Sunday, November 23, 2008

मधहोश हि हवा

मधहोश हि हवा

मधहोश हि हवा,धुन्द करते जिवा
चोरटा स्पर्श तुझा ,वाटतो हवा हवा

घेतले रे मिठित, चमकुन गेलि दामीनि
रान वारा उफाळला, या बिलोरी यौवनि

प्रणयाचे शत रंग ,पसरले सारे अंबरी
उमलली सुगंधीत हि, कोवळी कळी बावरी

अंग अंग गात्रांग,प्रीत रंगी नहाले
नेत्री आनंद आसवे,देहि चांदणे झळाळे

स्पर्श हावरे,कुजबुजशी कानी ,अनंग कथा
दाटते तारुण्य, ठेविशी जसा, वक्षावर माथा

ऎकता अनंग कथा,सहन होईना मदन चाळे
त्या काम दाहात, शरीर नाजुक होरपाळले

तु रमता धुंद यौवनि ,मी तुझीच रे झालें
नाहि नाहि म्हणता तुला, सर्वस्व अर्पिलें
अविनाश........

Wednesday, November 5, 2008

तरी मैत्रीण का आवडे मला ती?

चेह~यावर रेशमी बटा रुळती
का इतकी सुंदर दिसते ती?

धवल गुलाबी साडि नेसति ति
जणु गुलाबास पाकळ्यात लपेटति ती

बोलायचा प्रयत्न जरी केला मी
तरी सारखि बिझि का असते ती?

कधि ड्रेस,कधि जिनटॉप वापरे ती
पण साडित अति सुंदर दिसते ती

किति गोड कविता लिहिते ती,
त्यात दुखा:चे रंग का भरते ती?

भेटलो नाही कधी तिला मी
तरी ओळखिची का वाटते ती ?

नाहि जरी दोन शब्द बोललो मी
अनामीक ओढ का लावते ती?

खुप गुढ वागणे आहे तिचे जरी...
तरी मैत्रीण का आवडे मला ती?