Monday, January 21, 2008

तुझी ओढ लागे, असा जीव नादावला

तुझी ओढ लागे, असा जीव नादावला
तुझाच ध्यास, राजसा लागे मनाला.
रातराणीचा कामगंध,तनुत या उतरला
मदनाचे कैक बाण, ह्या ह्रुदयात घुसले.
स्पर्शीलेस तु मला,अन मी माझी न राहीले......१

जशी निळाइ व्यापे, सा~या नभाला
तुझा भास व्यापे रे, माझ्या मनाला
मोकळ्या ह्या कुंतलास,तु असे कुरवाळले,
सुवासीत गंधाने,आसमंत सारे दरवळले
स्पर्शीलेस तु मला,अन मी माझी न राहीले.....२

सडा लाल रंगाचा अधरावर घातला
भासे जणु करंडा, कुंकवाचा लवंडला
लांब रेशमी कुंतल,रुळत होते वक्षावरी
सारुन दुर कूंतलाना,तु यौवानास छेडले
स्पर्शीलेस तु मला,अन मी माझी न राहीले......३

जसा चुंबीशी राजसा, मम अधराला
मदन लाट व्यापे, ह्या कोवळ्या तनुला
घेतले रेशमी मीठित,अन अधरास चुंबिले
तुझे अधिर स्पर्श,गात्रा गात्रात विरघळले
स्पर्शीलेस तु मला,अन मी माझी न राहीले......४

कोवळी हि तनु,अर्पीली तव तनुला,
अन तनुत माझ्या तु अलगद विरघळला
मदनाचे कैक समुद्र,नाजुक देहात उसळले
तुझ्या पौरुषाने ह्या सौंदर्यास जिंकले
स्पर्शीलेस तु मला,अन मी माझी न राहीले......५

Avinash................

दिसलास मला तु,

अल्हाद वसंती संधी प्रकाशी कसे सांगु कुणा
दिसलास मला तु, उमदा अन देखणा

झालि भेट नजरांची,त्यात होता उत्स्फुर्तपणा
खटयाळ हास्य मीशीतले तुझे, होता मीश्किलपणा

अशाच भेटि घडत गेल्या,त्यातही होता सह्जपणा
घेतलास ठाव मम ह्रदयाचा, भावला तूझा स्वच्छंदीपणा

मी माझी राहीलेच नव्ह्ते, सरला होता रीतेपणा
नयनी तुझ्या हरवुन बसले, माझ्यातील मी पणा

प्रेम भावनांनी घेतला ताबा, होता तो बेधुंदपणा
भाळले तुझ्या हास्यावर, आवडला तुज, माझा वेडेपणा

दिलेस मुर्तरुप आपल्या नात्याला, अनुभवला अद्वैतपणा
नभीच्या चांदण्या सामावल्या ऒंजळीत माझ्या,
गवसला स्वर्गीचा ठेंगणेपणा......

अविनाश

शेवटच स्टेशन

रेल्वे गाडित खचाखच गर्दी होति.जिव गुदमरला होता..
एकदाची सुटली...१-२ स्टेशन वर थांबली..
काहि आत आले काहि बाहेर गेले...एका मुलान बसायला जागा दिली...
आरामात बसलो,गाडिन वेग घेतला.गाडी लयात धावत होति..
खिडकीतुन गार वारा येत होता...कधि डोळा लागला कळाले नाहि..१

स्वप्न कि काय कळेना..एक घर दिसल,माझच होत..
बरेच लोक जमले होते,मित्र होते ,नातेवाइक होते.
आत गेलो तर, हि कोप~यात रडत बसली दिसलेली,बायकांच्या घोळक्यात.
काय प्रकार कळेना,जमीनिवर कुणीतरी झोपले होते..
नाका कानांत कापसाचे बोळे,अंग पांढ~या कपड्यान झाकलेल...
त्यावर हार, गुलाल,जवळ जावुन पाहिल अन,हबकलोच
तो मीच होतो..खाडकन जागा झालो..पाहिल तर गाडी थांबलेली होति...२

डबा मोकळा होता..खाली उतरलो,अंग हलक,डोक जड झाल होत..
बाहेर अंधार होता..प्लॅटफोर्मवर शुक शुकाट होता..
कुठे आलो कळत नव्हते, कुठल स्टेशन आल समजत नव्हत..
समोर स्टेशन मास्तर उभा होता..त्याचा चेहेरा पण निट दिसत नव्हता..
मास्तर कुठल स्टेशन आल?..विचारल अन डोळ्यासमोर अंधारी आली..
बाजुच्या बाकावर बसलो..काहिच उमजत नव्हत.
"काका शेवटच स्टेशन आहे, गाडी पुढे जाणार नाहि..प्रवास संपला..
बस एवढच ऎकु आल..........३
Avinash.................

Matrix

मॅट्रिक्स...[Matrix]

तु एक चैतन्यमय,अथांग मन,ना आदि ना अंत,
तु स्वयंभु उर्जा स्रोत,मनात तुझ्या विचार अनंत

अनंत कोटी ब्रह्मांडाची रचना करतो,लागे क्षणाचाच वेळ
निर्मीति करणे अन,लय करणे,हा तुझा आवडता खेळ

अतर्क्य,अगम्य,गुढ चमत्कारीक स्वभाव तुझा,न लागे मेळ,
ब्रह्मांडा तल्या उलटा पालटी म्हणजे ,सारे तुझ्या मनांतले खेळ.

मनातच निर्माण केले हे ब्रह्मांड तु,मधे पडदा टाकला Matrix चा, मायेचा
दिले आव्हान आम्हाला, शोध मला,माझे अस्तित्व,खेळ तुझा, डोक्याबाहेरचा.

तुझ्या Matrix मायेची जादु अशी, सारे आज्ञानी "ज्ञानी" झाले
मीथ्या जग सत्य समजु लागले,आणि तुला मिथ्या ठरवण्यास पुढे सरसावले.

जिथे हरते बुध्धी,ज्ञान,तिथुन तुज कडची वाट सुरु
हा प्रांत ना बुध्धीचा,अनुभुतिचा, सांगतात तिथले वाटसरु

धन्य ते पाहिले तुला ज्यांनी,तो अलोक,तो ओंकार,संपला त्यांच्यातला "मी"
विचारले कसा आहे "तो" कोण आहे "तो" तर हसुन म्हणतात... अहं ब्रम्हास्मि , अहं ब्रम्हास्मि

Avinash...........

भुकेचा आग डोंब

दुपारचे १२.३० वाजुन गेले होते..ति जिना चढत होति.
ऊन मी म्हणत होते..पोटात भुकेचा आग डोंब उसळला होता
कालपासुन अन्नाचा एक कण पोटात नव्हता..
राजादादाला २ महिन्याची जेल झाली अन तिचे दिवस फिरले.
तो जेल जाण्या आधी हप्त्यातन ३ वेळा तरी यायचा..पैस पण बरा द्यायचा.
तो सुटलाय अस कानावर आल होत..ति वाट बघत होति त्याची.
गिऱ्हाईक येत नव्हत...धंदा होत नव्हता...उधारी झाली होति..
कुणीच उधार द्यायला तयार नव्ह्त..घरवालीला पैसे मागयची सोय नव्ह्ती..
२हजार रु अंगावर होते...ति चिडुन म्हणली की..धंदा कर अन पैसा मिळव
नसल जमत तर भिक माग..हा भाकड गुर पोसायचा पांजर पोळ नाय ...

वर आल्यावर ति शांत बसली..भुकेमुळें काहि सुचत नव्हत..
भुक असह्य झाल्यामुळे ति पाणी प्यायला उठली अन समोर राजादादा उभा
"गोदे..सकाळीच सुटलो अन तुझ्याकडच आलो.२ महिने जेल मधि..
बाईच नख बि बघायला नाय मिळाल..लय आंग ताठलय..ताव आलाय..
लई भुक लागलीय..रातभर कच्चा खाणार तुला...."

ति बघतच होति...
दोघाना कडकडुन भुका लागल्या होत्या.
दोन्हि भुका शरीराच्या होत्या..
फक्त भुकेची जात निराळी होति...

"अर..२ दिवस झाला अन्नाचा कण पोटात नाय,
चा, भज्जी पाव,मिसळ पाव मागव..माझी भुक भागव
मग मी तुझी भागवते..."भुकेन तिला त्याच्या मिठीत चक्कर आली....

अविनाश.......

लग्न करुन तु सासरी गेली आहेस

तु मी अन ममा, आपला ग्रुप होता..
त्यात आपल्या दोघांचा Secrete groupहोता.
आता आपला ग्रुप फुटला आहे,
कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस
तुझ्या नव्या जगात तु रमली आहे..

तुझ्या रुमच्या दारावर लावलेल पोस्टर
It is my Mess and i Love it
पलंगावर पुस्तके उघडी, कपडे पडलेले,
बाजुला ड्राईंग बोर्ड,त्या वर ड्राईंग शीटसचे भेंडोळे
कॉंम्प चालु, अन त्यात तुझा अभ्यास चालु
ममान तुला पसाऱ्या बद्दल दटावणे,मग चिडचिड,
मी हळुच तुझी बाजु घेणे.."सासरी काय होईल देव जाणें"
तिच पुट्पुटणे....आता सार शांत आहे...
कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस
तुझ्या नव्या जगात तु रमली आहे..

तुझ्या कॉलेजची अन मी कारखान्याला जाण्याची एकच वेळ..
मग, ति सकाळची मरण घाई..माझ्या नकळत अंघोळीला जाणे.
१५-२० मिनीटे बाथरुम अडवणे..माझी चिड्चीड..आता फक्त आठवणी
कामावरुन दमुन आलो की..Whatzzz up dad..How was the day विचारण...
रात्री जेवण झाले कि Long ride ला जाण....... मग त्या कॉलेजच्या गमती सांगण..
पी.जे..ऎकविण..ति बरीस्ता कॉफि पिणे...ह्या साऱ्या आठवणी..
कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस
तुझ्या नव्या जगात तु रमली आहे..

तु म्हणजे घरातल आनंदाच कारंज होत..थुइथुइ उडणार..
आता तुझ्या मैत्रीणीचा थवा येत नाहि..चिवचिवाट नाहि..
तुझी रुम शांत आहे..पुस्तके कपाटात.कपडे पण घडी करुन.
ड्रॉईंग बोर्ड भिंतिला टेकुन उभा..कोपऱ्यात गणपती बाप्पा ध्यानस्थ
टेडी बिअर, आणी स्टफ टॉइज पलंगावर बसलेली, तुझी वाट बघत..
फ्रीज मधल्या दुधाच्या पिशव्या,अन बोर्न व्हिटाचा डबा तसाच..
कारण दुध पिणारी माऊ अमेरिकेला गेली आहे.
आम्हाला आठवण येते..पण आम्हि पण खुष आहोत..
कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस
तुझ्या नव्या जगात तु रमली आहे..

Avinash..................

Sunday, January 20, 2008