Wednesday, December 19, 2007

कुठे तु रात्र रंगवली


दुर हो माधवा, आता का माझी सय आली?
माहीत आहे मला ,कुठे तु रात्र रंगवली

तुझी वाट पहात पहात , मी रात्र जागवली
तिच्या बाहुपाशात, माझी आठवण नाहि ना आली?

श्वांसातुन तुझ्या, माधवा, पारीजात गंध परीमळे
ओळखलेत मी तुझे, रुखमीणी महालातले चाळें

रात्र पुनवेची होति, वर साथ सवतिची अशी...
तु असा माधवा ,बरा तिला असा सोडशी?

नको करुस मखलाशी,नको पटवु मज,
लाज नाहि आली, चुरता तिचा ऊरोज,

अरे मनमोहना, रमला असशील असा तिच्या तनुत,
जसा भ्रमर , रमे,रातभर लाल कमल पुष्पात,

पहा हे रेशमी, काळेभोर, कुंतल दाट काळे
हे लाल अधर, अन हे मन मोहक चाळे,

मार प्रेम डंख, या लाल अधरावर माधवा.
कर मम जिवन धन्य ,सख्या माधवा..

खेळ माधवा , रात्रभर खेळ रास झुल्याचा,
चुर सारे अंग अंग, बेभान खेळ ,हा सा~या गात्रांचा.

तु महान, तत्ववेत्ता,तत्व मला काय कळे माधवा ?
पण अद्वैताचे तुझे तत्व , पण,मला कळले रे माधवा

अविनाश

सांता क्लॉज

नाताळ मधे खुप मजा असायची
रात्री मोजा लावायाचो
अन सकाळी उठल्यावर मज्जाच मज्जा
सांता चॉकलेट्स,खाउ, खेळणी द्यायचा
खुप मजा यायची,
मग बाबांना विचारायाचो.....
बाबा सांगाना, कुणी दिला हा खाऊ? खेळणी?
सांता आला होता, तुला आवडतात म्हणुन दिलि.....बाबा
मग मला का नाहि जाग केले?.....
सांता म्हणाला त्याला झोपु द्या...बाबा म्हणाले.
सांता कधिच भेटला नाहि
एका नाताळला मोजा लावला
अन हसत बसलो...
काय रे लबाडा का हसतोस? बाबा..
बाबा मला सांताची गंमत कळाली आहे..
सांता बिंता काही नसतो..
बाबा च खाउ,खेळणी आणुन ठेवत असतात..हसत म्हणालो
चला आमचा बाळ मोठा झाला..बाबा हसत म्हणालें
मी बाबाकडें बघतच राहिलो.???
"अरे ज्या दिवशी तुम्हाला कळत ना
कि सांता बिंता काही नसतो.
त्या दिवसा पासुन तुमच बाल्य संपलेल असत"
बाबा हसत म्हणाले...

अविनाश.....

अधुरी प्रेम कहाणी

अधुरी प्रेम कहाणी
का पुन्हा पुन्हा मी शोधते
त्या भुत काळातल्या वाटा.
का दु:ख्ख करुन घेते.
जेंव्हा पायी रुततो काटा

बसता अशा कातर वेळी
कानी कोण गुणगुणे गाणी?
झोंबताना ह्या कोवळ्या तनुस
कोण करते भलतिच मागणी?

ज्याने ह्रुदयास पीडा दिली
तोच कसा ह्रुदयी बसला?
कोवळ्या मम तनुस छेडुन
यौवन कसे जागवुन गेला.

कसा मी विसरु त्याला
तो मम रोम रोमात भिनला
सारखा तो आठवतो का?
जो जखमा देवुन गेला

तुझि लागलेली हि आस
हा भास कि आभास आहे
तु आता माझा नाहि
हे मज का उमगत नाहि?

केंव्हा सरेल ति माझी
काळरात्र घनघोर अंधारी?
कधि उजाडणार मम जिवनी
ति पहाट सोनेरी?

काय सांगु काय बोलु
मन माझे था~यावर नाहि
दाटुन येते निर नयनि
लिहिताना अधुरी प्रेम कहाणी

अविनाश...

Tuesday, December 11, 2007

क्षमा कर मला,

क्षमा कर मला,तुझ्याबरोबर सहजिवनाची स्वप्ने पाहिली.
मी पण तुला माफ करते, हि सारी स्वप्ने तोडल्या बद्दल

क्षमा कर मला, मी न केलेल्या चुकां बद्द्ल
मी पण तुला माफ करते तु केलेल्या असंख्य चुकाबद्द्ल

क्षमा कर मला,तु मला खुप देखणा वाटायचा.
मी पण तुला माफ करते,मी तुला कायम साधारण वाटले.

क्षमा कर मला,मी तुला ह्रुदय सिहासनावर बसवण्याची चुक केली.
मी पण तुला माफ करते,मला पायदळी तुडवल्या बद्दल

क्षमा कर मला,तु बरोबर असावास असे वाटत होते..
मी पण तुला माफ करते, तु मला कायम टाळल्याबद्द्ल

क्षमा कर मला,तु भेटला नाहि तर मला कसेचेस व्हायचे
मी पण तुला माफ करते,तुला काहिच फरक पडायचा नाहि.

अविनाश

झोपला का ग?

झोपला का ग?

तेंव्हा आमच घर लहान होत.
वन बेडरुम, किचन..
बेडरुम मधे बेड भिंतिला लागुन होता
मी त्यावेळी ३-४ थीत असेल
बाबा भिंतिच्या बाजुला, मी मधे,आई कडेला ,अस झोपायचो.
झोपल्यावर आई कडेला ठेवायची मला..
मी रात्री जाम झोपायचो नाहि..
ति मांडिवर घेउन दामटुन झोपवायची..
सारखे दोघेपण झोप झोप करायचे...
उद्या सकाळी शाळा आहे अस म्हणायची
मधुनच बाबा झोपला का ग? म्हणायचे..
झोपतोय.. आई म्हणायची,"लहान आहे ना, दमतो"
मी मानांत हसायचो....
मला माहित होत ते मला सारख झोप झोप का करतात ते.....

अविनाश....

Saturday, December 1, 2007

रतिरुप मी

रतिरुप मी
माझा मदन तु

अधिरलेला तु
संकोचलेली मी

तु मुळाक्षरे
अनंग गीत मी

वेचण्या सज्ज तु,
बहरलेली मी.

व्यक्त तु
अव्यक्त मी

बेभान तु
अनभिद्न्य मी

लाल अधरकमल मी
तो भ्रमर तु

आलिंगन तु,
यौवन मी.

तु नाभी कमल
मी कस्तुरी.

प्रश्ण तु,
उत्तर मी

तु पुरुष
प्रकृति मी

मी तुझी
माझा तु.

मी मनांत तुझ्या.
तु तनांत माझ्या

किति त्रास देतेस मजला

किति त्रास देतेस मजला
काहिच सुचु देत नाहि
प्रिये तु समोर अशी उभी
कवितेस विषय सुचत नाहि

लांब रेशमी कुंतळ काळे
ओल्या अधराचे चंचल चाळें
मोहक नयनांच्या त्या कोंदणी
उमलली जणु शुक्राची चांदणी

मुर्तिम्ंत् सौंदर्य ,तु लावण्यमुर्ती
विश्वामित्रास हि चळ भरे
तव सहवास आम्हास लाभला
मम गत जन्मीचे भाग्य खरे.


इतके गुंतणे ठीक नाहि
लोक बघ कुजबुजु लागले
त्यातले काहिजण तर आम्हा
तुलसी दास म्हणु लागले

मारलीस रेशमी मीठी मजला
अनंगास्त्रानी मजवर वार करे
लिहि गीत,अन् ऎकव मजला
अन अशी वर फर्मा‌इश करे

सांग कसे लिहु गीत सखे
हात उरोज छेडण्यात गुंतले.
सांग कसे गा‌उ गीत सखे
अधर चुंबनात गुंतले

सावरताना रेशमी कुंतल

सावरताना रेशमी कुंतल
आत गंध कोण भरते?

लाज~या टपो~या नयनांत
कोण काजळ होऊन बसते?

नेसताना रेशमी वसने,
अवति भवति कोण दरवळते?

कोरे करकरीत मन माझे,
त्यावर प्रेम गीत कोण लिहिते?

मनांतले बोलायचे ठरवते,
दिसता छबि, का मुग्ध होते?

काल भेटलेला वाटसरु तु
जन्म जन्मीचा सखा का वाटे?