Saturday, February 14, 2009

तिच्या आठवणीने

तिच्या आठवणीने

तिच्या आठवणीने
आजहि मी aमोहोरतो
सहवासातला एक एक क्षण
अजुनहि मला आठवतो

रेशमी कुंतलातला
गंघ मनि दरवळतो
आठवता अधरांचे विभ्रमी चाळे
जिव सखे हरपतो

सावर जरा पदर
वक्ष बाहेर डोकावतो
त्यावर मी गोंदलेले कामदंश
नजर माझी खेचतो

तु केलेल्या प्रेमगीतात
मी सप्त सुर भरतो
तु केलेली कविता
अजुनहि मी गुणगुणतो

आठवते त्या दिवशी उपवनात
मी अधरावर दंतव्रण केला
दुखेल दुखेल म्हणून
फुलांनि किति गलका केला

रात्री झोप नाहि आलि
खुप त्रास झाला
तुझ्या डोळ्यावर साजणे
ऊगीच आळ आला

नाहि मी गेलो दुर
तुझ्या पासुन प्रिये
तुझ्या नाजुक ह्रुदयात
अजुनहि मी धडधडतो

मी शतजन्म घेतले

मी शतजन्म घेतले

मिस्किल हास्यावर तुझ्या ,मी फिदा जाहले,
ते बोलणे ऎकता ,कसे रे मंत्रमुघ्ध झाले
तुझ्या प्रेमात साजणा ,मी वाहुन गेले
तुझ्यासाठीच साजणा ,मी शतजन्म घेतले

स्वप्नात रोज माझ्या ,कोण भेटुन गेले?
कोण अशी वेडी ,चुट्पुट लावुन गेले..
अधरावर कोण ,प्रेमगीत लिहुन गेले?
ते गुणगुण्या साठीच, मी शतजन्म घेतेलेले

स्मरता आपली भेट, अंग अजुनहि शहारलेले,
मीळता नजरेस नजर, श्वास माझे थांबलेले
सुर बासरीचे तुझ्या,मनांत माझ्या रेंगाळलेले
ते ऎकण्या साठी साजणा,मी शतजन्म घेतेलेले

आठवणींचे देहात, लक्ष सागर उसळले
आठवता छबि तुझी, नाजुक तनु उन्मळे
कुठे शोधु तुला,मीच तुझ्यात हरवले
शोधण्यास रे मी शत जन्म घेतलेले

तु माझाच,मी तुझी,हे त्यानेच इछ्छिलेले
मिलन आपुले हे,विधिलिखित लिहिलेले
घातलिस तु साद अन मन बावरे झाले
तुला भेटण्या साठीच,मी शतजन्म घेतेलेले

तो प्रेमदंश असा,प्रेम अमृत तनी भिनले
जाहला रिता तु,अन मन तृप्त होऊन गेले
गर्भात माझ्या साजणा, तुझे बिज अंकुरले
फुलवण्यास त्याला मी शतजन्म घेतेलेले

अविनाश

तू"

तू"

रेशमी सुगंधात माझ्या होऊनि सुगंध दरवळतोस तू
कुरळ्या बटावर माझ्या होऊनि वारा ऊनाडतोस तू

टपो~या डोळ्यात माझ्या,होऊनि काजळ राहतोस तू
गो~या भाळावरी माझ्या होऊन बिंदि विराजतोस तू

लाल अधरावरी माझ्या ,होऊनि गीत गुणगुणतोस तू
गळ्यात माझ्या होऊनी मोतियाची माळ सजवतोस तू

रंगी बेरंगी चुड्यात माझ्या होऊनि सप्तरंग उतरतोस तू
पायातील पैजणात माझ्या होऊन घुंघरु निनादतोस तू

गो~या तनुवर माझ्या होऊनी घननिळ बरसतोस तू
रोम रोमात माझ्या होऊनी निशीगंध बहरतोस तू

हळव्या ह्या मनांत माझ्या होऊनी बेधुंद लहरतोस तू
ह्रुदयातिल स्पंदनात माझ्या होऊनी सप्तसुर झंकारतोस तू

आवि्नाश

गध्धे पंचविशी

गध्धे पंचविशी

गध्धे पंचविशी
ते दिवसहि कसे मंतरलेले होते
ति वेळ हि तशी वेडीच होति
तु विशीतली कोवळी कळी होति.
माझीहि गध्धे पंचविशी चालु होति

तुझ्या घराच्या वा~या नित्य कर्मकांड असे
दर्शनासाठि तुझ्या नेत्र आसुसलेले असे.
तुझ्या प्रेम कटाक्षाने दिवस कारणी लागत असे
जळि स्थळि सखे तुझिच मुर्त मज दिसे

तुझ्या सहवासाचि साजणे ओढ असायची
हातात हात घालुन मीरवण्याचि हौस असायची
दिवस होता कि रात्र याचि फिकिर नसायचि
रखरखित दुपार हि कोजागिरीचि रात्र वाटायचि

तु देखणी अन माझ्यात तारुण्याचा जोश होता
दोघांच्याहि मनात नेमका तोच विचार होता
मन संस्कारित, म्हणुन संयमाचा बांध होता
तरी पहिल्या चुंबनाचा नशा काहि और होता

होंडा बाईक,अन तु माझी दिलोजान होति
हिंडा फिरायचि तुलाहि फार हौस होति
मागे तारुण्याचि घट्ट मिठि घालुन घालायची
उरोज स्पर्शाने माझि कानशिले वाफाळायची


आठवले कि अंगावरची वर्षे गळून पडतात
तनास अन मनास तारुण्य पालवि फुटते
आठवते ते दिवसहि तसे मंतरलेले होते
ति वेळ हि तशी वेडीच होति
तु विशीतली कोवळी कळी होति.
माझीहि गध्धे पंचविशी चालु होति

avinash

सौंदामीनि....................

सौंदामीनि....................
घेतलि मिठित जिला ति
साक्षात मेघ दामिनि होति
मिठित कमिनि नव्हे हो
ति सळसळति नागिण होती

रक्तवर्णी ते अधर होते
रुधिर गरम उष्ण होते.
काया कापुर झालि होति
मिठित धगधगति आग होति.

शशी समान चेहेरा होता
नयन नक्षत्रांचा पहारा होता
नयनात चेटुक गारुड होते,
काळिज निकामी झाले होते.

मधाळ यौवनचि मिठि होति
किसे खबर दिन या रात्र होति
वेळ तर कयामत चि च होति
मिठित सुवर्णरंगी आग होति

माहित होते मित्रांनो आम्हाला
ति विज आम्हा जाळणार होति,
पण काहि तक्रार नव्हति आमचि
ति परमसुखचि तर नांदि होति.