Friday, October 19, 2007

धुंद होते लोचन

धुंद होते लोचन
धुंद भर्जरी यौवन
उठे मुक प्रेमगीत
लाडक्या तुझ्या प्रतिक्षेत

स्मर ती भेट युगांची
रात्र ति पौर्णीमेची
रत, रोहिणीत चंद्र्मा
रोहीणी गाली रक्तीमा

स्पर्शीतोस तनुस माझ्या
घसरतो उरीचा पदर
अन करतोस अवेगानें
लाल अधर ऒलसर


वक्षावर ठेवला माथा,
मन बेभान झाले,
तुझी मिठी जादुंची
अंग ऒलसर झालें.

माझ्यातली रति तु,
बेभान धुंद केली
माझ्याच गात्रांची मजला
नव्यानेच ऒळख झाली
Avinash.......

मी माझी न राहीले.

त्या प्रेमपुष्पाचे कामगंध,
या तनुत उतरले
शरदाचें चांदणे,
या तनुत विरघळले
स्पर्शीलेस तु मला,
अन मी माझी न राहीले.

मोकळ्या ह्या कुंतलास,
तु असे कुरवाळले
सुवासीत गंधाने,
आसमंत सारे दरवळले
स्पर्शीलेस तु मला,
अन मी माझी न राहीले

लांब सडक रेशमी कुंतल
रुळत होते मम वक्षावरी
सारुन दुर त्या कूंतलाना
तु लडीवाळांना छेडले
स्पर्शीलेस तु मला,
अन मी माझी न राहीले.

घेतले रेशमी मीठित जेंव्हा
अन ओल्या अधराला चुबिले
तुझे अधिर हावरे स्पर्श
मम गात्रा गात्रात विरघळले
स्पर्शीलेस तु मला,
अन मी माझी न राहीले.

कोमल कोवळी हि तनु
दान केली तव तनुला
मदनाचे कैक बेफाम समुद्र
या नाजुक देहात उधळले
स्पर्शीलेस तु मला,
अन मी माझी न राहीले

तुज्या पौरुषाने ह्या यौवनास जिंकले
स्पर्शीलेस तु मला,
अन मी माझी न राहील

Monday, October 15, 2007

सहाव्या इंद्रियाची देणगी

मुखाने प्रेमाचा गजर
तोंडाने मैत्रीचा गजर
तुझ्या तरुण देहावर
त्याची कामुक नजर

प्रेमाच्या हळुवार उपमा
रुपाच कौतुक सुंदर
करणा~या त्या जिभेवर
वासनेचे हजार थर

तिच्या तनुच्या गोलईवर
फिरतात लंपट डोळे
मायावि भुजंगच तु
डसण्या साठि जिव तळमळे

त्याच्या वांझोट्या मनांत
वांझोटे मैथुन चाळॆं

नकली त्या शपथा
खोटे वायदे त्याचे
वासनेच्या कामुक जगात
भोग सारे तनुचे

अजाण ति प्रेमवेडी
समजते हे खेळ प्रेमाचें
त्याला पुरते माहित
हे खेळ नर मादिचें

ति खेळांत या नवि
नविन हे प्रेम तराणे
काय माहित तिला
तुझें हे खेळ पुराणे.

समजतोस तु जीतकि
नाहि ति मुढ तरुणी
दिली निसर्गाने तिला
सहाव्या इंद्रियाची देणगी

निघालिस का म्हणुन
तिला काय विचारतो
ओळखतात तिचे डोळें
मनांतले तुझ्या
वासनेचे चाळें

निसटले तुझे भक्ष
नाकाम मायावि डोळे
चालु दे तुझ्या वांझोट्या मनांत
वांझोटे मैथुन चाळे
Avinash....

शरीर

वेदनेने पिचले शरीर
आस जिवनाची सरेना,
कोडग्या वासनांचे भोग
कोडगि नाळ तुटेना

हवे हवे ची आस
कधिच नाहि सरली
सार मिळाल तरी
झोळी फाटकीच राहीलि

किति भोगी जन्म सरले
कितिक मृत्यु पाहिले
जन्म मरणाचे कोडे
भोगि जिवा ना उलगडले

मृत्युच्या दारांत ऊभा,
भोगि जिवनाची आस
तुटता तुटेना,

Sunday, October 14, 2007

प्रेम गारुड

मन आज काबुत नाहि
मन झाले फुलांचे थवे
मन आज था~यावर नाहि
बरसते रसगंध नवनवे

तु जादुगर की प्रेम मांत्रिक
काय वशीकरण मंत्र टाकले
इतकी बडबडी,बोलकी मी
शब्द अधरातच कैद केले

काजळ नयनाची चेटुक विद्या
तुझ्यावर कशी नाहि चालली
काय केले तु प्रेम गारुड
माझि विद्या मजवर उलटली

सोसाट्याचा हा मदन वारा
मला पुरते उधळुन गेला
नाहि राहिले मी स्वत:ची
अस्तित्व माझे संपवुन गेला

तुझ्या अधिर त्या स्पर्शाने
कामभुल मला कशी पडें
केसांत फिरता तुझी बोटें
काये वरची लव थरथरें

तु काया प्रवेश करता
मी माझी कुठे राहिले
अर्पण करुन तुला सर्वस्व
तुझिच मी होवुन गेले.
Avinash..................

किनारा

समोर तु ,रतिचे रुप
एकदा पाहुन,मन भरेना

मनाला किति,आवरु सावरु
नजर वळते.पुन्हा पुन्हा

कमनिय देह,तारुण्याची साय
वक्षांचा उभार.चुरते नजर

कायेचा स्पर्श.स्पर्श कायेला
मिठी रेशमी,रेशमी गुंता

देहात काम,अंगास घाम
घामाचा वास,त्याचिच आस.

डोळ्यात माझ्या.कसले तुफान्
तुफानात् गलबत्.घायाळ् तांडेल्

ह्या तांडेलास्.तुझा सहारा
ह्या गलबतास् आता फक्त्...तुझा किनारा





पहिली ओळख

पहिली ओळख
श्रावण धारा
पहिली ओळख
शहारा,गारवा
पहिली ओळख
भिरभिरी नजर
पहिली ओळख
नचे मन मयुर
पहिली ओळख
भडभड, बडबड
पहिली ओळख
निशब्द शब्द
पहिली ओळख
नजरेस नजर देण
पहिली ओळख
नजर चोरण
पहिली ओळख
नजर झुकण
पहिली ओळख
गात्रांची जाणिव
पहिली ओळख
गलित गात्र होण
पहिली ओळख
जिव लाजला
पहिली ओळख
जिव जडला
पहिली ओळख
सुंदर स्वप्ने
सजलि सुंदर
मिटल्या नयनि

डोळे फितुर झाले

घेता मिठीत तुजला
क्षणभर अवाक झाली
अनपेक्षीत सारे तुजला
रागाने लाल झालि
चुंबिले तव अधर
गलति मोठि झाली
हळुच सोड्वित स्वत:ला
मिठीतुन दुर झाली
कृतक कोप हा ग
कळतो आम्हास राणी
खोटा राग तुझा
दांडगाइ तुला भावली
कसे कळले मला
चकित का झाली
डोळे फितुर झाले
त्यानिंच चहाडी केली

मी लगेच ओळखले

चेहेरा खुप खुलला होता
मी लगेच ओळखले
तो तिच्या प्रेमात होता

मी अचुक ओळखले,
प्रेम भंग झाला होता
हातात दारुचा ग्लास होता

भेटु नकोस तु

भेटु नकोस तु
अशी वेळी अवेळी
अशी नाजुक तु
सुगंधित कळी
ते मधाळ हसु
वर गालावर खळी
जिवन माझे
मुळापासुन उन्मळी

आव्हान

आज नजरेत आग पेटली आहे
झळ इथपर्यंत मला जाणवत आहे.

भुवईच धन्युष्य फारच ताणले आहे.
आज भलतीच फर्माइश दिसत आहे.

तनु वेलीस आज निराळा गंध आहे
निराळेच पुष्प उमलले दिसते आहे

यौवनात रसगंधाची उधळण आहे
प्राशण्यास आज रात्र अपुरी आहे.

मदन रस तनुत मिसळला आहे
रात्र जागवण्याचे शुभ संकेत आहेत.

आज रति सुखाचे आमंत्रण आहे,
आज पौरुषत्वाला आव्हान आहे

आभास

ह्या घरात तुझा
अशरीरी वावर आहे
चुलिवरुन ग तुझा
हात फिरत आहे.

हा भास आहे
की आभास आहे
कसे वळत नाहि
प्रवास एकट्याचाच आहे

अंघोळिस जाताना मी
टॉवेल विसरलो आहे
तु आणुन देशील
म्हणुन ओला उभा आहे.

मी मुलखाचा भोळा
अन विसर भोळा आहे.
पण तु नाहिस हे
कसे लक्षांत आहे.

कोणत्या जगात तु
कुणास ठाउक आहे
तुला भेटण्यासाठी सखे
देहाचा अडसर आहे



Monday, October 8, 2007

तोल माझा गेला होता.

रात्र चांदणी होति, अंधार माजला होता,
त्या रात्रीचे काय सांगु, पाय घसरला होता.

त्या काळ्या कुंतलात, शशि चमकत होता
नेत्र शांभवि पिताना,तोल माझा गेला होता.

सभ्य संयमीत मी, वक्षावर नजर घसरली
ढळला पदर तुझा, अन, नियतित खोट आली

हातात हात घेता,हात तु सोडवुन घेतला
भिति तुला वाटत होति, पण स्पर्श हवहवासा वाटला

मंद वारे वहात होते, शांत होते आसमंत,
रात्र होति वादळी, बदलले आपले विश्व

संपली रात्र केंव्हा, ना कळले तुला न मला
कळिचे फुल उमलले,ना कळले तुला न मला

ति रात्र वादळी होति , कि दोष माझा होता.
वाट निसरडी होति, पाय घसरला होता

मन वेडे तळमळते

मन वेडे तळमळते

त्या प्रेम पावसाने, अशी पुरती भिजले
आत अजुनहि जळते, नाहि मी विझले,

तुझी लाघवी लगट, आगळी वेगळी
आतुर तनु तुन रातराणी रे दरवळली

तु असा बरसला, मी चिंब ओलि चिंब
ते तुझे मदन चाळें, मी प्रेम सुखात दंग

चुकले सारे, सारे चुकीचे, मनांला कळते,
कोडगे हे शरीर,कशी आवरु,तिकडेच धावते

चुकले सारे, सारे चुकीचे, मनांला कळते,
पुन्हा तेच करण्यास, मन वेडे तळमळते

उधळुन जा

उधळुन जा

ये बाहु पाशात माझ्या
प्रेम प्रपातात भिजुन जा
ठेवलेस जे तु संभाळुन
आज ते तु उधळुन जा

हे योग्य आहे कि अयोग्य
शब्द छःल सारा, विसरुन जा
हा क्षण मोहाचा, मधाचा
अधराने तु टिपुन जा

तंग काचोळित साठ्वलिस तु
लाख मोलची ति दौलत
रात्र रसीलि मोहाची आहे,
तु दौलत जादा करुन जा

तु श्रुंगार वेडी, बेधुन्द बाला
तव रुपाने काळोख तेजाळला
तनुत रुतुराज वसंत लपला
रोमरोमात मदन वारा उसळला

हे रुप गर्विते, हे लडिवाळ चारुते,
हे मनमोहिनी,हे प्रेम रागिणी
मनि जे प्रेम वसते,
ते तु व्यक्त करुन जा
जे फक्त माझेच आहे,
ते मला अर्पुन जा

नाते जन्मो जन्मीचे

तुझे नि माझे अतुट नाते जन्मो जन्मीचे
बहरले ते सहजीवनि होते जे मैत्रीचे

तुझे नि माझे सुंदर नाते कमळ भ्रमराचे
रोम रोम मोहरुनि आले,जसे उमलले फुल कमळाचें

तुझे नि माझे सुंदर नाते चंद्र चकोरीचे.
पहाटे, गवतावरी चमकणा~या दवबिंदुचे

तुझे नि माझे सुंदर नाते मेघ-नभाचें
बरसले जे अवनिवरी टपोरे थेंब पावसाचें.

तुझे नि माझे सुंदर नाते उपवन-फुल पाखराचें
डोंगर दरीतुन वहाणा~या,जलाचे,जसे निर्झराचें

तुझे नि माझे सुंदर नाते उत्कट मुग्ध भावनाचे.
तरुवर पडल्या संधीप्रकाशी किरणांचे,जसे क्षितिजाचें.

Thursday, October 4, 2007

तु कोण आहेस माझा

तु कोण आहेस माझा

आल अधरातिल तु, मकरंद आहेस माझा
ह्या गात्रांत पेटलेला,वणवा तु आहेस माझा

चंद्र तु आहेस माझा,नयनातिल तारा तु माझा
मदन चाळे खेळणारा,सखा सौंगडि आहेस माझा

रेशमी कुंतलात दरवळणारा,कामगंध तु आहेस माझा
कर्ण पाकळीस छेडणारा,खट्याळ तु मीत माझा

त्या दिर्घ चुंबनातिल, थांबलेला श्वास तु
ओसरली प्रणय लाट,तरी तनुत उरलेली ओल तु

रेशमी काचोळीत बांधलेले, ते कोवळे यौवन तु
दिनरात मनांत गुंजणारे, लाजरे प्रेमगीत तु

टपो~या या नयनातिल, काजळाची रेघ तु
बिलगणारी वक्षास,मोत्याची नाजुक माळ तु

तु प्रेमसखा माझा, तु काम सखा माझा
नाहि जगु शकणार ज्याशिवाय,
असा श्वास तु आहेस माझा




तिने नुसते हसुन बघितले

तिने नुसते हसुन बघितले
आम्हि त्यालाच प्रेम समजलो
त्या नयन बाणांनि घायाळ होऊन
शर पंजरी आडवे झालो

त्या मन मोहक अदांनी
घायाळ मन मोहरुन गेले
बर कडक उन हि अम्हाला
शितल चांदणे भासु लागले.

त्या तुझ्या देखण्या यौवनावर
लावण्याची आरास होति
आमच्या प्रत्येक श्वासा संगे
नावांची तुझ्या जपमाळ होति

ति हसुन जरा बोलली,
आम्हि त्यालाच प्रेम समजलो
हृदय घायाळ, जिवाची तळमळ,
उमेदिचें दिवस वाया घालवुन बसलो....

असा तुझ्यात गुंतत गेलो

असा तुझ्यात गुंतत गेलो
मला कधि कळलेच नाहि

रेशमी केंसात अडकुन बसलो
सुटवेसे कधि वाटलेच नाहि

उष्टाविताना ति अधर पाकळि
जिव्हा युध्धात पराभुत झालो

तो किति गोड पराभव
हरण्यास पुन्हा तयार झालो.

त्या गंध भारल्या मिठित
मी असा पुरता उन्माळलो

त्या नशिल्या डोळ्यांत हरवलो
नाहि भानावर अजुन आलो

त्या किति अनंग गोष्टी
ते वेडे मदन चाळें

त्या लाघवि काम दाहात
होरपळुन मी संपुन गेलो