Friday, January 7, 2011

कप आणी बशी

कप आणी बशी
कप आणी बशी ही जगत विख्यात जोडी आहे..एका लेखकाने संसाराला कप बशीच्या स्टॅंडची उपमा देत पुरुष म्हणजे कप लटकत असतात तर बश्या आरामात वर पहुडलेल्या असतात..असे वाचाल्याचे स्मरते..

आमच्या लहान पणी समाजात बशीने चहा पिण्याच्या प्रघात होता ..पण फुर्र आवाज करायचा नाहि असा दंडक होता कारण तसे करणे मागासलेपणाचे समजायचे..

पढे जसा काळ सरकत गेला तसे लोक घरात बशीने पण बाहेर मात्र कपाने चा पिवु लागले..चार चौघात बशिने चहा पिणे असभ्य/कमी पणाचे वाटु लागले..
आज तर जवळ जवळ बशीचा चहा पिण्या साठी वापर ना घरात वा बाहेर कुणी करताना दिसतो...
एका मित्राने पुर्वि एक टिप दिली होति..हॉटेल मधे चहा पिताना नेहमी डाव्या हातात कपाचा कान पकडुन चहा प्यावा..कारण जवळ जवळ ९९ % लोक उजव्या हाताचा वापर करीत असल्याने त्या कपाचा भाग दुषित असण्याची शक्यता जादा असते..पण डाव्या हातने कपाचा कान पकडुन चहा प्यायला तर ति बाजु कमी लोकांनी वापरल्याने जंतु प्राद्रुर्भाव शक्यता त्या मनाने कमी असते..

ग्लासात हि ब~याच ठिकाणी चहा दिला जातो..विषेश्ता कष्टकरी व कामगार वर्गाला व बाहेरुन बारक्याने आणलेला चहा ग्लासातुनच दिला जातो...

मी बशीने चहा न पिण्याचे एक कारण हि घडले..साधारण ६९-७० साल असेल पोटात गडबड झाली म्हणुन वैद्या कडे गेलो होतो..त्या काळी पुण्यात कै.लावगण कर व सरदेशमुख असे दोन निष्णात नावाजलेले वैद्यराज होते..नाडी परिक्षेने निदान करुन ते औषधे देत असत..नाडि परिक्षा इतकि अचुक असे कि रात्री तुम्ही काय खाल्ले हे पण ते सांगु शकत अशी वदंता होती...

वैद्यराजांनी नाडी परिक्षा केली व पुड्या दिल्या..खरे तर पोटात गुबारा धरणे माझ्या बाबत वारंवार घडत होते..असे त्यांना सांगीतल्यावर बशीने चहा पिवु नका कारण घोटा बरोबर बरीच हवा पोटात जाण्याची शक्यता असते व त्या मुळे हि गुबारा धरु शकतो...तेंव्हा पासुन मी बशीने चहा पिणे सोडले व त्याचा गुण हि आला...

कॉफी मात्र बशीने कुणी पित नाहि असे आढळते.. मग चा पण वापर मोठ्या प्रमाणात केला जातो..

चहा हा सा~यांना लागतोच..म्हणच आहे..चहाला वेळ नसते पण वेळेला चहा लागतो...

No comments: