Friday, July 24, 2009

श्वास

श्वास

आठवते मला पहिलि भेट दोघांचि,
पटली ओळख तेंव्हाच युगा युगाचि.

भेटित पहिल्याच लाविलिस ओढ तू
तुझ्या सौंदर्याने कैद मजला केलेस तू

नेत्र शराबि,कुंतल रेशमी तुझे,
त्यात गुंतत गेले सारे जिवन माझे

घेता मिठित तुजला, मला स्वर्ग गावला
वेडा जिव माझा, तव वक्षावर विसावला

संसार वृक्षावर जरी खुलली फुले,
तरी अजुनहि तव मादक यौवन फुले,

जरी सहवासात एकमएकांच्या, अनेक वर्षे गेली
तरी गोडी प्रेमाची,कणभर कमी नाहि झाली.

तू सखि,प्रेयसी, बेस्ट फ्रेंड आहेस तु,
नाहि जगु शकणार ज्या शिवाय,
असा श्वास आहेस तू

ति रात्र पावसाळी

ति रात्र पावसाळी

कशि विसरु साजणे, ति रात्र पावसाळी
तुझि निथळति तनु,नुकतिच वयात आलेली

मल्मली कुंतलातुन होते ओघळत , पावसाचे पाणी
गो~यापान गालास चुंबित होते ,ते खट्याळ पाणी

चिकटली होति उरोजाला ,साडि फुला फुलांचि
सावरता साडिला ,तिरपिट उडाली होति सुंदरीचि

अधर थरथरत होते,काजळ पसरले होते,
थंडिमुळे नाजुक बदन, अवगुंठले होते

बघताना तुजकडे ,श्वास माझे थांबले होते
एका कटाक्षासाठी ,प्राण माझे आसुसले होते

जाता नजर मजकडॆ,तु लाजेने चुर झाली,
त्या अर्धोन्मिलित नजरेन ,पाण्यास आग लावली

जन्म जन्माचि ओळख ,तुलाहि पटली होति,
म्हणुन बघताना तु, गोडशी हसलीहि होति

शोधित होतो स्वप्नात ,ति तुच सुंदरी होति
जन्म जन्माचि माझि तु, सखि प्रेयसी होति
Avinash