक मृत्युमुखि पडले...

असे अनेक विचार जगात आले व येत रहातिल ..एखाद्या विचासरणीची नशा चढली कि मानवसमुह विवेक बुध्दी हरवुन बसतो...एका थोर विचावंताने नमुद केलेच आहे कि

"मनुष्य जातिचा सारा इतिहास क्रौय व हिंसाचाराने रंगलेला आहे....