Monday, October 15, 2007

सहाव्या इंद्रियाची देणगी

मुखाने प्रेमाचा गजर
तोंडाने मैत्रीचा गजर
तुझ्या तरुण देहावर
त्याची कामुक नजर

प्रेमाच्या हळुवार उपमा
रुपाच कौतुक सुंदर
करणा~या त्या जिभेवर
वासनेचे हजार थर

तिच्या तनुच्या गोलईवर
फिरतात लंपट डोळे
मायावि भुजंगच तु
डसण्या साठि जिव तळमळे

त्याच्या वांझोट्या मनांत
वांझोटे मैथुन चाळॆं

नकली त्या शपथा
खोटे वायदे त्याचे
वासनेच्या कामुक जगात
भोग सारे तनुचे

अजाण ति प्रेमवेडी
समजते हे खेळ प्रेमाचें
त्याला पुरते माहित
हे खेळ नर मादिचें

ति खेळांत या नवि
नविन हे प्रेम तराणे
काय माहित तिला
तुझें हे खेळ पुराणे.

समजतोस तु जीतकि
नाहि ति मुढ तरुणी
दिली निसर्गाने तिला
सहाव्या इंद्रियाची देणगी

निघालिस का म्हणुन
तिला काय विचारतो
ओळखतात तिचे डोळें
मनांतले तुझ्या
वासनेचे चाळें

निसटले तुझे भक्ष
नाकाम मायावि डोळे
चालु दे तुझ्या वांझोट्या मनांत
वांझोटे मैथुन चाळे
Avinash....

No comments: