Monday, March 19, 2012

उडाली पाखरे परदेशी

उडाली पाखरे परदेशी ,मोकळा चौसोपी वाडा.
पोपडे पडे ओसरीस ,नाही अंगणी शेणसडा..

ना सकाळची लगबग, ना गोडआवाज जोडव्याचे
चुल शांत,.वाळले पोतेरे,लुप्तले नाद बांगड्याचे

परसदारी तो औदुंबर, असे शांतपणे उभा.
ना त्यास प्रदक्षिणा, ना कुणी राखे निगा.

कोनाड्यातील आरसा ,उडाला त्याचा हि पारा
भीतीवरील कुंकु खुणा, मिरवी सौभाग्याचा तोरा

अडगळीतली रेशमी वसने, सांगे शृंगाराच्या कथा
कोप~यातली उभी काठी, कण्हे वार्धक्याच्या व्यथा.

कोप~यातल्या खाटेवर, श्वास मंदसा घुमे कुणाचा?
ना हाती जीवनमरण ,भोग भोगणे खेळ नियतींचा

Saturday, March 3, 2012

मालविका

वेळ रात्रीची होती..त्यांतून अमावास्या असल्याने वातावरण काळोखात बुडून गेले होते..
त्या निर्जन भागात तो जीर्ण प्रासाद भयाण पणे उभा होता...आत एक मंद पणे मिणमिणता दीप तेवत होता..
प्रासादाच्या सोपानावर मालविका कुणाची वाट बघत बसली होती?
मुख कमल म्लान झाले होते.व पाणीदार नेत्रातली प्रभा मंद झालेली होती..नजरेत एक क्लांत शिणलेला भाव होता.तरी मालविकेचे सौंदर्य वेड लावेल असेच होते..गौरांगनेची काया फिकट पडली होती..तर अधर सुकलेले वाटत होते..
दूर बाजूला एक मरणोन्मुख असा वृद्ध बसला होता...देवदत्त असे त्याचे नाव आहे..शरीरावरची कातडी लोंबत होती..डोक्यावरचे केस गेलेले...डोळे आत खोल गेलेले ..शक्तिहीन असे ते कलेवर पायरीवर बसला होते..वय तर साधारण ९०च्या पुढेच असावे..
मात्र तोंडाने सोडव..मुक्ती ..असे क्षीण आवाजात स्वतःशीच पुटपुटतं होता
दोघेही जण कुणाची तरी वाट डोळ्यात प्राण आणून पाहतं असावे..
त्यातला तो वृद्ध देवदत्त तर मुक्तीची आस लावून बसला होता ...
दूरून कोणतरी वाटसरू येताना मालविकेला दिसत होता..
तो वाटसरू म्हणजे आपल्या कथेचा नायक आर्यपुत्र अग्निमित्र होता..विशी ओलांडलेला व राजसेवक, धैर्यवान, विर्यवान युवक..
नृपाचा महत्वाचा संदेश घेऊन तो बाजुच्या गावातील प्रमुखास देण्यास निघाला होता. रात्र होत होती त्यांतून अमावास्येने आसमंत काळवंडले होते...रस्ता पण पायाखालचा नव्हता..जवळच्या पळशीतले जल पण संपले होते..त्यालाही पाय पिटीने थकल्या सारखे वाटत होते.
त्याला दूरून त्या प्रासादाची अंधुकशी आकृती व मिणमिणता प्रकाश दिसत होता...
झप झप पाय उचलत तो प्रासाद जवळ येऊन ठेपला..अन त्याची नजर मालविके वर पडली...
तो विचारत पडला व विचार केला अश्या या निर्जन भागात हा प्रासाद अन ह्या प्रासादात हि सुंदरी एकटी काय करीत असेल??अन हा बाजूला बसलेला वृद्ध कोण असावा ?
अग्नी मित्र मालविच्या समीप गेला अन चकितच झाला सौंदर्याची ति पुतळी पाहून त्याला आश्चर्य वाटले.
मी अग्नीमित्र..नृप सेवक..सुंदरी इथे एकटी अशी का बसली आहेस? तो म्हणाला...
म्लान वदनाने मालविकेने याचना भ~या करुण नजरेने.अग्नी मित्रा कडे पाहिले.
अहो आर्यपुत्र अग्निमित्र..माझ्या शरीरात अजिबात त्राण नाही..अंगात अंमळसा ज्वर आहे..शरीर तापले आहे..घशास शोष पडल्याने घसा सुकला आहे..कुणी तरी येईल व मला आत घेऊन जाऊन जल पाजेल याचीच मी वाट पाहतं बसले होते..२ पाउले चालण्याची हि शक्ती नाही हो या शरीरात...अन तो बाजुचा माझा सेवक काही कामाचा नाही शेवटच्या घटका मोजत आहे...नाही सहन होत हो हे सारे.....अन मालविकेचा बांध फुटला तिच्या डोळ्यातून अश्रू धारा सुरू झाल्या ..
अग्निमित्र झटकन पुढे गेला व म्हणाला.. सुंदरी मी आलो आहे ..चिंता नसावी..
चल असे म्हणत त्याने मालविकेस उचलून घेतले..खाली पाडू नये म्हणून मालविकेने आपल्या कोमल कर कमलाने त्याच्या गळ्यास मिठी मारली...
अग्नी मित्र..तिला शयन गृहात घेऊन आला व शय्येवर तिला अलगद झोपवले..बाजूलाच एका मृत्तिकेच्या घटामधे पाणी होते ते एका पात्रात घेऊन आला..
जल तिच्या तोंडावर शिंपडले अन एकदम मालविकेने मंदपणे डोळे उघडले ... पोटात पाणी गेल्याने तिला तरतरी आली होती..स्वतःस सावरत ति उठून बसली अन अग्नि मित्रा कडे मंदपणे स्मित हास्य करत म्हणाली..तुमचे कसे धन्यवाद मानु तेच समजत नाही....
मी काहि विषेश केले नाहि ..पण आपण कोण? असा प्रश्ण त्याने विचारला.
मी मालविका..तुम्हाला एक विनंति करते..रात्र होत आहे आपण हि दमलेले दिसत आहात..रात्र अमावास्येची असल्याने आसमंतात अघोरी शक्ती वावरत असतील..आज आपण या प्रासादात रात्र काढावी अन सकाळीच कामास जावे असे सुचवत आहे..ति म्हणाली..
माल विकेच्या बोलण्यातले आर्जव व अधराचे अन नेत्रांचे विभ्रमी चाळे ति काय सुचवते ते आपला नायक समजला.
भय नावाचा प्रकार आम्हांस माहीत नाही..पण आपले आमंत्रण नकारण्या इतके अरसिक हि आम्ही नाही..आपल्या इच्छेस मान देत आज आम्ही इथे राहण्याचे ठरवले आहे..
धन्यवाद नाथ ..म्हणत मालविका त्याच्या समीप आली...
अग्नि मित्राने त्या कोमलांगीस आपल्या बाहुपाशात घेतले व तिच्या अधरावर अधर टेकविले...दिपाची वात मागे सारत दोघेही रतिसुखात डुंबून गेले....
रति क्रीडा पुरी झाली अन तृप्त झालेला अग्नि मित्र हतवीर्य अवस्थेत तिच्या कोमल तनु वरुन बाजूला झाला ..
शय्येला पाठ टेकून तो पडला असता..त्याच्या शरीरास विचित्र संवदना जाणवू लागल्या..डोळ्यापुढे अंधारी आल्यागत होऊ लागले अन उदरा मध्ये मोठा खड्डा पडत चालला आहे..शरीरातील सारे त्राण निघून जात आहे असे त्यास जाणवू लागले..शरीरातील सारे जीवानं सत्व कुणी तरी शोषून घेतल्याच्या संवदनाने अग्नि मित्र अस्वस्थ झाला..हे काय होत आहे आपल्याला? त्याला उमजेनासे झाले ..घशास कोरड पडू लागली व जीव हि घाबरा झाल्यागत वाटू लागले..
उठून बसू लागताच आपल्या शरीरात तेव्हढे हि त्राण नाही हे कळल्यावर तो घाबरला...जिवाच्या आकांताने तो तसाच उठून बसला..
शय्येवरून कसे बसे खाले उतरल्यावर हात पाय कंपन पावत आहेत २ पावले चालण्याची क्षमता गमावली असे त्याला जाणवू लागले...तो तसाच सारा जीव एकवटून पाणी पिण्या साठी गेला थरथरत्या हाताने त्याने पात्र उचलून पाण्याचे २ घोट घेतले अन त्याला बरे वाटू लागले..तसाच तो गेला अन दिपाची वात पुढे सरकवली..शयन गृह उजळले..
बाजूलाच शय्येवर मालविका निद्रित अवस्थेत होती..चेहे~यावर एक तृप्तीच भाव होता.दिपाच्या प्रकाशात तिची कांती उजळन निघाली होती..
अग्नीमित्राला सार शरीर हलक वाटत होत..त्याची नजर आपल्याच हातावर गेली अन तो चमकला..हात वाळुन गेल्यागत झाले होते..कातडी सुकटलेली दिसत होती..भयाची एक लहर त्याच्या शरीरातून चमकून गेली त्याने डोक्यावरून हात फिरवला तर त्याला तिथे केस हाताला लागले नाही.. बाजूला असलेल्या दर्पणात त्याने नजर टाकली अन समोर एका ९० ला आलेल्या वृद्धाचे प्रतिबिंब पाहून तो घाबरला..आपण जख्ख म्हातारा झालेला पाहून अग्नी मित्र चकित झाला नजर मंदावली होती..शरीरात त्राण नव्हते.
हे कसे झाले?/कुणी व कशी केली आपली अवस्था? ह्या शंकेने तो अस्वथ झाला...काय करावे सुचत नव्हते.."मालविके" त्याने जोरात टाहो फोडला पण शब्द बाहेर येत नव्हते..
जिवाच्या आकांताने अन सर्व शक्तीने त्याने...मालविके..बघा आमची अवस्था..हा काय प्रकार आहे?..असे म्हणाला तिला विचारले .
आवाज ऐकून मालविकेने डोळे उघडले अन उठून बसली..मोकळा केश संभार सावरत ति तारुण्य गमावलेल्या म्हाता~या अग्नी मित्रा कडे बघत होती..
तिच्या नजरेत एक पिशाच्च व अघोरी भाव पाहिल्यावर अग्नीमित्र घाबरला..तिच्या चेहे~या वरचा मोहक भाव लुप्त होऊन एक अघोरी क्रूर भाव चमकत होता..
विकट हास्य करत ति म्हणाली ..का कंठशोष करीत आहेस मुढा? असे म्हणत ति भेसूर हास्य करू लागली...
तिचा भेसूर असा भाव पहाताच अग्नीमित्र गर्भ गळित झाला आपण आसुरी शक्तीचे सावज झालो आहोत हे त्याला उमगले..व क्रोध अनावर होऊन तो म्हणाला..
अगे चांडाळ कृत्ये तू कोण आहेस? अन माझी अशी अवस्था कशी झाली???
त्या कडे एक तिरस्काराचा कटाक्ष टाकत ति म्हणाली..मी कोण आहे ??मी कोण आहे?? मी ना देव ना मानव योनीतली स्त्री आहे मी पिशाच्च योनीतली कृत्या आहे..३०० वर्षे वय आहे माझे..व या प्रासादात माझा निवास असतो..तुझ्या सारख्या तरुणाचे तारुण्य शोषण केले की मला वर्षभर ते तारुण्य पुरते..गेली ३०० वर्षे मी अशीच माझे तारुण्य टिकवून आहे..आता पुढच्या पित्री अमावास्ये पर्यंत हे तारुण्य मला पुरेल..नंतर नवे सावज..धन्यवाद अग्नीमित्रा..ति हसत क्रूरपणे म्हणाली....
सारे ऐकून अग्नीमित्र मूढ झाला काय करावे ते समजत नव्हते क्रोध अनावर झाला होता..
अगे चांडाळ कृत्ये तुझा मी प्राण घेईन..असे म्हणाला पण अंगात शक्ती नाही असे त्याला जाणवले..पाऊल पण उचलवत नव्हते....
त्याच्या असाहाय्य अवस्थेवर मालविका भेसूर पणे हसत होती..
क्रोधाचा आवेग ओसरला अन अग्नीमित्र भानावर आला आपल्या अवस्थेची जाणीव झाल्यावर त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले..जीवनातले सारे काही गमावले होते..मन खिन्न व विषादाने भरून आले..
तो याचना युक्त स्वरात मालविकेस म्हणाला..अगे चांडाळ कृत्ये तुझे काम तर झाले आता मला या नरकातून मुक्त कर..एव्हढी तरी कृपा करशील ना?
पुढच्या अमावास्येपर्यंत जर असाच तरुण मिळाला तर व त्याच्या तारुण्याचे प्राशन मी केले की तू मुक्त होशील..
बाहेर जा पायरीवर तुला त्या देवदत्ताचे कलेवर दिसेल..तुझ्या मुळे तो मुक्त झाला...
जा अन त्या कलेवराची विल्हे वाट लावून ये..अन मुक्तीची याचना करीत बस..
भेसूर पणे हसत मालविका म्हणाली....

अशीच एक अमावास्येची रात्र होती मालविका कुणाची तरी वाट पाहतं होती अन बाजूला कथा नायक अग्नीमित्र मुक्तीची वाट बघत होता.
Avi