Monday, July 28, 2008

घनदाट गर्द रेशमी केशसंभार..

घनदाट गर्द रेशमी केशसंभार..
काजळ नक्षी त्या टपो~या नेत्रास,
तनुत रातराणीची अशी मादक दरवळ
मदमस्त,असे यौवन रंगाचि उधळण

नजर, कधि लाजरी, कधि नाचरी
रतिरुप,नखशीकांत तु लावण्य मुर्त
वाकलेली लज्जेने तु अबोध रमणी
रुप चमके,जशी नभी शुक्रचांदणी

वसने ,गर्भ रेशमी अंगी ल्याली
तव उरास काचे ,भर्जरी काचोळी
देहात रानवारा,उसळे उधाण लाटा
गालास खळी,अशी तु लावण्यकळी

अबोल पौर्णीमा, अन धुंद चांदणी
जवळ श्रुंगार वेडी,बेधुंद रागीणी
मुग्ध कुजबुज अन चोरटी अलिंगने,
नाचति वक्षावर, चकोर मंडले बेभान

रोम रोम नशेने फुलले,श्वासात श्वास भिनले..
एक मेकाच्या सहवासात राणी,बहरुन यौवन आले