Monday, January 21, 2008

भुकेचा आग डोंब

दुपारचे १२.३० वाजुन गेले होते..ति जिना चढत होति.
ऊन मी म्हणत होते..पोटात भुकेचा आग डोंब उसळला होता
कालपासुन अन्नाचा एक कण पोटात नव्हता..
राजादादाला २ महिन्याची जेल झाली अन तिचे दिवस फिरले.
तो जेल जाण्या आधी हप्त्यातन ३ वेळा तरी यायचा..पैस पण बरा द्यायचा.
तो सुटलाय अस कानावर आल होत..ति वाट बघत होति त्याची.
गिऱ्हाईक येत नव्हत...धंदा होत नव्हता...उधारी झाली होति..
कुणीच उधार द्यायला तयार नव्ह्त..घरवालीला पैसे मागयची सोय नव्ह्ती..
२हजार रु अंगावर होते...ति चिडुन म्हणली की..धंदा कर अन पैसा मिळव
नसल जमत तर भिक माग..हा भाकड गुर पोसायचा पांजर पोळ नाय ...

वर आल्यावर ति शांत बसली..भुकेमुळें काहि सुचत नव्हत..
भुक असह्य झाल्यामुळे ति पाणी प्यायला उठली अन समोर राजादादा उभा
"गोदे..सकाळीच सुटलो अन तुझ्याकडच आलो.२ महिने जेल मधि..
बाईच नख बि बघायला नाय मिळाल..लय आंग ताठलय..ताव आलाय..
लई भुक लागलीय..रातभर कच्चा खाणार तुला...."

ति बघतच होति...
दोघाना कडकडुन भुका लागल्या होत्या.
दोन्हि भुका शरीराच्या होत्या..
फक्त भुकेची जात निराळी होति...

"अर..२ दिवस झाला अन्नाचा कण पोटात नाय,
चा, भज्जी पाव,मिसळ पाव मागव..माझी भुक भागव
मग मी तुझी भागवते..."भुकेन तिला त्याच्या मिठीत चक्कर आली....

अविनाश.......

No comments: