Sunday, October 6, 2013

सर्कस



मी ५वी -६वी त असेल
गावात सर्कस आली होति.
बाबांनि पैसे दिले होते 
आणी जायला परवांगी पण..
मी खुशीत होतो.
वर्गातले २-३ मित्र येणार होते बरोबर.
वाड्यातले जोशी अण्णांचा मी पेट..
आम्हि खुप गप्पा मारायचो..
काय आज फर खुष..अण्णा..
सर्कस जाणार आहोत..मीत्रांबरोबर..मी..
व्वा मजा आहे...अण्णा..
अण्णा तुम्ही बघितली ???..
हो गेल्याच वर्षी.मजा असते...अण्णा..
सांगाना..अण्णा...मी.
अरे मला झोपाळ्यावरचे खेळ खुप आवडतात.
त्यात त्या लांड्या स्कर्ट घातलेल्या मुली 
ह्या झोक्यावरुन त्या झोक्यावर कोलांट्या मारत जातात..
खुप मजा येते..तो खेळ सुरु झाला 
की मी दुर्बीण लावुन बघायचो...आण्णा 
माझा चेहेरा एकदम पडला..
काय झाल? अण्णा..
पण आमच्या कडे दुर्बिण नाही..मी
अरे तु लहान आहेस. सध्या तसच बघ...
मोठा झाला की दुर्बिण लावुन बघ..
त्या वेळी नेमक दुर्बिणीतुन काय बघायचे ते पण कळेल..अण्णा हसत म्हणाले...
हल्ली पेपर वाचताना सर्कस ची जहिरात बघताना अण्णा आठवतात
अन एकदम हसु येत.

No comments: