Wednesday, December 19, 2007

कुठे तु रात्र रंगवली


दुर हो माधवा, आता का माझी सय आली?
माहीत आहे मला ,कुठे तु रात्र रंगवली

तुझी वाट पहात पहात , मी रात्र जागवली
तिच्या बाहुपाशात, माझी आठवण नाहि ना आली?

श्वांसातुन तुझ्या, माधवा, पारीजात गंध परीमळे
ओळखलेत मी तुझे, रुखमीणी महालातले चाळें

रात्र पुनवेची होति, वर साथ सवतिची अशी...
तु असा माधवा ,बरा तिला असा सोडशी?

नको करुस मखलाशी,नको पटवु मज,
लाज नाहि आली, चुरता तिचा ऊरोज,

अरे मनमोहना, रमला असशील असा तिच्या तनुत,
जसा भ्रमर , रमे,रातभर लाल कमल पुष्पात,

पहा हे रेशमी, काळेभोर, कुंतल दाट काळे
हे लाल अधर, अन हे मन मोहक चाळे,

मार प्रेम डंख, या लाल अधरावर माधवा.
कर मम जिवन धन्य ,सख्या माधवा..

खेळ माधवा , रात्रभर खेळ रास झुल्याचा,
चुर सारे अंग अंग, बेभान खेळ ,हा सा~या गात्रांचा.

तु महान, तत्ववेत्ता,तत्व मला काय कळे माधवा ?
पण अद्वैताचे तुझे तत्व , पण,मला कळले रे माधवा

अविनाश

No comments: