Sunday, October 6, 2013

साजुक तुपाचा शीरा



साधारण ४ थीत असेल त्या वेळी
शनिवार होता शाळा १/२ दिवस होति.
घरी आलो दप्तर ठेवल. हात पाय धुतले....
"अरे आपल्याला पारखी काकु कडे जायचय, समाचाराला..
तु चल माझ्या बरोबर....सोबत" आईन हुकुम सोडला
आम्हि दोघे निघलो पारखी काकुकडे,
अरे तुला पारखी काका माहित आहेत ना ते गेलेत.. आई
माझ्या फारस लक्षांत आल नाहि..
अरे समाचारला जायचे आहे...
तिथे शहाण्या सारख वागायच..आई....हो....मी
आम्हि दोघे काकुंच्या घरी आलो..
घरात शांतता..जमीनिवर पीठ सारवुन एक गोल त्या वर तेवता दिवा...
काकु कोप~यात शांत..कपाळ पांढर..
आईन त्यांच्या कडे पाहिल अन त्या रडायला लागल्या..
मी बघतच होतो..
"नका रडु..कहि आपल्या हातात असत का?.कस झाल?.आई म्हणाली
"काय सांगु?३- ३.३० ची वेळ असेल .... खुर्चीत पेपर वाचत बसले होते..मला म्हणाले ४ ला दुकानात जायच आहे..मला जरा शीरा कर खायला....काकु सांगत होत्या
आई ऎकत होति..काकु पुढे म्हणाल्या "अन मी शीरा केला साजुक तुपाचा अन शी~याची बशी घेउन आले अन म्ह्टले पेपर नंतर वाचा आधी हे खा...पण एक नाहि दोन नाहि..मग मी जरा हलवल तर पेपर हातातुन गळुन पडला अन...... काकु खुप रडायला लागल्या
मग आई पण जरा जवळ गेळी अन पाठीवरुन हात फिरवीत सांत्वन करु लागली.
काकु जरा शांत झाल्यावर म्हणाली "बहुतेक छातिचा रोग असेल"
"असेलहि... आमच कर्म..दुसर काय?..काकु म्हणाल्या.
जरा वेळान काकुंचा निरोप घेउन आम्हि निघालो
रस्त्यात हि आई डोळे पुसत होति...
मला एक प्रश्ण पडला होता.."शि~याच काय झाल असेल? मग तो शिरा कोणी खाल्ला असेल?????

avinash

No comments: