Saturday, July 28, 2007

तुझ्या प्रतिक्षेत


धुंद होते लोचन
धुंद भर्जरी यौवन
उठे मुक प्रेमगीत
लाडक्या तुझ्या प्रतिक्षेत

स्मर ती भेट युगांची
रात्र ति पौर्णीमेची
रत, रोहिणीत चंद्र्मा
रोहीणी गाली रक्तीमा

स्पर्शीतोस तनुस माझ्या
घसरतो उरीचा पदर
अन करतोस अवेगानें
लाल अधर ऒलसर


वक्षावर ठेवला माथा,
मन बेभान झाले,
तुझी मिठी जादुंची
अंग ऒलसर झालें.

माझ्यातली रति तु,
बेभान धुंद केली
माझ्याच गात्रांची मजला
नव्यानेच ऒळख झाली

Monday, July 23, 2007

देहदाह शमवुन जा.


देहदाह शमवुन जा.
सुगंधी श्वासांत श्वास तु मीसळुन जा
मखमली गालावर,अधरांनी प्रेमखुणा ठेवुन जा.
रसाळ अधरावर तुझे ,नाव तु कोरुन जा
ह्रुदयात जी लावली, ति आग तु विझवुन जा.

त्या कटाक्षानें तुझ्या,गात्रें सारी उमलली,
कवेत घेतलेली तनु,लाजेन चुर झाली,
मधाळ चुंबनाने जो देह सारा पेटला,
चंदनी स्पर्शाने तो दाह शांत करुन जा

शराबी डोळे,स्पर्श गहिरा,धुंद प्रितीचा,
उठले काहुर,लागली हुरहुर, ति मिटवुन जा,
दाटले तारुण्य माझे,त्या रेशमी काचोळीत,
वक्षावर त्या,अनंगाचा ठसा उठवुन जा.

फुलले, बहरले यौवन,देह सारा जाळते,
देहात मिसळुनी देह, देहदाह शमवुन जा.
ह्रुदयात जी लावली, ति आग तु विझवुन जा.
d

Sunday, July 22, 2007

आठवते का तुला,

आठवते का तुला,
तुझी नि माजी प्रित
जेंव्हा जमली होति
कॉलेज ची गोंगाटान भरलेली
इमारत पण,स्वप्तसुरांत रंगली होती,

आठवते का तुला,
माझ्या होंडाच्या मागे
मला गच्च पकडुन बसली होति
तुझ्या केसांची गंध सुरा
सा~या शरीरात भिनली होति,
मन बेभन झाल होत
कारण तुझ्यावर माझि प्रित होति

आठवते का तुला,
आवेगान मिठीत घेउन
दिर्घ चुंबन घेतल होत,
रागान लाल झाली होति,
पण मग त्याचिच
गोडी तुला लागली होति
सारच मस्त वाटत होत, आठवते का तुला,
मल्टीप्लेक्स मधे सिनेमाला
आपण दोघे गेलो होतो
खर्चाचा रुक्ष हिशेब तु जुळवत होति
पण लो जिन मधुन डोकवणारी
जी स्ट्रिंग मला साद घालत होति
बघताना भान हरपल होत,
कारण तुझ्यावर माझि प्रित होति

आठवते का तुला
माझ्या रुम वर तु यायची
अन रेशमी विळखा तु घालायची
देहात गुंतता तुझ्या,
रात्र तशीच वितळत होती
सार भान हरपायाच,
कारण तुझ्यावर माझि प्रित होति

आठवते का तुला
आपली पहिलि भेट
काय माहित तुला स्मरते की नाहि
मला कायम आठवते..
जिवनातली सुंदर घटना होती
कारण तुझ्यावर माझि प्रित होति
कारण तुझ्यावर माझि प्रित होति

Thursday, July 19, 2007

मधु शर्वरी....



रिमझिम पावसात उगवली पहाट
घेउन संगे मृदगंध,
दारी निशीगंध बहरला अन
दरवळे धुंद धुंद,
ओढुन पदर लज्जेचा नभाआड,
लपली ति शुक्र चांदणी,
पर्ण फुलांवर दवबिंदु भासतसे,
मोतीयाची गोंदणी.
तुझ्यासवे रंगवाया पहाट ही,
झाले अधीर हे मन.
तु तर पण झोपेत तृप्त,
शांत निद्राधीन.
रात्रीच्या निशब्द प्रहरी,
किति खेळ तु खेळला,
अन सकाळी कवितांचा
गजरा तु बांधला.
कळले गुपीत मजला,
अशा पहाटेच्या उत्तर प्रहरी,
तु तर चंद्रमा, अन
मी तुझी मधु शर्वरी....

Wednesday, July 18, 2007

दिसलास तु, उमले यौवन

दिसलास तु, उमले यौवन
हसलास तु, लाजले नयन.

अवेग प्रीतिचा,तनुत मोहरे
गंध पसरवे, यौवन वारे.

रोम रोमात रे फुलतो फुलोरा
देहात उसळे, बेभान वारा

जाळते तन, धुंद चांदणे,
घे मिठीत, हेच मागणे,

अधरा वरती तु लिहिले ते
गुपित आपले अधरी जपते

मिठीत तुझ्या हि तनु विरघळते
श्वासांत मीसळता श्वास, नयन मिटते,

देहास आलिंगता देह,मी एकरुप होते,
अर्पिते मी तुला ,जे तुला हवे ते.

Thursday, July 12, 2007

उखाणा



उखाणा
तुझा ढंग निराळा हसण्याचा
मनांत कल्लोळ शतरंगी स्वप्नांचा.

झुरतेस तु मजसाठी वेडी,
यौवन गंधाने केली हि चहाडी,

तु मधाळ हसता, प्रीत हसे,
फितुर डोळे,गुपीत राखील कसे,

जरी हि अठी ,सखे तुझ्या भाळी,
गुलाबाचा रंग पण चढलाय गाली,

सोड हा सखे, लटका प्रतिकार
खुलतो राग चेहे~यावर,मनोहर,

विचारतेस मनाला, हेच प्रेम असे?
अन ऎकता हे वसंत,तनुमधे हसे,

प्राशु दे मकरंद, तव अधराचा,
मग सुटेल उखाणा,तव यौवनाचा,

ये मिठीत,दे चुंबन तु मजला,
मिळतील उत्तरे, प्रेम प्रश्णाची तुजला

जे शब्द अधरावरती थबकले,
उमटले तनुवर, बनुनी नखक्षतांची फुले.

Tuesday, July 10, 2007

बांगडी
रात्र यौवनत, आग लोचनी,
अबोल चंद्रमा,धुंद चांदणी,
घाई तुझी मुलखाची वेडी,
धरलास हात,अन पिचली की बांगडी
अविनाश:
================
तुझ्या मधाळ सहवासात
यौवनाची मीठी होती,
कुणास शुध्ध होति की
दिवस होता की,रात्र होती

Sunday, July 8, 2007

सायुज्य

सायुज्य
तु तनांत, तनांत,
तु मनांत, मनांत,
तु काजळाची रेघ,
माझ्या टपो~या, नयनांत, नयनांत.

तु तनांत, तनांत,
तु मनांत, मनांत,
तु डंखतोस रे,
माझ्या रसाळ ऒठास,ऒठास,

तु तनांत, तनांत,
तु मनांत, मनांत,
गंघ होऊन दरवळतोस,
माझ्या काळ्याभोर केंसात,केंसात.

तु तनांत, तनांत,
तु मनांत, मनांत,
कुरवाळतोस रे तु,
माझ्या रेशमी यौवनांस, यौवनांस,.

तु तनांत, तनांत,
तु मनांत, मनांत,
लपलास रे तु
माझ्या रेशमी देहात,देहात.

तु माझ्या, देहात,
तु माझ्या, मनांत,
मी तुझ्या मनांत
सायुज्य रे आपले
ह्या जन्मात.सात जन्मात,जन्मात

Saturday, July 7, 2007

,नजर खाली झुकते.



काय बोलु, कस बोलु, लाज वाटते,
बघता तुजकडे,नजर खाली झुकते.

यौवनात मी,देहात रानवारा उफाळे पिसाट
यौवानाच्या उधाण लाटा,उसळती अफाट,
थरथरे देह माझा,घे जवळ प्रियकरा,
जादुई स्पर्शाने, शमव हा पीसाट वारा.

प्रीतिचा रंग मम ह्र्दयी फुलला रे
फुटल्या डाळिंबाचा रंग गालवर पसरला रे.
मोग~याचा गजरा माळला केसांवरी,
कशी बघु, मी मेली, मुलखाची लाजरी.

गोरेपान यौवन.घातली काचोळी काळी,
तुच धर हात, अन, घे मजला जवळी,
कैफ चढला प्रीतिचा,आग लागले उरी,
स्पर्श सुखा आसुसले हे, यौवन बिलोरी,

घे रे चुंबन,टिप, अधरातील मकरंद,
चुंब नग्न देह,मग उरेल, आनंद,आनंद.
देहात विरता देह,श्वासात श्वास मिसळला
ह्या प्रणय वेडीने, तो प्रणय क्षण अनुभवला.

काय बोलु, कस बोलु, लाज वाटते,
बघता तुजकडे,नजर खाली झुकते.
तो प्रणय आठवता, जिव वेडावतो,
आठवणीने नुसत्या,सारा देह मोहरतो

Friday, July 6, 2007

ह्रुदय हे तुडवु नको



धुंद नजरेन अशी,रोखुनी बघु नको,
चालताना तु सखे, ह्रुदय हे तुडवु नको.

झुळुक मंद वा~याची
त्यास साथ मदनाची,
रुपाला आज बहर.
जोडीला धुंद ही नजर

केश संभार घनदाट
त्यात तारुण्य बेफाट,
काय धुंद हा सुवास,
यौवनगंध भीने मनात.

मोग~याचा माळला गजरा,
थबकतात तिथे या नजरा,
आज थाट असे निराळा
जीव करी वेडाखुळा

रुप असे हे रतीचे,
मादक शराबी तारुण्याचें
तु तर नाजुक चाफेकळी
की मस्त लावण्याची कळी,

काचोळीची घट्ट गाठ
मागे गोरीपान पाठ,
उरोज कुंभ आत लपले,
पहाण्यास नयन आतुरले.

माळला गजरा,काय हा नखरा,
नजर लागेल ना,दृष्ट होइल ना,
धरीला मी तुझा,सखे हात हातात,
हा रांगडेपणा ,क्षम्य असे प्रेमात.

धुंद नजरेन अशी,रोखुनी बघु नको,
चालताना तु सखे, ह्रुदय हे तुडवु नको