Monday, January 21, 2008

Matrix

मॅट्रिक्स...[Matrix]

तु एक चैतन्यमय,अथांग मन,ना आदि ना अंत,
तु स्वयंभु उर्जा स्रोत,मनात तुझ्या विचार अनंत

अनंत कोटी ब्रह्मांडाची रचना करतो,लागे क्षणाचाच वेळ
निर्मीति करणे अन,लय करणे,हा तुझा आवडता खेळ

अतर्क्य,अगम्य,गुढ चमत्कारीक स्वभाव तुझा,न लागे मेळ,
ब्रह्मांडा तल्या उलटा पालटी म्हणजे ,सारे तुझ्या मनांतले खेळ.

मनातच निर्माण केले हे ब्रह्मांड तु,मधे पडदा टाकला Matrix चा, मायेचा
दिले आव्हान आम्हाला, शोध मला,माझे अस्तित्व,खेळ तुझा, डोक्याबाहेरचा.

तुझ्या Matrix मायेची जादु अशी, सारे आज्ञानी "ज्ञानी" झाले
मीथ्या जग सत्य समजु लागले,आणि तुला मिथ्या ठरवण्यास पुढे सरसावले.

जिथे हरते बुध्धी,ज्ञान,तिथुन तुज कडची वाट सुरु
हा प्रांत ना बुध्धीचा,अनुभुतिचा, सांगतात तिथले वाटसरु

धन्य ते पाहिले तुला ज्यांनी,तो अलोक,तो ओंकार,संपला त्यांच्यातला "मी"
विचारले कसा आहे "तो" कोण आहे "तो" तर हसुन म्हणतात... अहं ब्रम्हास्मि , अहं ब्रम्हास्मि

Avinash...........

No comments: