Saturday, February 14, 2009

मी शतजन्म घेतले

मी शतजन्म घेतले

मिस्किल हास्यावर तुझ्या ,मी फिदा जाहले,
ते बोलणे ऎकता ,कसे रे मंत्रमुघ्ध झाले
तुझ्या प्रेमात साजणा ,मी वाहुन गेले
तुझ्यासाठीच साजणा ,मी शतजन्म घेतले

स्वप्नात रोज माझ्या ,कोण भेटुन गेले?
कोण अशी वेडी ,चुट्पुट लावुन गेले..
अधरावर कोण ,प्रेमगीत लिहुन गेले?
ते गुणगुण्या साठीच, मी शतजन्म घेतेलेले

स्मरता आपली भेट, अंग अजुनहि शहारलेले,
मीळता नजरेस नजर, श्वास माझे थांबलेले
सुर बासरीचे तुझ्या,मनांत माझ्या रेंगाळलेले
ते ऎकण्या साठी साजणा,मी शतजन्म घेतेलेले

आठवणींचे देहात, लक्ष सागर उसळले
आठवता छबि तुझी, नाजुक तनु उन्मळे
कुठे शोधु तुला,मीच तुझ्यात हरवले
शोधण्यास रे मी शत जन्म घेतलेले

तु माझाच,मी तुझी,हे त्यानेच इछ्छिलेले
मिलन आपुले हे,विधिलिखित लिहिलेले
घातलिस तु साद अन मन बावरे झाले
तुला भेटण्या साठीच,मी शतजन्म घेतेलेले

तो प्रेमदंश असा,प्रेम अमृत तनी भिनले
जाहला रिता तु,अन मन तृप्त होऊन गेले
गर्भात माझ्या साजणा, तुझे बिज अंकुरले
फुलवण्यास त्याला मी शतजन्म घेतेलेले

अविनाश

No comments: