Thursday, October 10, 2013

वामन..राणी व भैरव बाबा



३ बॆडरुम च्या ब्लोक मधल्या एका प्रशस्त बेडरुम मधिल बेड वर वामन तळमळत पडला होता.
गेले सहा महिने झाले असतिल वामन ला अर्धांग वायुचा झटका आला.. अन वामनचे आयुश्य बदलुन गेले..
बायको कावेरी तर मागच्या वर्षीच देवाघरी गेली होति...अन वामन एकटा पडला होता
वामन राव रिटायर्ड झाले होते एका कंपनितुन..
खर तर त्याना कंपनी सोडतच नव्हति वय ६३ झाल तरी त्यांच्या अनुभवाचा उपयोग कंपनिला हवा होता..
वामन कंपनिचा म्यानुफॅक्चरिन्ग डिरेक्टर..साधा ईंजिनिअर म्हणुन कामाला लागला अन बुद्धिमत्ता व मेहनत यामुळे या पदावर पोहोचला.
पत्नी कावेरी बॅंक ऑफिसर होति..तिने पण आधिच व्ही आर.एस घेतली होतिच...
एकुलता एक मुलगा प्रणव अमेरिकेत लग्न करुन तिकडेच रहात होता एक गोड नातु पण वामन ला होता.
वामन मुळचा बेळगावचा..बेळगावला ७ एकर जमीन व चौसोपी वाडा वडलोपार्जित वाडा होता..जमीन विश्वासु कुळ कसत होते १/३ हिस्सा त्याला बिन बोभाट मिळत होता..
वाड्यात वडिलांचा एक जुना स्नेहि होता तो रहात होता व वाड्याची देखभाल करत असायचा..
वामन ने पैसे व्यवस्थित गुंतवले होते त्या मुळे उतार वयात पैशाची काळजी नव्हति..
तसेच जवळ मोठी रोकड पण होति..शिवाय कावेरिची पेन्शन व डिपोसिट्स होतिच मदतिला..कारण तिच्या मृत्यु नंतर पेन्शन त्यालाच मिळत होति
रिटायर्ड झाला कावेरी गेली अन तिच्या मृत्यु नंतर ३ महिन्याच्या आत त्याला हा झटका आला..सारे होत्याचे नव्हते झाले..पैसे होते..घर होते पण प्रकृतिने दगा दिला होता..सारा दिवस व रात बिछान्यावर काढण्याची शिक्षा त्याला देवाने दिली होति..
नाहि म्हणायला राणीचा एकमेव आधार होता..राणी म्हणजे बाजुच्या वस्तित रहाणारी २२-२४ वर्षाची तरुणी तिला आई बाप नव्हते म्हातारी मावशी होति त्या दोघी रहात असत..
राणी वामन चे सारे करत होते वामन पण तिला महिन्याला १० हजार इतका घस घशित पगार देत असे..तसेच एक बेडरुम पण तिला वापरायला दिलि होति..
ति रातच्याला तिथेच रहात असायची..राणी मनातुन खुश असायची.काम कमी पगार भरपुर वर रहायला जागा..
एक मालिश वाला यायचा रोज तो मालिश करायचा..आपण बरे होवु असे वामन ला वाटत नव्हते पण तो मालिश करुन घ्यायचा..
मालिश वाला मात्र आपण लोकाना कसे मालिश ने बरे केले याच्या गप्पा वामनल ऐकवायचा...वामन ला कळत होते त्याचे मिटर चालु होते व रहावे म्हणुन तो बडबड करत असे पण वामन ला पैशाची काळजी नव्हति..
"साहेब चहा अन पेपर"..राणीने चहा व पेपर सकाळीच आणुन बाजुच्या टेबला वर ठेवला..
वर्तमान पत्रे,..टीव्ही न कधीमधी नेट हा च दिनक्रम वामन चा होता..वामन खुप निराश झाला होता मनातुन..मरण पण येत नव्हत..सार असह्य झाल होत..
४-५ स्टांडर्ड वर्मना पत्रा बरोबर वामन "मुक्तानंद" नावाचे एक छु वर्तमान पत्र पण घ्यायचा..मजेमजेच्या बातम्या त्यात असत..मजा यायची वाचताना तेव्हढाच टाईम पास..
वामन ने मुक्तानंद उघडले व वाचत असताना एका जाहिरातिने त्याचे लक्ष वेधुन घेतले..
"लकवा..बहिरेपण कॅन्सर..हार्ट..कुठला हि रोग २ दिवसात मंत्र व तंत्र शक्ति द्वारे बरा करतो..
ईछ्युकानी लाभ घ्यावा..चमत्कारी भैरव बाबा मोबाईल न........."
वामन जाहिराताला हसला पण दुसरे मन त्याला म्हणाले..प्रयत्न करायाला काय हरकत आहे??
त्या वर पहिले मन म्हणाले वामना वेडा आहेस का? तु इंजिनिअर अन असल्या भोंदु बाबा वर कधिपासुन विश्वास ठेवायला लागलास?
दुसरे मन म्हणाले कदाचित होवु पण शकते..ट्राय करायाला काय हरकत आहे?? तुझ्याकडे गमवण्या सारखे आहेच काय??जमले तर सारे ठिक होईल..
विचाराच्या द्वंदात शेवटी वामन ने फोन करायचा ठरवले अन फोन लावला..
"नमस्कार बाबा मी वामन बोलत आहे"
"जय भैरवा..बोल बेटा काय तकलिफ आहे??बाबा महणाला..
"बाबा मला अर्धांग वायुचा झटका आला आहे बिछान्यावरुन हालु शकत नाहि.." वामन
’काळजी नको करुस भैरवाच्या कृपेने खडखडीत तुला बरे करेल हा बाबा..हो पण पुजा व मंत्र क्रिया कर्म याचा खर्च रुपये ३ लाख ईतका आहे.ते पैसे तयार ठेव.."बाबा तिकडुन म्हणाला..
"काय ३ लाख??" वामन जवळ जवळ ओरडलाच.."ओरडु नकोस तुझ्या जिवा पेक्षा तुला ३ लाख जास्त वाटतात? मग मर असाच खिचपत बेडवर अन घेवुन जा ते ३ लाख तुझ्या बरोबर मेल्यावर... मुर्ख माणसा" बाबा तिकडुन कडाडला..
वामन घाबरला व नरमाईच्या स्वरात म्हणाला ठिक आहे बाबा उद्या मी ३ लाख तयार ठेवतो..पण घ्यायला तुम्हाला घरी याव लागेल...मी असा अपाहिश व एकटा"
बाबा नी विचार केला अन म्हणाले ठिक आहे मी उद्या दुपारी ४ च्या सुमरास येतो पण व्हिसिटिंग चार्जेस ५ हजार वायले द्यावे लागतिल..
चालेल म्हणत वामन ने बाबाला घरचा पत्ता दिला..
सकाळीच वामन ने आपल्या विश्वासु मित्रास ३ लाखाची कॅश काढावया सांगीतली..व तो बाबा ची वाट बघत बसला..
वामन ला स्वताचे हसु येत होते..आपण हे काय करतो आहोत? आपल्या बुद्धिवर झापड तर आली नाहि??
४ वाजता दारावरची बेल वाजली गेली अन राणीने दरवाजा उघडला अन बाबा ला वामन च्या बेड रुम मधे आणुन सोडले व बेडरुम चा दरवाजा लावुन घेतला.
नमस्कार..वामन बाबा ना म्हणाला बाजुची खुर्ची ओढत त्या वर भैरव बाबा स्थानापन्न झाले..
बाबा चागला ५-९ उंच होता..डोळ्यात व चेहे~यावर एक गुढ असा भाव होता..
प्रति नमस्कार करत बाबा ने वामन कडे पाहिले अन ते ध्यानात गेले..
अरे बालका तुम्हावर कुणी तरी ईडा पिडा केली आहे म्हणुन तुझी अशी अवस्था आहे>>बाबा म्हणाले..
म्हणजे? वामन ने विचारले..असो राहु देत त्याची काळजी आम्हि घेण्यास समर्थ आहोत..त्या ईडापिडाला उचलुन टाकु अन तुला पुर्ण बरे करु..बाबा म्हणाले..
वामना तुला वाटत असेल आम्हि सारे पैशासाठी हे करतो पण तसे नाहि..असे म्हणत बाबानी जवळची पिशवी वामन कडे दिली..
व बाबा म्हणाले बघ आत काय आहे ते?? वामन ने पिशवित पाहिले अन तो चकित झाला आत १००० व ५०० ची बंडले होति..साधारण १२ लाख तरी असतिल पिशवित...
भैरवाच्या कृपेने आम्हाला काहि कमी नाहि..
वामन काहिच बोलला नाहि व त्याने ३ लाख रुपये बाबा कदे सुपुर्द केले व हात जोडत म्हणाला बाबा आमचे काम करा..
काळजी नको..आता निट ऐक..आज शुक्रवार आहे रविवारी अमावास्या आहे रात्री १२ वाजता आम्हि पुजा घालणार आहोत..तुझ्या साठी..तुला झोपेत काहि तरी चमत्कारी संवेदना होतिल शरीरा मधे पण घाबरु नकोस..सोमवारी उठशिल तर तु बरा झालेला असशिल..अगदी फुट बॉल खेळु शकशिल...बाबा म्हणाला..
आणी हो एक महत्वाची सुचना रविवारी रात्री घरी कुणीच नको तुझ्या शिवाय..त्या मुलिला जर ति इथे रहात असेल तर घरी जाण्यास सांग..घरात तु एकटाच हवा..
बरा झाल्यावर महत्वाचे म्हणजे याची वाच्यता प्राण गेला तरी कुणाकडे करायची नहि.. व मला इथुन पुढे संपर्क करायचा नाहि.." समजले?? आणी जर आमच्या आदेशाचे पालन झाले नाहि तर आज आहेस त्या पेक्षा वाईट अवस्थेत तुला जावे लागेल..
बाबाच्या बोलण्यात एक जरब होति डोळ्यात अघोरी भाव होता...
वामन हो म्हणाला ."ठिक आहे मी निघतो" असे म्हणत बाबा गेले...
रविवारी राणीला त्याने घरी जाण्यास सांगीतले..साधारण ७ च्या सुमारास राणी गेली. जेवणाचे ताट तिने बेडच्या बाजुच्या टेबलावर ठेवले होतेच..
जाताना राणी दरवाजा ओढुन गेली..
रात्री जेवण झाले अन वामन च्या डोळ्यावर झोपेची झापड आली व तो निद्रेच्या आधिन झाला....
साधारण १-१.३० च्या सुमारास त्याला शरीरात काहि विचित्र हालचाली जाणवल्या पण झोप इतकी गाढ होति कि त्याला नेमक काहि कळलच नाहि..
सोमवारी वामन जागा झाला तेंव्हा सकाळचे ९ वाजायला आले होते..त्याला विलक्षण हलके वाटत होते.त्याने पाय हलवले अन पाय हलत आहेत पाहुन तो आनंदला.तसाच उठला .थकवा जाणवत होता..तो उठुन उभा राहिला अन चकित झाला त्याला उभे रहाता येत होते..२ पावले चालला पण थकवा जाणवत होता...
तो चकित झाला बाबा नी चमत्कार केला होता,,दारावर बेल वाजली वॅकर घेवुन तो चालत गेला अन दरवाजा उघडला मालिशवाला आला होता..
वामनला उभा पाहिल्यावर मालिश वाला चकित झाला अन संधी साधत तो म्हणाला"साहेब मी म्हणालो नव्हतो मालिश ने तुम्हाला गुण येणार"..
वामन नुसता हसला..मालिश वाल्याला क्रेडिट द्यायला त्याची काहिच हरकत नव्हति..
२-३ दिवस जेवण मालिश..व आनंदी मन यामुळे वामन घरात हिंडु फिरु लागला...तो बरा झाला होता,,अन त्याला आठवण झाली ति राणीची..गेले ३-४ दिवस राणी आली नव्हति..त्याने राणीला फोन लावला पण नॉट रिचेबल होता..अजुन २ दिवस वाट पाहिली पण राणीचा पत्ता नव्हता,,वामन अस्वस्थ झाला त्याच्या कडे तिचा साधारण पत्ता होता..विचारत विचारत तो ति वस्तित पोहोचला...राणीच्या घराजवळ आला बाहेर वृद्ध मावशी बसली होति,,वामन तिला म्हणाला "५-६ दिवस झाले राणी आली नाहि..फोन पण लागत नाहि..कुठे आहे राणी?" मावशिन आत बोट दाखवली आतले दृश्य पाहिले अन वामन हादरला..राणी बिछान्यावर पडली होति तोंडावरुन वार गेल्याने तोंड वाकड झाल होत..्ति बोलायचा प्रयत्न करत होति पण बोलता येत नव्हत.."काय झाल राणीला??"वामन म्हणाला "कर्म आमच..रविवारी रात्री राणी किंचालली अन सकाळी पहतो तो तिच्या कमरेला लकवा मारलेला..व तोंडावरुन वार गेलेल..पोरिला उठता येत नाहि ना बोलता येत नाहि" मावशी म्हणाली..डॉक्ट्रर येवुन गेला..बघु..पोरिच्या काय नशिबात आहे ते."
वामन घाबरला अन एका शंकेने तो अस्वस्थ झाला..व त्याने काढता पाय घेतला..
घरी आल्यावर तो विचार करु लागला..त्याने ओळखले आपली इडापिडा काढुन बाबाने राणीवर टाकली होति..व त्या मुळे राणीची अशी अवस्था झाली..तो अस्वस्थ झाला..
वामन ला बरे व्हायचे होते पण बाबा असे काहि करेल त्याला वाटले नव्हते..
त्याने ठरवले बाबाला गाठायचे भले ५ लाख खर्च झाले तरी चालेल पण राणीला बरे करायचे..त्याने तो"मुक्तानंद"चा पेपेर काढला व जाहिरात पाहिली पण तो चकित झाला जाहिरात गायब होति..त्याला आठवले फोन..त्याने डायल्ड लोग मधे बघातले फोन न आठवत नव्हता पण शेवट्चे ४ अंक ८८८८ आठव्त होते..पण तो फोन नंबर पण गायब होता..
वामन ला आठवले ही सारी बाबाची किमया होति..तो अस्वस्थ झाला वामन ला काहि सुचेना अपराधी पणाची भावना मनात बळवली..
त्याने निर्णय घेतला व तो बेळगावला हवा पालट साठी गेला..एका महिन्यात त्याच मन शांत झाले व तो पुण्याला आला..आल्यावर त्याने आडुन आडुन चौकशी केली व त्याला कळाले राणी वारली होति.व त्या धक्क्याने मावशी ने पण प्राण सोडला होता..
आज वामन सुखि व शांत व निरोगी जिवन जगत आहे मधुन त्याला राणीची आठवण येते..रोज तो मुक्तानंद मधे जाहिरात पहात असतो..
पण भैरव बाबाचा मजकुर जाहिरात व पत्ता त्याला मिळला नाहि....
सत्य हे कल्पने पेक्षा भयानक असते हेच खरे...

Sunday, October 6, 2013

सर्कस



मी ५वी -६वी त असेल
गावात सर्कस आली होति.
बाबांनि पैसे दिले होते 
आणी जायला परवांगी पण..
मी खुशीत होतो.
वर्गातले २-३ मित्र येणार होते बरोबर.
वाड्यातले जोशी अण्णांचा मी पेट..
आम्हि खुप गप्पा मारायचो..
काय आज फर खुष..अण्णा..
सर्कस जाणार आहोत..मीत्रांबरोबर..मी..
व्वा मजा आहे...अण्णा..
अण्णा तुम्ही बघितली ???..
हो गेल्याच वर्षी.मजा असते...अण्णा..
सांगाना..अण्णा...मी.
अरे मला झोपाळ्यावरचे खेळ खुप आवडतात.
त्यात त्या लांड्या स्कर्ट घातलेल्या मुली 
ह्या झोक्यावरुन त्या झोक्यावर कोलांट्या मारत जातात..
खुप मजा येते..तो खेळ सुरु झाला 
की मी दुर्बीण लावुन बघायचो...आण्णा 
माझा चेहेरा एकदम पडला..
काय झाल? अण्णा..
पण आमच्या कडे दुर्बिण नाही..मी
अरे तु लहान आहेस. सध्या तसच बघ...
मोठा झाला की दुर्बिण लावुन बघ..
त्या वेळी नेमक दुर्बिणीतुन काय बघायचे ते पण कळेल..अण्णा हसत म्हणाले...
हल्ली पेपर वाचताना सर्कस ची जहिरात बघताना अण्णा आठवतात
अन एकदम हसु येत.

साजुक तुपाचा शीरा



साधारण ४ थीत असेल त्या वेळी
शनिवार होता शाळा १/२ दिवस होति.
घरी आलो दप्तर ठेवल. हात पाय धुतले....
"अरे आपल्याला पारखी काकु कडे जायचय, समाचाराला..
तु चल माझ्या बरोबर....सोबत" आईन हुकुम सोडला
आम्हि दोघे निघलो पारखी काकुकडे,
अरे तुला पारखी काका माहित आहेत ना ते गेलेत.. आई
माझ्या फारस लक्षांत आल नाहि..
अरे समाचारला जायचे आहे...
तिथे शहाण्या सारख वागायच..आई....हो....मी
आम्हि दोघे काकुंच्या घरी आलो..
घरात शांतता..जमीनिवर पीठ सारवुन एक गोल त्या वर तेवता दिवा...
काकु कोप~यात शांत..कपाळ पांढर..
आईन त्यांच्या कडे पाहिल अन त्या रडायला लागल्या..
मी बघतच होतो..
"नका रडु..कहि आपल्या हातात असत का?.कस झाल?.आई म्हणाली
"काय सांगु?३- ३.३० ची वेळ असेल .... खुर्चीत पेपर वाचत बसले होते..मला म्हणाले ४ ला दुकानात जायच आहे..मला जरा शीरा कर खायला....काकु सांगत होत्या
आई ऎकत होति..काकु पुढे म्हणाल्या "अन मी शीरा केला साजुक तुपाचा अन शी~याची बशी घेउन आले अन म्ह्टले पेपर नंतर वाचा आधी हे खा...पण एक नाहि दोन नाहि..मग मी जरा हलवल तर पेपर हातातुन गळुन पडला अन...... काकु खुप रडायला लागल्या
मग आई पण जरा जवळ गेळी अन पाठीवरुन हात फिरवीत सांत्वन करु लागली.
काकु जरा शांत झाल्यावर म्हणाली "बहुतेक छातिचा रोग असेल"
"असेलहि... आमच कर्म..दुसर काय?..काकु म्हणाल्या.
जरा वेळान काकुंचा निरोप घेउन आम्हि निघालो
रस्त्यात हि आई डोळे पुसत होति...
मला एक प्रश्ण पडला होता.."शि~याच काय झाल असेल? मग तो शिरा कोणी खाल्ला असेल?????

avinash

Saturday, April 27, 2013

राघव



राघव गावाकडुन आलेला एक युवक.
इथे ईजिनिअर झाला अन एका कारखान्यात नोकरीस लागला.
हुशार व मेहनति असल्याने कारखान्यात जम बसला.
व मालकाची मदत व काहि घरुन मदत असे करुन त्याने वन रुम किचन चा एक ब्लॉक विकत घेतला.
जागा झाली अन लग्नाच्या तयारिला लागला. अन रेवति शी त्याचा विवाह संप्पन झाला..
रेवति दिसायला खुप सुंदर अशी तरुणी होति.
राघवला प्रष्ण पडायचा ह्या इतक्या लावण्यवतिने आपल्या सारख्या साधारण माणसाशी लग्न कसे व का केले असावे?
पण नव्हाळीचे दिवस होते..दोघेहि प्रेमात आकंठ बुडाले होते.
त्यामुळे तो विषय बाजु पडला.रेवति सुस्वभावि पण होति.
सुटी संपली अन राघव कामास रुजु झाला.
त्याच वेळी कंपनित कामाचा लोड वाढला व त्याला २ पाळ्यात काम करण्याच्या सुचना मिळाल्या
रात्रपाळीचा त्याचा पहिला दिवस होता..शिफ्ट संपली रात्रीचे साडेबारा वाजता तो घरी निघाला घरच्या ओढिने रस्ता भराभर मागे पडत होता.
सव्वा वाजता घरी आला अन बेल वाजवली दार उघडलेगेले अन राघव आत आला पण रेवति दिसली नाहि..
त्याने शुज काढले व वॉश घेतला ..
आत बेडरुम मधे आला तर रेवति शांत झोपलेली पाहिली ,,झोपेत किति छान दिसत होति..
अंगावर हात टाकत तिला जवळ घेतले तर..झोपु द्या हो..म्हणत तिने कुस बदलली ..
सकाळी राघव तिला म्हणाला कि रात्री दार उघडल्यावर तु समोर स्वागता साठी असशिल अस वाटल होत..
खुप दमते रे मी रोजच्या कामानी ..रेवति म्हणाली..
राघव या वर काहिच बोलला नाहि..
२-३ दिवस झाले पण असच घडत होत.
कारखान्यात कामावर राघव विचार करत होता..कि दार बेडरुम पासुन १२-१५ फुट दुर आहे दार उघडल्यावर इतक्या कमी वेळात रेवति परत बेडवर जाऊन कशी झोपत असेल??
याचा छडा लावायच त्याने ठरवले...
कामावर जाण्या पुर्वि त्याने रेवति च्या न कळत बेडरुम च्या खिडकिला एक बारिक छिद्र पाडुन ठेवले ज्या योगे आतले दिसु शकेल.. 
कां संपल्यावर एका मित्राला त्याने बरोबर घेतले ..व मी बेडरुम च्या खिडकिच्या जवळ उभा रहातो मिस कॉल आला कि तु बेल वाजव अश्या सुचना त्याने मित्राला दिल्या
मिस कॉल दिल्यावर राघवने खिडकितुन आत पाहिले.
बेलचा आवाज झाला अन रेवतिने झोपेतच आपला हात पांघरुणातुन बाहेर काढला व एखाद्या सर्पा प्रमाणे तोलांब होत सरपटत कडि पर्यंत गेला  जवळ जवळ तिचा हात १२-१५ फुट लांब झाला होता कडी काढल्याचा आवाज झाला व तिच हात आकुंचन पावत पुन्हा पांघरुणात गेला.
हे पाहुन राघवची बोबडी वळाली त्याने फोन वरुन मित्रास घरी जाण्यास सांगितले व आत आला 
रेवति शांत झोपली होति.
राघव समजुन चुकला होता कि तो एका अमानवि, अघोरि कृत्ये बरोबर संसार करित आहे.
राघवचे आंग तापाने फणफणु लागले व तो बेडवरच बेशुद्ध पडला..
अन तो उठलाच नाहि..
आजहि राघव व रेवति यांचा संसार सुखाचा चालु आहे...
मात्र तो ब्लॉक कायम बंद असतो.....