Friday, October 19, 2007

मी माझी न राहीले.

त्या प्रेमपुष्पाचे कामगंध,
या तनुत उतरले
शरदाचें चांदणे,
या तनुत विरघळले
स्पर्शीलेस तु मला,
अन मी माझी न राहीले.

मोकळ्या ह्या कुंतलास,
तु असे कुरवाळले
सुवासीत गंधाने,
आसमंत सारे दरवळले
स्पर्शीलेस तु मला,
अन मी माझी न राहीले

लांब सडक रेशमी कुंतल
रुळत होते मम वक्षावरी
सारुन दुर त्या कूंतलाना
तु लडीवाळांना छेडले
स्पर्शीलेस तु मला,
अन मी माझी न राहीले.

घेतले रेशमी मीठित जेंव्हा
अन ओल्या अधराला चुबिले
तुझे अधिर हावरे स्पर्श
मम गात्रा गात्रात विरघळले
स्पर्शीलेस तु मला,
अन मी माझी न राहीले.

कोमल कोवळी हि तनु
दान केली तव तनुला
मदनाचे कैक बेफाम समुद्र
या नाजुक देहात उधळले
स्पर्शीलेस तु मला,
अन मी माझी न राहीले

तुज्या पौरुषाने ह्या यौवनास जिंकले
स्पर्शीलेस तु मला,
अन मी माझी न राहील

No comments: