Monday, January 21, 2008

शेवटच स्टेशन

रेल्वे गाडित खचाखच गर्दी होति.जिव गुदमरला होता..
एकदाची सुटली...१-२ स्टेशन वर थांबली..
काहि आत आले काहि बाहेर गेले...एका मुलान बसायला जागा दिली...
आरामात बसलो,गाडिन वेग घेतला.गाडी लयात धावत होति..
खिडकीतुन गार वारा येत होता...कधि डोळा लागला कळाले नाहि..१

स्वप्न कि काय कळेना..एक घर दिसल,माझच होत..
बरेच लोक जमले होते,मित्र होते ,नातेवाइक होते.
आत गेलो तर, हि कोप~यात रडत बसली दिसलेली,बायकांच्या घोळक्यात.
काय प्रकार कळेना,जमीनिवर कुणीतरी झोपले होते..
नाका कानांत कापसाचे बोळे,अंग पांढ~या कपड्यान झाकलेल...
त्यावर हार, गुलाल,जवळ जावुन पाहिल अन,हबकलोच
तो मीच होतो..खाडकन जागा झालो..पाहिल तर गाडी थांबलेली होति...२

डबा मोकळा होता..खाली उतरलो,अंग हलक,डोक जड झाल होत..
बाहेर अंधार होता..प्लॅटफोर्मवर शुक शुकाट होता..
कुठे आलो कळत नव्हते, कुठल स्टेशन आल समजत नव्हत..
समोर स्टेशन मास्तर उभा होता..त्याचा चेहेरा पण निट दिसत नव्हता..
मास्तर कुठल स्टेशन आल?..विचारल अन डोळ्यासमोर अंधारी आली..
बाजुच्या बाकावर बसलो..काहिच उमजत नव्हत.
"काका शेवटच स्टेशन आहे, गाडी पुढे जाणार नाहि..प्रवास संपला..
बस एवढच ऎकु आल..........३
Avinash.................

No comments: